Home Bibles मत्तय 21:42 · मराठी बायबल
मत्तय 21:42 · मराठी बायबल

येशू त्यांना म्हणाला, तुम्ही पवित्र शास्त्रात वाचले असलेच की.‘बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला दगड कोनशिला झाला आहे हे प्रभूने केले आणि आमच्यासाठी हे अदभुत आहे.’ स्तोत्र 118:22-23

Cross references

स्तोत्रसंहिता 118:22

इमारत बांधणाऱ्यांना जो दगड नको होता तो कोनाशिला झाला.

यशया 28:16

यासाठी परमेश्वर, माझा प्रभू म्हणतो, “सियोनमध्ये मी कोनशिला बसवीन. हा एक अमूल्य दगड असेल. ह्या महत्वाच्या दगडावर सर्व बांधकाम उभारले जाईल. त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची निराशा होणार नाही.

हबक्कूक 1:5

परमेश्वर म्हणाला, “इतर राष्ट्रांकडे पाहा! त्यांच्यावर लक्ष ठेव. मग तू विस्मयचकित होशील. मी अशा काही गोष्टी घडवून आणीन की तुझा विश्वास बसले. नुसते सांगून तुला ते खरे वाटणार नाही.

जखऱ्या 3:8

तेव्हा यहोशवा मुख्ययाजका, तू स्वत: व तुझ्या समोर बसलेल्या सहकारी याजकांनी ऐकले पाहिजे. माझा खास सेवक मी आणल्यावर काय घडणार आहे, ह्याची ही माणसे म्हणजे नमुने आहेत. त्याला कोंब म्हणतील.

मार्क 12:10

तुम्ही हा शास्त्रलेख वाचला नाही काय?‘जो दगड बांधणारांनी नाकारला तो कोनशिला झाला.

लूक 20:17

येशूने त्यांच्याकडे पाहिले व म्हटले,““तर मग जो दगड बांधणाऱ्यांनी नकारला तोच कोनशिला झाला’

प्रेषितांचीं कृत्यें 4:11

‘तुम्ही बांधणारांनी जो दगड नापसंत केला, जो पुढे कोनशिल झाला तोच हा येशू होय.’

प्रेषितांचीं कृत्यें 13:40

संदेष्टेयांनी सांगितलेल्या काही गोष्टी घडतील, सावध राहा! या गोष्टी तुमच्याबाबत होऊ नयेत म्हणून जपा. भविष्यवादी म्हणाला:

रोमकरांस 9:33

पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे.“पाहा मी सीयोनात अडखळण्याचा दगड आणि अपाय करणारा खडक ठेवतो. परंतु जो त्याच्यावर विश्वास ठेवतो तो लज्जित होणार नाही.

इफिसकरांस 2:20

तुम्ही प्रेषित आणि संदेष्टे या पायावर बांधलेली इमारत आहा, आणि ख्रिस्त येशू स्वत: तिचा कोनशिला आहे.

इफिसकरांस 3:3

आणि जशी मी अगोदर तुम्हांला थोडक्यात लिहिली होती ती देवाची गूढ योजना मला प्रकटीकरणाच्या द्वारे कळविण्यात आली.

1 पेत्र 2:4

जिवंत धोंडा जो प्रभु येशू त्याच्याकडे या. जो जगातील लोकांकडून नाकारला गेला. पण जो देवाला बहुमोल असा आहे आणि ज्याला देवानेच निवडले आहे.

Interlinear

Choose Theme