Home Bibles लूक 7:27 · मराठी बायबल
लूक 7:27 · मराठी बायबल

हाच तो ज्याच्याविषयी पवित्र शास्त्रात लिहिले आहे,“पाहा, मी माझ्या संदेशवहकाला माझ्यापुढे पाठवीत आहे. तो तुमच्यापुढे मार्ग तयार करील.’ मलाखी. 3:1

Cross references

यशया 40:3

ऐका! कोणीतरी ओरडत आहे, “परमेश्वरासाठी वाळवंटातून मार्ग काढा. आमच्या देवासाठी वाळवंटात सपाट रस्ता तयार करा.

मलाखी 3:1

सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो, “पाहा! मी माझा दूत पाठवीत आहे. तो माझ्यासाठी मार्ग तयार करील. अनपेक्षितपणे तुम्ही ज्याचा शोध करत आहात तो प्रभु त्याच्या मंदिरात येईल तुम्हांला हव्या असलेल्या नव्या कराराचा तो दूत आहे तो खरोखरीच येत आहे.”

मलाखी 4:5

परमेश्वर म्हणाला, “हे पाहा, मी एलीया संदेष्ट्याला तुमच्याकडे पाठवीत आहे. देवाच्या न्यायदानाच्या भयंकर मोठ्या वेळेपूर्वी तो येईल.

मत्तय 11:10

त्याच्याविषयी असे लिहिण्यात आले आहे:‘पाहा, मी माझ्या दूताला तुझ्यापुढे पाठवितो तो तुझ्यासाठी मार्ग तयार करील.’ मलाखी 3:1

मार्क 1:2

यशया संदेष्ट्याच्या पुस्तकात असे लिहिले आहे:“ऐका! मी माझ्या दूताला तुझ्याकडे पाठवीत आहे तो तुझ्यासाठी मार्ग तयार करील. मलाखी 3:1

लूक 1:15

देवाच्या दृष्टीने तो महान होईल. त्याने कोणतेही कडक पेय किंवा मद्य पिऊ नये. आणि तो आईच्या गर्भात असल्यापासूनच पवित्र आत्म्याने भरलेला असेल.

लूक 1:76

“मुला, आता तुला सर्वोच्च देवाचा संदेष्टा म्हणातील. प्रभूच्या येण्यासाठी लोकांना तयार करण्यासाठी तू त्याच्या (प्रभु) पुढे चालशील.

योहान 1:23

योहानाने त्यांना यशया संदेष्ट्याच्या शब्दात सांगितले,‘मी वैराण रानात ओरडणाऱ्या मनुष्याची वाणी आहे: ‘प्रभूसाठी सरळ मार्ग तयार करा.’

Interlinear

Choose Theme