Home Bibles लूक 20:11 · मराठी बायबल
लूक 20:11 · मराठी बायबल

नंतर त्याने दुसऱ्या नोकराला पाठविले, पण त्यालासुद्धा त्यांनी मारले. त्या नोकराला त्यांनी लज्जास्पद वागणूक दिली. आणि रिकाम्या हाताने परत पाठविले.

Cross references

होशेय 10:1

इस्राएल बहरलेल्या द्राक्षवेलीप्रमाणे आहे. त्याला परमेश्वराकडून पुष्कळ गोष्टी मिळत गेल्या पण त्याने दैवांच्या मानासाठी खूपखूप वेद्या बांधल्या. त्याची भूमी अधिकाधिक चांगली होत गेली, तेव्हा त्याने अधिक चांगले स्तंभ दैवतांच्या मानासाठी उभे केले.

मत्तय 23:30

आणि तुम्ही म्हणता जर आम्ही आमच्या वाडवडिलांच्या काळात जिवंत असतो तर त्यांना या संदेष्ट्यांना जिवे मारण्यास मदत केली नसती.

प्रेषितांचीं कृत्यें 7:52

तुमच्या वाडवडिलांनी छळ केला नाही, असा कोणी एखादा भविष्यवादी होऊन गेला काय? एक धार्मिक (रिव्रस्त) येणार अशी घोषणा करणाऱ्यांचा त्यांनी वध केला. आणि आता तर तुम्ही त्याचा ही (रिव्रस्ताचा) विश्वासघात व खून केलात.

1 थेस्सलनीकाकरांस 2:2

पण तुम्हाला माहीत आहे की, आम्हांला मागे फिलिप्पै येथे त्रास आणि अपमान सहन करावा लागला. पण देवाच्या साहाय्याने मोठा विरोध झाला असताना देवाकडून येणारी सुवार्ता सांगण्यासाठी आम्हांला धैर्य प्राप्त झाले.

इब्री लोकांस 11:36

काहींना निंदा व चाबकाचा मार सहन करावा लागला. तर काहींना बेड्या व तुरूगंवास भोगावे लागले.

Interlinear

Choose Theme