Home Bibles लूक 21:10 · मराठी बायबल
लूक 21:10 · मराठी बायबल

मग तो त्यांना म्हणाला, “एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर उठेल, एक राज्य दुसऱ्या राज्यावर उठेल.

Cross references

2 इतिहास 15:5

त्या धकाधकीच्या काळात कोणीही सुरक्षितपणे प्रवास करु शकत नव्हता. सगळ्याच देशामध्ये अराजकाची स्थिती होती.

यशया 19:2

देव म्हणतो, “मी मिसरमधील लोकांना त्यांच्याच लोकांविरूध्द लढायला लावीन. भावाभावात लढाई होईल शेजारी शेजाऱ्याच्याविरूध्द जाईल. शहरे एकमेकांच्या विरूध्द जातील. प्रदेश एकमेकांच्या विरोधात जातील.

हाग्गय 2:21

“राज्यपाल जरुब्बाबेलकडे जा. त्याला सांग की मी आकाश-पृथ्वी हालवीन.

जखऱ्या 14:2

यरुशलेमशी लढण्यासाठी मी सर्व राष्ट्रांना एकत्र करीन. ते नगरी ताब्यात घेतील आणि घरांचा नाश करतील. स्त्रियांवर बलात्कार करतील व अर्धे - अधिक लोक कैद केले जातील. पण उरलेल्या लोकांना नगरीतून नेले जाणार नाही.

जखऱ्या 14:13

हा भयंकर रोग शत्रू - सैन्याच्या छावणीत पसरेल. त्यांच्या घोड्यांना, खेचरांना, उंटाना आणि गाढवांनाही हा भयंकर रोग होईल. तेव्हा लोकांना खरोखरच परमेश्वरच परमेश्वराची भीती वाटेल प्रत्येकजण आपल्या शेजाऱ्याचा हात धरील आणि शेजारी एकमेकांशी भांडतील.यहूदाचे लोक यरुशलेममध्ये लढतील. पण नगरीभोवतीच्या सर्व राष्ट्रांकडून त्यांना संपत्ती मिळेल त्यांना भरपूर सोने, चांदी आणि कपडालता मिळेल.

मार्क 13:8

एक राष्ट्रदुसऱ्या राष्टावर उठेल, एक राज्य दुसऱ्या राज्यावर उठेल, निरनिराळ्या ठिकाणी धरणीकंप होतील आणि दुष्काळ होतील. पण या गोष्टी म्हणजे नाशाची सुरूवात आहे.

प्रेषितांचीं कृत्यें 2:19

वर आकाशात मी अद्भुत गोष्टी दाखवीन, खाली पृथ्वीवर मी पुरावे देईन. तेथे रक्त, अग्नि आणि दाट धूर असतील.

प्रेषितांचीं कृत्यें 11:28

यांच्यापैकी एकाचे नाव अगाब होते. अत्युखियात तो उभा राहिला आणि बोलू लागला. पवित्र आत्म्याच्या साहाय्याने तो म्हणाला, “फार वाईट काळ सर्व पृथ्वीवर येत आहे. लोकांना खायला अन्न मिळणार नाही.” (क्लौदिया राजा राज्य करीत होता तेव्हा त्याच्या काळात हे घडले.)

इब्री लोकांस 12:27

“पुन्हा एकदा” हे शब्द हेच दर्शवितात की, ज्या गोष्टी उत्पन्र केलेल्या आहेत त्या काढून टाकण्यात येतील. ज्या गोष्टी हलविता येत नाहीत त्या तशाच राहतील.

प्रकटीकरण 6:2

मी पाहिले आणि तेथे माइयासमोर पांढरा घोडा होता. घोडेस्वारानेधनुष्य धरले होते. त्याला मुगुट देण्यात आला होता. तो निघाला, शत्रूचा पराभव करीत निघाला, तो विजयमिळविण्यासाठी निघाला.

Interlinear

Choose Theme