“पण श्रीमंतानो, तुम्हांला दु:ख होवो कारण तुम्हांला अगोदरच सर्व सुख मिळाले आहे.
Cross references
दुष्ट माणसांना जास्त आयुष्य का असते? ते वृध्द आणि यशस्वी का होतात?
काही लोकांना वाटते की त्यांची सत्ता आणि संपत्ती त्यांचे रक्षण करील परंतु ते लोक मूर्ख आहेत.
लोक केवळ श्रीमंत आहेत म्हणून त्यांची भीती बाळगू नकोस. लोकांकडे मोठी, वैभवशाली घरे आहेत म्हणून त्यांची भीती बाळगू नकोस.
दुष्ट लोक यशस्वी होतात हे मी पाहिले आणि मी त्या गार्विष्ट लोकांचा मत्सर करायला लागलो.
“मूर्ख लोक मरतात कारण त्यांनी ज्ञानाचा मार्ग चोखाळायला नकार दिलेला असतो. त्यांचा मूर्ख मार्ग चोखाळण्यात त्यांना आनंद मिळतो. आणि त्यानेच त्यांचा नाश होतो.
पण मी (यिर्मया) मनाशी म्हणालो, “गरीब लोकच एवढे मूर्ख असले पाहिजेत. परमेश्वराच्या चालीरिती ते शिकलेले नाहीत. त्यांना, त्यांच्या देवाची शिकवण माहीत नाही.
शोमरोनच्या पर्वतावर राहणाऱ्या, बाशानच्या गायींनो, मी काय म्हणतो ते ऐका! तुम्ही गरिबांना दुखविता! त्यांना चिरडून टाकत! तुम्ही तुमच्या नवऱ्यांना तुमच्यासाठी “मद्य आणण्यास सांगता!”
सयोनमधील काहींचे जीवन आरामदायी आहे. शोमरोनच्या पर्वतावरील काही लोकांना नर्धास्त वाटते. पण तुमच्यावर खूप संकटे येतील. जगातील उत्तम नगरीतील तुम्ही “महत्वाचे लोक” आहात इस्राएलचे (लोक) मदत मागण्यासाठी तुमच्याकडे येतात.
आणि सर्वशक्तिमान परमेश्वर असे म्हणतो की आताचे मंदिर हे आधीच्या मंदिरापेक्षा सुंदर असेल. मी ह्या ठिकाणी शांतता प्रस्थापित करीन. लक्षात ठेवा, सर्वशक्तिमान परमेश्वर ह्या गोष्टी सांगत आहे.”
“जेव्हा तुम्ही गरिबांना देता तेव्हा त्याचा गाजावाजा करू नका. मी खरे तेच सांगतो. ढोंगी लोक तसेच करतात. दान देण्यापूर्वी कर्णा फुंकून लोकांचे लक्ष वेधून घेतात. सभास्थानात व रस्त्यावर ते जाहिरपणे अशी कामे करतात. कारण इतर लोकांनी त्यांना मोठेपणा द्यावा अशी त्यांची इच्छा असते. मी तुम्हांस सांगतो की, ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत.
“जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा ढोंग्यांसारखे होऊ नका. कारण आपण लोकांस दिसावे म्हणून सभास्थानांमध्ये व रस्त्याच्या कोपऱ्यांवर उभे राहून प्रार्थना करणे त्यांना आवडते. मी तुम्हांला खरे सांगतो की, त्यांना आपले प्रतिफळ मिळाले आहे.
“जेव्हा तुम्ही उपास करता तेव्हा तुम्ही ढोंग्यांसारखे चेहरा उदास करू नका. कारण आपण उपास करीत आहोत हे लोकांना दिसावे म्हणून ते आपली मुखे उदास करतात. मी तुम्हांला खरे सांगतो. त्यांना त्यांचे प्रतिफळ मिळाले आहे.
मग येशू त्यांना म्हणाला, “सांभाळा आणि सर्व प्रकारच्या लोभापासून स्वत:ला दूर ठेवा. कारण जेव्हा एखाद्या माणसाजवळ त्याच्या गरजेपेक्षा अधिक असते तेव्हा ती संपत्ती म्हणजे त्याचे जीवन असे होत नाही.”
“एक मनुष्य होता. तो श्रीमंत होता. तो जांभळी आणि तलम वस्त्रे घालीत असे. प्रत्येक दिवस तो ऐषारामात घालवीत असे.
पण जेव्हा त्या पुढाऱ्यायाने हे ऐकले तेव्हा तो फार दु:खी झाला, कारण तो फार श्रीमंत होता.
या युगातील श्रीमंतास आज्ञा कर की, गर्विष्ठ होऊ नका. पैसा जो चंचल आहे त्यावर त्यांनी आशा ठेवू नये, परंतु देव जो विपुलपणे उपभोगासाठी सर्व पुरवितो त्यावर आशा ठेवावी.
पण तुम्ही तर गरीब मनुष्याला तुच्छ लेखिले! तुमची पिळवणूक करणारे श्रीमंत लोकच नाहीत काय आणि तुम्हाला न्यायालयात नेणारे तेच लोक नाहीत काय?
श्रीमंत लोकहो ऐका! तुमच्यावर जी संकटे येत आहेत त्याबद्दल रडा व आक्रोश करा.
तिने ज्याप्रमाणे तुम्हाला दिले आहे, तसे तुम्ही तिचे परत करा. तिने जे काही केले आहे त्याच्या दुप्पट तुम्ही तिच्यासाठीकरा तिने दुसऱ्यांना दिले त्याच्या दुप्पट प्रमाणात तेज मद्य तिच्या प्याल्यात भरा.