Home Bibles 1 इतिहास 2:4 · मराठी बायबल
1 इतिहास 2:4 · मराठी बायबल

यहूदाची सून तामार हिला पेरेस आणि जेरह हे मुलगे झाले. असे यहूदाचे हे पाच मुलगे.

Cross references

उत्पत्ति 38:11

मग यहूदा आपली सून तामार हिला म्हणाला, “तू तुझ्या बापाच्या घरी जाऊन तेथे राहा, पण माझा मुलगा शेला लग्नाच्या वयाचा होईपर्यंत लग्न करु नको;” कारण शेलाही आपल्या दोन भावाप्रमाणे मारला जाईल अशी यहूदाला भीती वाटली; म्हणून मग तामार आपल्या बापाच्या घरी जाऊन राहिली.

उत्पत्ति 38:13

आपल्या मेंढरांची लोकर कातरवून घेण्याकरिता तिम्ना येथे जात होता हे तामारला समजले.

उत्पत्ति 38:29

परंतु त्या बाळाने आपला हात आखडून घेतला. त्यानंतर मग दुसरे बाळ प्रथम जन्मले; म्हणून मग ती सुईण म्हणाली, “हं! मग तू प्रथम वाट काढून जन्मलास तर!” म्हणून त्यांनी त्याचे नाव पेरेस (म्हणजे हिब्रू भाषेप्रमाणे ‘वाट काढणारा’) असे ठेवले.

उत्पत्ति 38:30

त्यानंतर हाताला लाल धागा बांधलेले ते दुसरे बाळ जन्मले. त्यांनी त्याचे नाव जेरह (म्हणजे हिब्रू भाषेप्रमाणे तेजस्वी किंवा तेजाने प्रकाशणारा) असे ठेवले.

गणना 26:13

जेरहाचे जेरही कूळ. शौलाचे शौली कूळ.

रूथ 4:12

तामारने यहूदापासून पेरेसला जन्म दिला त्याचे कूळ थोर झालेतशीच तुलाही परमेश्वराच्या कृपेने रूथपासून भरपूर संतती होवो. त्याच्यासारखेच तुझे घराणे मोठे होवो.

रूथ 4:18

पेरेसची वंशावळ खालील प्रमाणे:हस्तोनचा पिता पेरेस.

1 इतिहास 4:1

यहूदाच्या मुलांची नावे अशी: पेरेस, हेस्रोन, कर्मी, हूर आणि शोबाल.

1 इतिहास 9:4

ऊथय हा अम्मीहूदचा मुलगा. अम्मीहूद हा अम्रीचा मुलगा. अम्री इम्रीचा मुलगा. इम्री बानीचा मुलगा. बानी पेरेसच्या वंशजांपैकी. पेरेस हा यहूदाचा मुलगा.

1 इतिहास 9:6

यरुशलेममधील जेरह चे वंशज म्हणजे यऊवेल आणि त्याचे एकंदर 690 भाऊबंद.

नहेम्या 11:4

यरुशलेममध्ये काही यहुदी आणि बन्यामिनी घराण्यातील व्यक्ती राहात होत्या.)यरुशलेममध्ये आलेले यहुदाचे वंशज पुढीलप्रमाणे: उज्जीयाचा मुलगा अथाया, (उज्जीया जखऱ्याचा मुलगा, जखऱ्या अमऱ्याचा मुलगा आणि अमऱ्या शफाठ्याचा. शफाठ्या महललेलचा. महललेल हा पेरेसचा वंशज)

नहेम्या 11:24

राजाचा हुकूम काय आहे हे पथह्या लोकांना सांगत असे. (पथह्या हा मशेजबेल याचा मुलगा. मशेजबेल जेरहच्या वंशातला होता. जेरह यहूदाचा पुत्र.)

मत्तय 1:3

यहूदा पेरेस व जेरहाचा पिता होता. (त्यांची आई तामार होती.) पेरेस हेस्रोनाचा पिता होता. हेस्रोन रामाचा पिता होता.

लूक 3:33

नहशोन अम्मीनादाबाचा मुलगा होता. अम्मीनादाब अर्णयाचा मुलगा होता. अर्णय हेस्रोनाचा मुलगा होता. हेस्रोन पेरेसाचा मुलगा होता. पेरेस यहूदाचा मुलगा होता.

Interlinear

Choose Theme