नंतर परमेश्वर म्हणाला, “जा आणि ह्या लोकांना सांग: ‘काळजीपूर्वक ऐका पण समजून घेऊ नका. काळजीपूर्वक पाहा पण शिकू नका.’
Cross references
त्याच वेळी परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू पर्वत उतरुन लवकर खाली जा, कारण ज्या तुझ्या लोकांना तू मिसर देशातून बाहेर आणले त्यांनी महाभयंकर पाप केले आहे.
लोकांना देवाचे बोलणे परक्या भाषेसारखे अनाकलनीय वाटले.एक हुकूम इकडे, एक हुकूम तिकडे, एक नियम इकडे, एक नियम तिकडे, एक धडा इकडे; एक धडा तिकडे.लोकांनी स्वत:ला पाहिजे ते केले. म्हणून ते मागे पडून पराभूत झाले, ते सापळ्यात अडकले आणि पकडले गेले.
माझा प्रभू म्हणतो, “हे लोक, माझ्यावर त्यांचे प्रेम आहे, असे म्हणतात ते शब्दांनी माझ्याबद्दलचा आदर व्यक्त करतात. पण त्यांची मने माझ्यापासून फार दूर आहेत. त्यांचा माझ्याबद्दलचा आदर, म्हणजे फक्त त्यांनी पाठ केलेले व माणसांनी घालून दिलेले नियम आहेत.
आता तू हे पाटीवर लिही म्हणजे सर्व लोकांना ते दिसेल आणि हे तू पुस्तकातही लिही म्हणजे भविष्यात दूर असलेल्या शेवटच्या दिवसांसाठी ते उपयोगी पडेल.
माझ्या सेवकाने काय करायला हवे ते त्याला दिसते पण ते माझी आज्ञा पाळत नाही. तो कानाने ऐकू शकतो पण माझे म्हणणे ऐकण्यायचे तो नाकारतो.”
देव म्हणतो, “डोळे असून आंधळे व कान असून बहिरे असणाऱ्यांना लोकांना बाहेर आणा.
त्या लोकांना ते काय करीत आहे कळत नाही. त्यांना काही समजत नाही. जणू काही त्यांच्या डोळ्यावर पडदा पडला आहे, त्यामुळे ते पाहू शकत नाही. त्यांची हृदये (मने) समजून घ्यायचा प्रयत्न करीत नाहीत.
परमेश्वर मला म्हणाला, “यिर्मया, मोशे आणि शमुवेल जरी यहूदासाठी विनवणी करण्याकरिता माझ्याकडे आले असते तरी यहूदाची मला दया येणार नाही. यहूदाच्या लोकांची मला कीव वाटणार नाही. त्या लोकांना माझ्यापासून दूर ठेव. त्यांना निघून जाण्यास सांग.
परमेश्वराने त्या मुलाचे नाव “लो-अम्मी ठेवण्यास सांगितले. का? कारण तुम्ही माझे लोक नव्हेत व मी तुमचा परमेश्वर नाही.”
तेव्हा हे लोक दाखवून देत आहेत की, त्यांच्यासंबंधी यशयाने पूर्वी जे लिहून ठेवले ते खरे आहे. ते असे, ‘तुम्ही लक्ष द्याल, ऐकाल पण तुम्हांला समजणार नाही, तुम्ही पाहाल आणि निरीक्षण कराल पण तुम्हांला काहीच दिसणार नाही.
यासाठी की, ‘ते पाहत असता पाहतील पण त्यांना कधीच दिसणार नाही ते ऐकत असता ऐकतील पण त्यांना कधीच समजणार नाही जर त्यांनी पाहिले आणि त्यांना समजले तर त्यांच्यात कदाचित बदल होईल आणि त्यांना क्षमा करण्यात येईल.”‘
म्हणून तो म्हणाला, “तुम्हांला देवाच्या राज्याची रहस्ये जाणून घेण्याचा अधिकार दिलेला आहे. पण इतरांच्यासाठी ते बोधकथेमध्ये दिले आहे.“यासाठी की, जरी ते पाहत असले, तरी त्यांना दिसू नये आणि ऐकत असले तरी त्यांना समजू नये.’ यशया 6:9
“त्यांनी डोळ्यांनी पाहू नये, व अंत:करणाने समजू नये, फिरू नये व मी त्यांना बरे करू नये म्हणून त्याने त्यांचे डोळे आंधळे केले आणि त्यांचे अंत:करण कठीण केले आहे.”
‘या लोकांकडे (यहूदी) तुम्ही जा, आणि त्यांना सांगा: तुम्ही ऐकाल तर खरे पण तुम्हांला समजणार नाही. तुम्ही पहाल तुम्हाला दिसेल पण तुम्ही काय पाहात ते तुम्हाला कळणार नाही
पवित्र शास्त्रात लिहिल्याप्रमाणे:“देवाने त्यांना बधीरपणाचा आत्मा, पाहू न शकणारे डोळे ऐकू न शकणारे कान दिले आणि आजपर्यंत हे असे चालूच आहे.” अनुवाद 92:4