येशूने आपला हात लांब करुन त्याला स्पर्श केला आणि म्हटले, “मला तुला बरे करायचे आहे, बरा हो!” आणि ताबडतोब त्याचे कुष्ठ नाहीसे झाले.
Cross references
नंतर देव बोलला, “प्रकाश होवो” आणि प्रकाश चमकू लागला.
नंतर देव बोलला, “अंतराळाखालील पाणी एकत्र गोळा होवो व कोरडी जमीन दिसून येवो.” आणि तसे घडले,
अलीशाने नोकरा मार्फत नामानला निरोप पाठवला, “तू जाऊन यार्देन नदीच्या प्रवाहात सात वेळा स्नान कर म्हणजे तुझी त्वचा रोगमुक्त होईल. तू निर्मळ, नितळ होशील.”
तेव्हा नामानने अलीशाच्या म्हणण्याप्रमाणे केले. यार्देन नदीत त्याने सात वेळा बुडी मारुन स्नान केले. त्याने तो स्वच्छ, नितळ झाला. त्याची त्वचा लहान बाळासारखी कोमल झाली.
का? देव फक्त आज्ञा करतो आणि त्याप्रमाणे गोष्टी घडतात. आणि त्याने जर “थांब” म्हटले तर ती गोष्ट थांबते.
मग तुमच्यावर शुद्ध पाणी शिंपडून मी तुम्हाला शुद्ध करीन. तुमची घाण मी धुवून काढीन. त्या ओंगळ मूर्तीचीही घाण मी धुवून काढीन आणि तुम्हाला शुद्ध करीन.”
देव पुढे म्हणाला, “तसेच, मी तुमचे रक्षण करीन व तुम्हाला अपवित्र होऊ देणार नाही. मी पिकांना वाढायची आज्ञा देईन व तुमच्यावर उपासमारीची वेळ येऊ देणार नाही.
परमेश्वर म्हणतो, “त्यानी माझा त्याग केली तरी मी त्यांना ह्या गोष्टीबद्दल क्षमा करीन. मी मोकळेपणाने त्यांच्यावर प्रेम करीन. आता मी त्यांच्यावर रागावलो नाही.
मग त्याने त्यांच्या डोळ्यांना स्पर्श केला आणि म्हणाला, “तुमच्या विश्वासाप्रमाणे तुमच्या बाबतीत घडो.”
येशू तिच्याजवळ उभा राहिला. त्याने तापाला आज्ञा दिली व ताप निघाला. ती ताबडतोब उठली आणि त्यांची सेवा करु लागली.
परंतु त्याने तिचा हात धरला आणि मोठ्याने म्हणाला, “मुली, ऊठ!”
येशूने उतर दिले, “जा, तुझा मुलगा वाचेल.” येशूने सांगितले त्यावर विश्वास ठेवून तो मनुष्य घरी गेला.