मेजवानीच्या ठिकाणी आपल्याला विशेष मानाची जागा मिळावी असे त्यांना वाटते. तसेच यहूद्यांचे सभास्थानात मोक्याच्या जागी बसायला त्यांना फार आवडते.
Cross references
राजासमोर स्वत:ची फुशारकी मारु नका. आपण प्रसिध्द आहोत असे म्हणू नका.
त्याने तिला विचारले, तुला काय पाहिजे?”ती म्हणाली, माझा एक मुलगा तुमच्या राज्यात तुमच्या उजवीकडे बसेल आणि दुसरा डावीकडे बसेल असे वचन द्या.”
शिक्षण देताना तो म्हणाला, “नियमशास्त्राच्या शिक्षकांविषयी सावध असा. त्यांना लांब झगे घालून मिरवायला आणि बाजारात नमस्कार घ्यायला आवडते.
परुश्यांनो तुमचा धिक्कार असो, कारण तुम्हांला सभास्थानातील महत्त्वाच्या जागी बसणे आणि बाजारात नमस्कार घेणे आवडते.
मग त्याने पाहुण्यांना एक बोधकथा सांगितली, कारण त्याने पाहिले की, ते त्यांच्यासाठी मानाच्या जागा शोधीत होते. तो त्यांना म्हणाला,
त्यांना बाजारात नमस्कार घेण्यास, सभास्थानात महत्त्वाच्या आसनावर व मेजवानीच्या वेळी मानाच्या जागी बसणे आवडते.
बंधूप्रेमाच्याबाबतीत एकमेकांशी ममतेने वागा, आदराच्या बाबतीत स्वत:पेक्षा इतरांचा बहुमान करा.
माझ्या बंधूंनो, गौरवी प्रभु येसू ख्रिस्तावरील विश्वासाची व पक्षपातीपणाची सांगड घालू नका.
मी मंडळीला पत्र लिहिले पण दियत्रेफस ज्याला त्यांचा नेता व्हायचे आहे व जे सांगतो ते तो स्वीकारीत नाही.