Home Bibles ☰ Books लूक 22:13 · मराठी बायबल
लूक 22:13 · मराठी बायबल

तेव्हा पेत्र व योहान तेथून निघाले. जसे येशूने सांगितले तसेच सर्व घडले तेव्हा त्यांनी वल्हांडणाच्या भोजनाची तयारी केली.

Cross references

लूक 19:32

ज्यांना पाठविले होते, ते गेले आणि त्याने सांगितल्याप्रमाणे त्यांस आढळले.

लूक 21:33

आकाश व पृथ्वी नाहीशी होतील पण माझी वचने नाहीशी होणार नाहीत.

योहान 2:5

येशूची आई नोकरांना म्हणाली, “येशू तुम्हांला सांगेल तसे करा.”

योहान 11:40

येशूने तिला म्हटले, “जर तू विश्वास धरशील तर देवाचे गौरव पाहशील, असे मी तुला सांगितले नव्हते काय?”

इब्री लोकांस 11:8

जेव्हा देवाने अब्राहामाला पाचारण केले तेव्हा विश्वासानेच त्याने आज्ञापालन केले. आणि त्याला वतन म्हणून जी जागा मिळणार होती त्या जागेकडे तो गेला. आपण कोठे जात आहोत हे त्याला ठाऊक नसतानादेखील तो बाहेर पडला.

Interlinear

Choose Theme