“मुला, आता तुला सर्वोच्च देवाचा संदेष्टा म्हणातील. प्रभूच्या येण्यासाठी लोकांना तयार करण्यासाठी तू त्याच्या (प्रभु) पुढे चालशील.
Cross references
सियोनात जन्मलेल्या प्रत्येकाला देव ओळखतो. सर्वशक्तिमान देवाने ते नगर बांधले.
ऐका! कोणीतरी ओरडत आहे, “परमेश्वरासाठी वाळवंटातून मार्ग काढा. आमच्या देवासाठी वाळवंटात सपाट रस्ता तयार करा.
सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो, “पाहा! मी माझा दूत पाठवीत आहे. तो माझ्यासाठी मार्ग तयार करील. अनपेक्षितपणे तुम्ही ज्याचा शोध करत आहात तो प्रभु त्याच्या मंदिरात येईल तुम्हांला हव्या असलेल्या नव्या कराराचा तो दूत आहे तो खरोखरीच येत आहे.”
परमेश्वर म्हणाला, “हे पाहा, मी एलीया संदेष्ट्याला तुमच्याकडे पाठवीत आहे. देवाच्या न्यायदानाच्या भयंकर मोठ्या वेळेपूर्वी तो येईल.
यशया हा संदेष्टा ज्याच्याविषयी बोलत होता तो हाच बाप्तिस्मा करणारा योहान. त्याविषयीचे यशयाचे भविष्य असे होते:“वैराण प्रदेशात एक मनुष्य ओरडून सांगत आहे; ‘प्रभु देवासाठी मार्ग तयार करा, त्याच्या वाटा सरळ करा.”‘ यशया 40:3
तुम्ही तुमची अंत:करणे आणि जीवने वाईटाकडून चांगल्याकडे बदलली आहेत हे दर्शविण्यासाठी मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो, पण माझ्यानंतर माझ्यापेक्षाही महान असा एक येत आहे, ज्याच्या वहाणा उचलण्याची सुद्धा माझी लायकी नाही. तो पवित्र आत्म्याने आणि अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करील.
तर मग तुम्ही बाहेर कशाला गेला होतात? संदेष्ट्याला पाहायला काय? होय. मी तुम्हांला सांगतो, आणि संदेष्ट्यांपेक्षा अधिक असा योहान होता.
हेरोद त्याला मारावयास पाहत होता, पण तो लोकांना भीत होता कारण लोकांचा असा विश्वास होता की, योहान संदेष्टा आहे.
पण जर तो मनुष्यांकडून होता असे आपण म्हणालो तर सर्व लोक आपल्यावर रागावतील. आपल्याला लोकांची भीति आहे. कारण योहान हा एक संदेष्टा होता असे ते सर्व जण मानतात.”
यशया संदेष्ट्याच्या पुस्तकात असे लिहिले आहे:“ऐका! मी माझ्या दूताला तुझ्याकडे पाठवीत आहे तो तुझ्यासाठी मार्ग तयार करील. मलाखी 3:1
परंतु जर आपण तो मनुष्यांपासून आहे असे म्हणावे तर लोक आपणावर रागावातील.” पुढाऱ्यांना लोकांची भीति वाटत होती. कारण सर्व लोकांचा विश्वास होता की योहान खरोखर संदेष्टा होता.
आणि तो पुष्कळ इस्राएल लोकांना प्रभु त्यांचा देव याच्याकडे वळविण्यास कारणीभूत ठरेल.
तो महान होईल व त्याला सर्वोच्य देवाचा पुत्र म्हणतील. आणि प्रभु देव त्याला त्याचा पिता दावीद याचे सिंहासन देईल.
देवदूत तिला म्हणाला, “पवित्र आत्मा तुझ्यावर येईल, आणि सर्वोच्च देवाचे सामर्थ्य तुझ्यावर सावली करील. आणि म्हणून जे पवित्र बाळ जन्मास येईल, त्याला देवाचा पुत्र म्हणतील.
हे यशया संदेष्ट्याच्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे झाले:“वाळवंटात कोणाचा तरी आवाज ऐकू आला, ‘प्रभूसाठी मार्ग तयार करा, त्याचे रस्ते सरळ करा.
पण तुमच्या शत्रूवर प्रेम करा आणि त्यांचे चांगले करा. व कोणतीही अपेक्षा न ठेवता उसने द्या, मग तुमचे बक्षीस मोठे असेल व तुम्ही सर्वोच्च देवाचे पुत्र व्हाल. कारण देव हा कृतन्घ व दुष्ट लोकांवर दया करतो.
हाच तो ज्याच्याविषयी पवित्र शास्त्रात लिहिले आहे,“पाहा, मी माझ्या संदेशवहकाला माझ्यापुढे पाठवीत आहे. तो तुमच्यापुढे मार्ग तयार करील.’ मलाखी. 3:1
योहानाने त्यांना यशया संदेष्ट्याच्या शब्दात सांगितले,‘मी वैराण रानात ओरडणाऱ्या मनुष्याची वाणी आहे: ‘प्रभूसाठी सरळ मार्ग तयार करा.’
माझ्यानंतर येणारा तो हाच मनुष्य आहे. त्याच्या वहाणांचे बंद सोडण्याइतकीही माझी लायकी नाही.”
मी हे सांगताना तुम्ही स्वत:च ऐकले आहे की, ‘मी ख्रिस्त नाही. त्याच्याकरित मार्ग तयार करण्यासाठी देवाने ज्याला पुढे पाठविले तो मी आहे’.
येशू येण्यापूर्वी सर्व यहूदी लोकांना योहानाने उपदेश केला. त्यांच्या अंत:करणात बदल व्हावा म्हणून योहानाने लोकांना सांगितले की, त्यांनी बाप्तिस्मा घेतला पाहिजे.
ती मुलगी पौलाच्या व आमच्या मागे आली. ती मोठ्याने म्हणाली, ‘हे लोक सर्वेच्च देवाचे सेवक आहेत! ते तुम्हांला सांगत आहेत की, तुमचे तारण कसे होईल!’