Home Bibles मार्क 12:26 · मराठी बायबल
मार्क 12:26 · मराठी बायबल

परंतू मेलेल्यांच्या पुन्हा उठण्याविषयी तुम्ही मोशाच्या पुस्तकातील जळत्या झुडपाविषयी वाचले नाही काय? तेथे देव मोशाला म्हणाला, “मी अब्राहामाचा, इसहाकाचा आणि याकोबाचा देव आहे.

Cross references

उत्पत्ति 17:7

आणि मी तुझ्यामध्ये व माझ्यामध्ये एक करार करतो हा करार तुझ्या वंशजानांही पिढ्यानपिढ्या कायम लागू राहिल; मी तुझा व तुझ्या वंशजांचा देव होईन.

उत्पत्ति 26:24

त्याच रात्री परमेश्वराने इसहाकाला दर्शन देऊन म्हटले, “इसहाका, तुझा बाप अब्राहाम याचा देव मी आहे; तर भिऊ नकोस, कारण मी तुझ्याबरोबर आहे; मी आपला सेवक अब्राहाम याच्याकरिता तुला आशीर्वादित करीन.” आणि तुझा वंश खूप वाढवीन.

उत्पत्ति 28:13

याकोबाने पाहिले की देवदूत शिडीवर चढत व उतरत आहेत. शिडीवरती परमेश्वर उभा असल्याचे त्याला दिसले; परमेश्वर त्याला म्हणाला, “तुझे आजोबा अब्राहाम व तुझे वडील इसहाक यांचा मी परमेश्वर व देव आहे; तू ज्या भूमिवर झोंपला आहेस ती भूमि म्हणजे तो देश मी तुला व तुझ्या वंशजांना देईन

उत्पत्ति 31:42

4परंतु माझ्या पूर्वजांचा देव, अब्राहामाचा देव आणि इसाहाकाचा देव (म्हणजे ‘भय’) माझ्या संगती होता. जर देव माझ्याबरोबर नसता तर तुम्ही मला रिकामेच माझ्या घरी पाठवले असते; परंतु देवाने मला झालेला त्रास पाहिला; देवाने मी कष्टाने केलेले काम पाहिले आणि काल रात्री देवाने सिद्ध करुन दाखवले की मी रास्त माणूस आहे.”

उत्पत्ति 32:9

याकोब म्हणाला, “माझे वडील अब्राहाम, इसहाक यांच्या देवा! परमेश्वरा! तू मला माझ्या देशात व माझ्या कुटुंबात परत येण्यास सांगितलेस; तसेच तू माझे कल्याण करशील असेही तू म्हणालास.

उत्पत्ति 33:20

देवाची उपासना करण्यासाठी त्याने तेथे एक वेदी बांधली. त्याने त्या ठिकाणाचे नाव “एल, इस्राएलाचा देव ठेवले.”

निर्गम 3:2

त्या डोंगरावर त्याने एका जळत्या झुडूपात परमेश्वरच्या दूताला पाहिले. मोशेन असे पाहिले की झुडूप जळत होते परंतु ते जळून खाक होत नव्हते तर जसेच्या तसेच होते.

निर्गम 3:16

आणखी परमेश्वर म्हणाला, “तू जाऊन इस्राएल लोकांच्या वडीलधाऱ्यांना (पुढाऱ्यांना) एकत्र बोलव आणि त्यांना सांग की तुमच्या पूर्वजांचा देव म्हणजे अब्राहाम, इसाहाक व याकोब यांचा देव ‘याव्हे’ मला दर्शन देऊन माझ्याशी बोलला आहे. परमेश्वर म्हणतो मी तुमच्याविषयी विचार केला आहे.

यशया 41:8

परमेश्वर म्हणतो, “इस्राएल, तू माझा सेवक आहेस. याकोब, मी तुझी निवड केली. तू अब्राहामच्या वंशातील आहेस. आणि अब्राहामवर प्रेम केले.

मत्तय 22:31

तरी, मृतांच्या पुनरूत्थानाच्या संदर्भात देव तुमच्या फायद्यासाठी जे बोलला ते तुम्ही अजूनपर्यंत वाचले काय?

मार्क 12:10

तुम्ही हा शास्त्रलेख वाचला नाही काय?‘जो दगड बांधणारांनी नाकारला तो कोनशिला झाला.

लूक 20:37

जळत्या झुडुपाविषयी मोशेने लिहिले, तेव्हा त्याने परमेश्वाराला अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव आणि याकोबाचा देव असे म्हटले व मेलेलेसुद्धा उठविले जातात हे दाखवून दिले.

प्रेषितांचीं कृत्यें 7:30

चाळीस वर्षांनंतर मोशे सीनाय पर्वताजवळच्या वाळवंटात होता. एका जळणाऱ्या झुडपांत मोशेला देवदूताचे दर्शन झाले.

Interlinear

Choose Theme