Home Bibles स्तोत्रसंहिता 69:26 · मराठी बायबल
स्तोत्रसंहिता 69:26 · मराठी बायबल

त्यांना शिक्षा कर म्हणजे ते पळून जातील, त्यानंतर त्यांच्याजवळ बोलण्यासाठी दुख आणि जखमा खरोखरच असतील.

Cross references

2 इतिहास 28:9

तिथे ओदेद नावाचा परमेश्वराचा एक संदेष्टा होता. शोमरोनला आलेल्या इस्राएली सैन्याला तो भेटला. ओदेद त्यांना म्हणाला, “तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर याच्यामुळे तुम्ही यहूदी लोकांचा पराभव करु शकलात कारण परमेश्वराचा यहूद्यांवर कोप झाला होता. पण तुम्ही अतिशय नीच पध्दतीने यहूद्यांना मारलेत, त्यांना शासन केलेत. त्यामुळे आता परमेश्वराच्या कोधाचा रोख तुमच्यावर आहे.

ईयोब 19:21

“माझी दया येऊ द्या. मित्रांनो, तुम्हाला माझी दया येऊ द्या! का? कारण देव माझ्यावर उलटला आहे.

ईयोब 30:13

मी पळून जाऊ नये म्हणून ते रस्त्यावर पहारा देतात. माझा नाश करण्यात त्यांना यश मिळते. कुणाच्या मदतीची त्यांना गरज नसते.

स्तोत्रसंहिता 109:16

का? कारण त्या दुष्ट माणसाने कधीही काहीही चांगले केले नाही, त्याने कधीच कुणावर प्रेम केले नाही. त्याने गरीब, असहाय्य लोकांचे आयुष्य कष्टी केले.

यशया 53:4

पण त्याने आमचा त्रास स्वत:चा मानला. त्याने आमचे दु:ख आणि वेदना स्वत: भोगल्या आम्हाला वाटले की देव त्यालाच शिक्षा करीत आहे, त्याने केलेल्या कर्मांबद्दल त्याला ताडन करीत आहे.

यशया 53:10

परमेश्वराने त्याला चिरडून टाकण्याचे ठरविले आणि परमेश्वराने दु:ख भोगलेच पाहिजे असे निश्चित केले. म्हणून सेवक स्वत:चा बळी देण्यास तयार झाला. पण त्याला नवे जीवन मिळेल आणि तो खूप खूप जगेल. तो त्याच्या लोकांना पाहील. परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे, सेवकाने करायच्या, सर्व गोष्टी तो पूर्ण करील.

जखऱ्या 1:15

आणि जी राष्ट्रे स्वत:ला सुरक्षित समजतात, त्यांच्याबद्दल मला अतिशय राग आहे. मी थोडासा रागावलो आणि माज्या लोकांना शिक्षा करण्यासाठी मी त्या राष्ट्रांचा उपयोग केला. पण त्या राष्ट्रांनी प्रचंड नुकसान केले.”

जखऱ्या 13:7

सर्व शक्तिमान परमेश्वर म्हणतो, “हे तलवारी, मेंढपाळांवर प्रहार कर. माझ्या मित्रावर वार कर. मेंढपाळावर प्रहार कर. माझ्या मित्रावर वार कर. मेंढपाळावर वार कर म्हणजे मेंढ्या पळून जातील आणि मी त्या लहान जीवांना शिक्षा करीन.

मार्क 15:27

त्यांनी त्याच्याबरोबर दोन लुटारूंना एकाला त्याच्या उजविकडे व दुसऱ्याला त्याच्या डावीकडे वधस्तंभावर खिळले होते.

1 थेस्सलनीकाकरांस 2:15

त्यांनी प्रभु येशूला आणि संदेष्ट्यांना मारले, त्यांनी आम्हांला बाहेर हाकलून लावले, ते देवाला संतोष देत नाहीत आणि ते सर्व लोकांच्या विरुद्ध आहेत.

Interlinear

Choose Theme