Home Bibles लूक 3:33 · मराठी बायबल
लूक 3:33 · मराठी बायबल

नहशोन अम्मीनादाबाचा मुलगा होता. अम्मीनादाब अर्णयाचा मुलगा होता. अर्णय हेस्रोनाचा मुलगा होता. हेस्रोन पेरेसाचा मुलगा होता. पेरेस यहूदाचा मुलगा होता.

Cross references

उत्पत्ति 29:35

त्यानंतर लेआला आणखी एक मुलगा झाला; तिने त्याचे नाव यहूदा ठेवले; करण ती म्हणाली, “आता मी परमेश्वराची स्तुति करीन.” नंतर तिचे जनन थांबले.

उत्पत्ति 38:29

परंतु त्या बाळाने आपला हात आखडून घेतला. त्यानंतर मग दुसरे बाळ प्रथम जन्मले; म्हणून मग ती सुईण म्हणाली, “हं! मग तू प्रथम वाट काढून जन्मलास तर!” म्हणून त्यांनी त्याचे नाव पेरेस (म्हणजे हिब्रू भाषेप्रमाणे ‘वाट काढणारा’) असे ठेवले.

उत्पत्ति 46:12

यहूदाचे मुलगे; एर, ओनान, शेला, पेरेस व जेरह; यापैकी एर व ओनान हे कनान देशात मरण पावले; पेरेसाचे मुलगे हेस्रोन व हामूल.

उत्पत्ति 49:8

“यहूदा, तुझे भाऊ तुझी स्तुती करतील; तू तुझ्या शत्रूंचा पराभव करशील; तुझे भाऊ तुला लवून नमन करतील.

रूथ 4:12

तामारने यहूदापासून पेरेसला जन्म दिला त्याचे कूळ थोर झालेतशीच तुलाही परमेश्वराच्या कृपेने रूथपासून भरपूर संतती होवो. त्याच्यासारखेच तुझे घराणे मोठे होवो.

रूथ 4:19

हेस्तोन रामचा पिता. राम अम्मीनादाबचा पिता

1 इतिहास 2:4

यहूदाची सून तामार हिला पेरेस आणि जेरह हे मुलगे झाले. असे यहूदाचे हे पाच मुलगे.

1 इतिहास 2:9

यरहमेल, राम आणि कालेब हे हेस्रोनचे मुलगे.

1 इतिहास 9:4

ऊथय हा अम्मीहूदचा मुलगा. अम्मीहूद हा अम्रीचा मुलगा. अम्री इम्रीचा मुलगा. इम्री बानीचा मुलगा. बानी पेरेसच्या वंशजांपैकी. पेरेस हा यहूदाचा मुलगा.

मत्तय 1:2

अब्राहाम इसहाकचा पिता होता. इसहाक याकोबाचा पिता होता. याकोब याहूदा व त्याच्या भावांचा पिता होता.

Interlinear

Choose Theme