Home Bibles मार्क 5:2 · मराठी बायबल
मार्क 5:2 · मराठी बायबल

लगेच एक दुष्ट आत्मा लागलेला मनुष्य स्मशानातून निघून त्याच्याकडे आला.

Cross references

यशया 65:4

ते थडग्यांजवळ बसून मृतांकडून संदेश येण्याची वाट पाहतात? एवढेच नाही तर, ते मृत शरीरांजवळ राहतात. ते डुकराचे मांस खातात. त्यांचे काटे आणि सुऱ्या कुजलेल्या मांसाने माखून घाण झाल्या आहेत.

मार्क 1:23

त्यांच्या सभास्थानात एक भूतबाधा झालेला मनुष्य होता, तो एकदम मोठ्याने ओरडला,

मार्क 1:26

नंतर अशुद्ध आत्म्याने त्याला पिळले व तो मोठ्याने ओरडून त्याच्यातून बाहेर गेला.

मार्क 3:30

येशू असे म्हणाला कारण नियमशास्त्राचे शिक्षक म्हणाले की त्याच्यामध्ये अशुद्ध आत्मा आहे.

मार्क 4:1

दुसऱ्या वेळी येशू सरोवराच्या काठी शिक्षण देऊ लागला. पुष्कळ लोक त्याच्याभोवती जमले. मग तो सरोवरातील नावेत बसला आणि सर्व लोक सरोवराच्या किनाऱ्यावरील जमिनीवर होते.

मार्क 5:8

(कारण येशू त्याला म्हणत होता, “अरे अशुद्ध आत्म्या, या माणसातून नीघ.ʈ)

मार्क 7:25

ती स्त्री आली व येशूच्या पाया पडली.

लूक 8:27

जेव्हा तो किनाऱ्यावर उतरला, तेव्हा नगरातला एक मनुष्य त्याला भेटला. त्या माणसामध्ये अनेक भुते होती. बराच काळपर्यंत त्याने कपडे घातले नव्हते व तो घरातही राहिला नव्हता. तो कबरांमध्ये राहत होता.

लूक 9:42

परंतु तो येत असतानाच भुताने त्याला पाडले आणि पिळवटले. येशूने अशुद्ध आत्म्याला धमकावले. त्याने मुलाला बरे केले आणि त्याला त्याच्या वडिलांजवळ परत दिले.

Interlinear

Choose Theme