Home Bibles मार्क 15:29 · मराठी बायबल
मार्क 15:29 · मराठी बायबल

जवळून जाणारे लोक त्याची निंदा करीत होते. ते आपली डोकी हलवून म्हणाले, ‘अरे! मंदिर पाडून ते तीन दिवासात बांधणारा तो तूच ना!

Cross references

उत्पत्ति 37:19

ते एकमेकांस म्हणाले, “हा पाहा, एकामागे एक स्वप्ने पडणारा योसेफ इकडे येत आहे.

स्तोत्रसंहिता 22:7

माझ्याकडे जो बघतो तो माझा उपहास करतो. ते त्यांचे डोके हलवतात आणि जीभ बाहेर काढून मला वेडावून दाखवतात.

स्तोत्रसंहिता 22:12

माझ्याभोवती लोक आहेत ते बळकट बैलासारखे माझ्या चहू बाजूला आहेत.

स्तोत्रसंहिता 35:15

परंतु मी जेव्हा चूक केली तेव्हा ते लोक मला हसले ते लोक सच्चे मित्र नव्हते. मी त्यांना नीट ओळखत देखील नव्हतो परंतु ते माझ्या भोवती गोळा झाले आणि ते त्यांनी माझ्यावर हल्ला केला.

स्तोत्रसंहिता 69:7

माझा चेहरा लाजेने झाकला गेला आहे. मी तुझ्यासाठी ही लाज जवळ बाळगतो.

स्तोत्रसंहिता 69:19

तुला माझी लाज ठाऊक आहे. माझे शत्रू माझा प्राण उतारा करतात ते तुला माहीत आहे. या गोष्टी करताना तू त्यांना पाहिले आहेस.

स्तोत्रसंहिता 69:26

त्यांना शिक्षा कर म्हणजे ते पळून जातील, त्यानंतर त्यांच्याजवळ बोलण्यासाठी दुख आणि जखमा खरोखरच असतील.

स्तोत्रसंहिता 109:25

वाईट लोक माझा अपमान करतात. ते माझ्याकडे बघतात आणि त्यांच्या माना हलवतात.

विलापगीत 1:12

रस्त्यावर जाणाऱ्या-येणाऱ्यांनो, तुम्हाला काहीच वाटत नाही असे दिसते! पण जरा माझ्याकडे निरखून पाहा. माझ्या वेदनेप्रमाणे आणखी दुसऱ्या कोणाच्या विदना आहेत का? माझ्या वाठ्याला आलेल्या यातनांप्रमाणे दुसऱ्या काही यातना आहेत का? परमेश्वराने शिक्षा म्हणून मला दिलेल्या विदनेप्रमाणे दुसऱ्या वेदना आहेत का? त्याच्या कोपाच्या दिवशी त्याने मला शिक्षा केली आहे.

विलापगीत 2:15

रस्त्यावरून जाणारे तुला पाहून हादरतात व हळहळतात. यरुशलेमच्या कन्येकडे बघून ते चुकचुकतात. ते विचारतात, “लोक जिला “सौंदर्यपूर्ण नगरी” अथवा “पृथ्वीवरचा आनंद म्हणतात, ती नगरी हीच का?””

मत्तय 26:61

“हा मनुष्य असे म्हणाला की, देवाचे मंदिर मी पाडू शकतो आणि ते तीन दिवसात पुन्हा बांधू शकतो.”

मत्तय 27:39

जवळून जाणारे लोक येशूची निंदा करु लागले. ते डोकी हलवू लागले.

मार्क 14:58

“हाताने बांधलेले मंदिर मी पाडून टाकीन आणि हातांनी न बांधलेले असे दुसरे मंदिर तीन दिवसात उभारीन.’

योहान 2:18

यहूदी लोक येशूला म्हणाले, “एखादा चमत्कार करुन आम्हांला चिन्ह दाखवा. आणि या गोष्टी करण्याचा तुम्हांला अधिकार आहे हे सिद्द करा.”

Interlinear

Choose Theme