तेव्हा लोकांना जवळ बोलावून त्याने म्हटले, ऐका व समजून घ्या.
Cross references
मीखाया मोठ्याने म्हणाला, “मी काय म्हणतो ते सर्व लोकहो ऐका. राजा, तू युध्दावरुन जिवंत परत आलास तर परमेश्वरमाझ्या मार्फत बोलला नाही असे खुशाल समजा.”
नंतर परमेश्वर म्हणाला, “जा आणि ह्या लोकांना सांग: ‘काळजीपूर्वक ऐका पण समजून घेऊ नका. काळजीपूर्वक पाहा पण शिकू नका.’
मी काय सांगतो ते लक्ष देऊन ऐका. म्हणजे तुम्ही जगाल तुम्ही माझ्याकडे या. मी तुमच्याशी चिरकालासाठी करार करीन. हा करार मी दावीदबरोबर केलेल्या करारासारखा असेल. मी दावीदला वचन दिले होते की मी अखंड त्याच्यावर प्रेम करीन व त्याच्यावर विश्वास ठेवीन. तुम्ही त्या करारावर विश्वास ठेवू शकता.
कोणी राज्याची गोष्ट ऐकतो पण ती त्याला समजत नाही, तेव्हा तो दुष्ट (सैतान) येतो व त्याच्या अंत:करणात पेरलेले ते घेतो, वाटेवर पेरलेला तो हाच आहे.
तुम्ही लोक जे हे वाचाल ते याचा अर्थ समजून घ्या.
येशूने लोकांना आपल्याकडे पुन्हा बोलावून म्हटले, “प्रत्येकाने माझे ऐका व हे समजून घ्या.
सर्व लोक हे ऐकत असताना तो शिष्यांना म्हणाला, “नियमशास्त्राच्या शिक्षकांविषयी सावध असा, त्यांना लांब झगे घालून फिरणे आवडते,
नंतर पवित्र शास्त्र समजण्यासाठी त्याने त्यांची मने उघडली.
मी प्रार्थना करतो की, आमच्या प्रभु येशू ख्रिस्ताचा देव, गौरवी पिता, तुम्हाला ज्ञान व प्रकटीकरणाचे आध्यात्मिक सामर्थ्य जे पित्याविषयी ज्ञान तुम्हांला पुरवील, ते देवो.
या कारणासाठी, आम्हीसुद्धा तुमच्याविषयी ज्या दिवसापासून ऐकले, तेव्हापासून तुमच्यासाठी प्रार्थना करण्याचे थांबविले नाही. आम्ही प्रार्थना करीत आहोत की: तुम्ही देवाच्या इच्छेच्या सर्व प्रकारच्या ज्ञानाने आणि आध्यात्मिक समंजसपणाने भरले जावे.
म्हणून जर तुमच्यातील कोणी शहाणपणात उणा असेल तर त्याने ते देवाकडे मागावे. जो सर्व लोकांना उदार हस्ते देतो, आणि जो दोष शोधीत नाही, असा देव ते त्याला देईल.