Home Bibles मत्तय 21:27 · मराठी बायबल
मत्तय 21:27 · मराठी बायबल

म्हणून त्यांनी येशूला उत्तर दिले, योहानाचा अधिकार कोठून होता हे आम्हांला माहीत नाही.” तेव्हा येशू म्हणाला, मग मी कोणत्या अधिकाराने या गोष्टी करतो, हे मीही तुम्हांला सांगणार नाही.”

Cross references

यशया 6:10

लोकांना गोंधळात टाक, लोक जे ऐकतील आणि पाहतील ते त्यांना समजणार नाही असे कर. तू असे केले नाहीस तर कदाचित् लोक जे कानांनी ऐकतील आणि डोळ्यांनी पाहतील, तेच खरे समजतील. असे जर झाले तर ते मला शरण येतील आणि बरे होतील.”

यशया 28:9

लोकांना धडा शिकविण्याचा परमेश्वर प्रयत्न करीत आहे. त्याची शिकवण लोकांच्या लक्षात यावी म्हणून तो प्रयत्नशील आहे. पण लोक परवा परवापर्यंत आईचे दूध पिणाऱ्या तान्ह्या मुलांप्रमाणे वागतात;

यशया 29:10

परमेश्वर तुम्हाला झोपेची गुंगी आणील. परमेश्वर तुमचे डोळे मिटेल. (संदेष्टे हेच तुमचे डोळे आहेत) परमेश्वर तुमची डोकी झाकील. (संदेष्टे हेच तुमची डोकी आहेत.)

यशया 42:19

ह्या सर्व जगात, सर्वात आंधळा माझा सेवक आहे. मी ज्याला जगात पाठवितो तो माझा दूत सर्वात बहिरा आहे. माझा स्वत:चा माणूस परमेश्वराचा सेवक सर्वांत अधिक आंधळा आहे.

यशया 56:10

रक्षक (संदेष्टे) आंधळे आहेत. ते काय करीत आहेत ते त्यांना समजत नाही. न भुंकणाऱ्या कुत्र्यांप्रमाणे ते आहेत. ते फक्त आडवे पडून झोपा काढतात. हो! त्यांना झोपायला आवडते.

यिर्मया 8:7

आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांनासुद्धा वेळेची योग्य जाणीव असते. करकोचे, पारवे, निळवी व सारस ह्यांना नवीन घरट्यात केव्हा यायचे ते समजते. पण माझ्या लोकांना, देवाला त्यांच्याकडून काय हवे आहे ते कळत नाही.

मलाखी 2:6

लेवीने मला मान दिला. त्याने खोटे शिकविले नाही लेवी प्रामाणिक होता आणि त्याला शांदीची आवड होती. तो मला मनुसरला आणि त्याने पुष्कळांना त्यांच्या पापाचरणापासून परावृत्त केले.

मत्तय 15:14

त्यांना जाऊ द्या. ते आंधळे वाटाडे आहेत. जर एका आंधळ्याने दुसऱ्या आंधळ्याला वाट दाखवण्याचा प्रयत्न केला तर दोघेही खड्ड्यात पडतील.”

मत्तय 16:3

आणि तुम्ही सकाळी म्हणता, आज वादळ होईल कारण आभाळ तांबूस व गडद आहे. तुम्हांला आभाळाचे स्वरूप ओळखता येते, पण काळाची लक्षणे ओळखता येत नाहीत?

मत्तय 23:16

“तुम्हांला दु:ख होईल. आंधळ्या वाटाड्यांनो, जे तुम्ही म्हणता जर एखादा मंदिराच्या नावाने शपथ घेतो तर त्याने ती पाळलीच पाहिजे याचे बंधन त्याच्यावर नाही, पण जर एखादा मंदिरातील सोन्याची शपथ घेऊन बोलतो, तर त्याने ती शपथ पाळलीच पाहिजे.

लूक 20:7

म्हणून त्यांनी असे उत्तर दिले की, तो कोणापासून होता हे त्यांना माहीत नाही.

योहान 9:30

त्या मनुष्याने उत्तर दिले, “ही फारच विचित्र गोष्ट आहे. येशू कोठून आला हे तुम्हांला माहीत नाही. परंतु त्याने माझे डोळे बरे केले.

योहान 9:40

परुश्यांतील काही जण येशूच्या आजूबाजूला होते. त्यांनी येशूला हे बोलताना ऐकले. आणि त्यांनी विचारले, “काय, आम्हीसुद्धा आंधळे आहोत असे तुला म्हणायचे आहे काय?”

रोमकरांस 1:18

लोकांनी केलेल्या प्रत्येक अनितीच्या कृत्यांमुळे व जे आपल्या अनीतीने सत्य दाबून ठेवतात, त्यांच्यामुळे स्वर्गातून देवाचा क्रोध प्रगट होतो.

रोमकरांस 1:28

आणि जेव्हापासून त्यांनी देवाला ओळखण्याचे नाकारले, तेव्हापासून देवाने त्यांना अशुद्ध मनाच्या हवाली केले व ज्या अयोग्य गोष्टी त्यांनी करु नयेत त्या करण्यास मोकळीक दिली.

2 करिंथकरांस 4:3

आणि जरी आमचे शुभवर्तमान आवरण घातलेले आहे, जे नाश पावत आहेत अशांसाठी ते आच्छादित आहे.

2 थेस्सलनीकाकरांस 2:9

दुष्टाचे येणे सैतानाच्या सामर्थ्याने होईल आणि त्याच्या येण्याबरोबर खोटे चमत्कार, चिन्हे आणि अद्भुत गोष्टी घडतील.

Interlinear

Choose Theme