Home Bibles लूक 2:9 · मराठी बायबल
लूक 2:9 · मराठी बायबल

आणि देवाचा एक दूत त्यांच्यामोर प्रगट झाला व प्रभूचे तेज त्यांच्याभोवती पसरले. आणि ते मेंढपाळ घाबरुन गेले.

Cross references

निर्गम 16:7

उद्या सकाळी तुम्ही परमेश्वराचे तेज पाहाल; तुम्ही परमेश्वराकडे तक्रार केली आणि त्याने ती ऐकली; आणि तुम्ही उगीच आम्हाकडे पुन्हा पुन्हा तक्रार करीत आला आहात. आता आपण जरा आराम करु या.”

निर्गम 16:10

मग अहरोन सर्व इस्राएल लोकांशी बोलला. ते सर्वजण एके ठिकाणी जमले होते; अहरोन बोलत असताना सर्व लोकांनी वळून रानाकडे पाहिले; आणि त्यांना एका ढगात परमेश्वराचे तेज दिसले.

निर्गम 40:34

मग दर्शन मंडपावर मेघाने छाया केली व पवित्र निवास मंडप परमेश्वराच्या तेजाने भरून गेला.

शास्ते 6:11

याच सुमाराला गिदोन नावाच्या माणसाकडे परमेश्वराचा दूत आला. आणि अफ्रा येथे योवाशच्या मालकीच्या ओक वृक्षाखाली बसला. योवाश अबियेजरच्या कुळातील होता. गिदोन योवाशचा मुलगा होता. गिदोन द्राक्षकुंडात गव्हाची झोडणी करत होता. परमेश्वराचा दूत गिदोनच्या शेजारी बसला. गिदोन मिद्यानांपासून गहू लपवून ठेवत होता.

1 राजे 8:11

परमेश्वराच्या तेजाने मंदिर भरुन गेल्यामुळे याजकांना आपले काम चालू ठेवता येईना.

यशया 6:3

ते देवदूत एकमेकांशी बोलत होते. ते म्हणत होते, “पवित्र, पवित्र, पवित्र सर्वशक्तिमान परमेश्वर परमपवित्र आहे. त्याची प्रभा सगळ्या पृथ्वीला व्यापून राहिली आहे.” देवदूतांचे आवाज फार मोठे होते.

यशया 35:2

वाळवंट फुलणाऱ्या फुलांनी भरून जाईल आणि आपला आनंद दाखवेल. त्या वेळी वाळवंट जणू आनंदाने नाचत असल्याचे भासेल. लेबानोनचे बन, कर्मेलची टेकडी व शारोनची दरी ह्यांच्याप्रमाणे ते सुंदर होईल. सर्व लोकांनी परमेश्वराचे गौरव पाहिल्यामुळे हे सर्व घडेल. लोक आमच्या देवाचे लावण्य पाहतील.

यशया 40:5

मग देवाची प्रभा फाकेल आणि सर्व लोक एकत्रितपणे परमेश्वराचे तेज पाहतील. हो! स्वत: परमेश्वराने हे सर्व सांगितले आहे.”

यशया 60:1

“यरूशलेम, माझ्या ज्योती, ऊठ. तुझा प्रकाश (देव) येत आहे. परमेश्वराची प्रभा तुझ्यावर फाकेल.

यहेज्केल 3:23

मग मी उठलो आणि दरीकडे गेलो. खबार कालव्याजवळ पाहिली होती तशीच परमेश्वराची प्रभा तेथे होती. तेव्हा मी नतमस्तक झालो.

मत्तय 1:20

पण असे विचार त्याच्या मनात घोळत असतानाच देवाच्या दूताने स्वप्नात त्याला दर्शन दिले आणि सांगितले, “दाविदाच्या वंशातील योसेफा,मरीयेशी लग्न करण्यास अनमान करू नकोस कारण तिला होणारे मूल पवित्र आत्म्यापासूनहोणार आहे.

लूक 1:11

तेव्हा देवाच्या दूताने त्याला दर्शन दिले. देवदूत धूप जाळण्याच्या वेदीच्या उजव्या बाजूला उभा होता.

लूक 1:28

गब्रीएल तिच्याकडे आला आणि म्हणाला, “अभिवादन! तुझ्यावर कृपा झालेली आहे. प्रभु तुझ्याबरोबर आहे.”

लूक 24:4

यामुळे त्या अवाक्‌ झाल्या असतानाच, अचानक लखलखीत कपडे घातलेले दोन पुरुष त्यांच्या बाजूला उभे राहिले.

योहान 12:41

यशया असे म्हणाला, कारण त्याने त्याचे गौर0व पाहिले आणि तो त्याच्याविषयी बोलला.

प्रेषितांचीं कृत्यें 5:19

पण रात्रीच्या वेळी देवाच्या दूताने तुरुंगाचा दरवाजा उघडला. देवदूताने प्रेषितांना बाहेर आणले आणि म्हणाला,

प्रेषितांचीं कृत्यें 12:7

अचानक देवाचा दूत तेथे उभा राहिला. तुरुंगाच्या खोलीत एकदम प्रकाश पडला. देवदूताने पेत्राच्या कुशीला स्पर्श करुन त्याला उठविले. देवदूत म्हणाला, “लवकर ऊठ!” तेव्हा पेत्राच्या हातातील साखळ्या गळून पडल्या.

प्रेषितांचीं कृत्यें 22:6

“तेव्ह? असे झाले की, मी प्रवास करीत दिमिष्क शहराजवळ आलो असताना दुपारच्या वेळी माइयाभोवती आकाशातून लख्ख प्रकाश पडला.

प्रेषितांचीं कृत्यें 26:13

वाटेत भर दुपारच्या वेळी मी माइया व माझ्यासमवेत असणाऱ्यांच्या भोवती स्वर्गीय प्रकाश फाकलेला पाहिला. तो प्रकाश सूर्यापेक्षाही जास्त प्रखर होता.

प्रेषितांचीं कृत्यें 27:23

मी ज्या देवाचा सेवक आहे आणि ज्याची भक्ति मी करतो, त्याचा दूत काल रात्री माझ्या बाजूला उभा राहीला.

2 करिंथकरांस 3:18

तर आपण सर्वजण आवरण नसलेल्या चेहऱ्याने प्रभुचे गौरव आरशात पाहिल्याप्रमाणे पाहत असता, प्रभु जो आत्मा याच्यापासून गौरवातून गौरवात असे त्याच्या प्रतिरुपात रुपांतरीत होत जातो.

2 करिंथकरांस 4:6

कारण देव, जो म्हणाला, “अंधारातून प्रकाश होवो.” त्याने तो प्रकाश, आमच्या अंत:करणात ख्रिस्ताच्या चेहेऱ्यात देवाच्या गौवाच्या ज्ञानात दाखवावा.

1 तीमथ्याला 3:16

आणि आपल्या सुभक्तीचे रहस्य निर्विवाद मोठे आहे.तो मानवी शरीरात दिसला; आत्म्याने तो नीतिमान ठरविला गेला, देवतूतांनी त्याला पाहीले होते; राष्ट्रांमध्ये तो गाजविला गेला. जगाने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि स्वर्गामध्ये तो गौरवाने घेतला गेला.

इब्री लोकांस 12:21

खरोखर ते दृश्य इतके भयंकर होते की, मोशे म्हणाला, “भीतीमुळे मी थरथर कांपत आहे.”

प्रकटीकरण 18:1

यानंतर मी दुसऱ्या एका देवदूताला आकाशातून खाली येताना पाहिले. त्याच्याकडे मोठे अधिकार होते. आणि त्याच्यागौरवाने पृथ्वी झळाळत होती.

प्रकटीकरण 20:11

नंतर एक मोठे पांढरे सिंहासन आणि त्याच्यावर जो बसला होता. त्याला मीपाहिले. त्याच्या समोरुन पृथ्वी आणि आकाश ही पळून गेली. आणि त्याच्यासाठी कोठेच जागा नव्हती.

Interlinear

Choose Theme