तरी, मृतांच्या पुनरूत्थानाच्या संदर्भात देव तुमच्या फायद्यासाठी जे बोलला ते तुम्ही अजूनपर्यंत वाचले काय?
Cross references
मी तुम्हांला सांगतो, जा आणि याचा अर्थ काय ते शिका: ‘मला यज्ञपशूंची अर्पणे नकोत, तर दया हवी. ‘मी नीतिमान लोकांना नव्हे, तर पापी लोकांना बोलावण्यास आलो आहे.”
तेव्हा त्याने त्यांना म्हटले, “दाविदाला व त्याच्याबरोबरच्या माणसांना भूक लागली तेव्हा त्याने काय केले, हे तुम्ही वाचले आहे काय?
पवित्र शास्त्र म्हणते, मला यज्ञपशूची अर्पणे नकोत, तर मला दया हवी.याचा खरा अर्थ तुम्हांला समजला असता तर तुम्ही या निर्दोष लोकांना दोष लावला नसता.
त्यांनी त्याला विचारले, ही मुले काय म्हणत आहे हे तुम्ही ऐकता ना?”येशूने त्यांना उत्तर दिले, होय, पवित्र शास्त्रात काय लिहिले आहे ते तुम्ही ऐकले नाही का?तू बालके व तान्हुली यांना स्तुती करायला शिकविले आहेस.’
येशू त्यांना म्हणाला, तुम्ही पवित्र शास्त्रात वाचले असलेच की.‘बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला दगड कोनशिला झाला आहे हे प्रभूने केले आणि आमच्यासाठी हे अदभुत आहे.’ स्तोत्र 118:22-23