Home Bibles योहान 9:30 · मराठी बायबल
योहान 9:30 · मराठी बायबल

त्या मनुष्याने उत्तर दिले, “ही फारच विचित्र गोष्ट आहे. येशू कोठून आला हे तुम्हांला माहीत नाही. परंतु त्याने माझे डोळे बरे केले.

Cross references

स्तोत्रसंहिता 119:18

परमेश्वरा, माझे डोळे उघड मला तुझ्या शिकवणीकडे बघू दे आणि तू केलेल्या अद्भुत गोष्टीबद्दल वाचू दे.

यशया 29:14

म्हणून मी शक्तिशाली व चमत्कारिक गोष्टी करून या लोकांना विस्मित करीत राहीन. त्यांच्यातील सुज्ञ स्वत:तील शहाणपण गमावतील. त्यांना काही समजू शकणार नाही.”

यशया 29:18

बहिरा पुस्तकातील शब्द ऐकू शकेल आणि आंधळ अंधारातून आणि धुक्यातून पाहू शकेल.

यशया 35:5

मग आंधळे पुन्हा डोळस होतील. त्यांचे डोळे उघडतील. बाहिरे ऐकू शकतील. त्यांना श्रवणशक्ती मिळेल.

मत्तय 11:5

आंधळे पाहू शकतात. पांगळे चालताल. कुष्ठरोगी शुद्ध केले जातात, बहिरे ऐकतात, मेलेले उठविले जातात व गरिबांना सुवार्ता सांगण्यात येते.

मार्क 6:6

नंतर येशू शिक्षण देत जवळपासच्या गावोगावी फिरला.

लूक 7:22

येशूने त्यांना उत्तर दिले, “जा आणि तुम्ही जे ऐकले व पाहिले आहे ते योहानाला सांगा: आंधळे पाहतात, लंगडे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिरे ऐकतात, मेलेले जिवंत केले जातात आणि गरीब लोक सुवार्ता ऐकतात.

योहान 3:10

येशू म्हणाला, “तुम्ही इस्राएलाचे प्रमुख शिक्षक आहात. तरीही तुम्हांला या गोष्टी कळत नाहीत काय?

योहान 12:37

येशूने इतके चमत्कार त्यांच्यासमोर केलेले असतानाही ते त्याच्यावर विश्वास ठेवीनात.

2 करिंथकरांस 4:6

कारण देव, जो म्हणाला, “अंधारातून प्रकाश होवो.” त्याने तो प्रकाश, आमच्या अंत:करणात ख्रिस्ताच्या चेहेऱ्यात देवाच्या गौवाच्या ज्ञानात दाखवावा.

Interlinear

Choose Theme