Home Bibles इब्री लोकांस 12:21 · मराठी बायबल
इब्री लोकांस 12:21 · मराठी बायबल

खरोखर ते दृश्य इतके भयंकर होते की, मोशे म्हणाला, “भीतीमुळे मी थरथर कांपत आहे.”

Cross references

निर्गम 19:16

तीन दिवसानंतर पर्वतावर विजांचा लखलखाट व गडगडाट झाला; पर्वतावर एक दाट ढग उतरला आणि रणशिंगाचा फार मोठा आवाज झाला. तेव्हा छावणीत राहाणारे सर्व लोक घाबरले.

निर्गम 19:19

शिंगाचा आवाज मोठमोठा होऊ लागला. मोशे देवाबरोबर जेव्हा जेव्हा बोलला तेव्हा तेव्हा देवाने त्याला मेघगर्जनेसारख्या आवाजाने उत्तर दिले.

अनुवाद 9:19

परमेश्वराच्या कोपाची मला भिती वाटत होती कारण संतापाच्या भरात त्याने तुमचा संहार केला असता. पण या ही वेळी परमेश्वराने माझे ऐकले.

स्तोत्रसंहिता 119:120

परमेश्वरा, मला तुझी भीती वाटते, मी घाबरतो आणि तुझ्या नियमांना मान देतो.

यशया 6:3

ते देवदूत एकमेकांशी बोलत होते. ते म्हणत होते, “पवित्र, पवित्र, पवित्र सर्वशक्तिमान परमेश्वर परमपवित्र आहे. त्याची प्रभा सगळ्या पृथ्वीला व्यापून राहिली आहे.” देवदूतांचे आवाज फार मोठे होते.

दानीएल 10:8

मग मी एकटाच उरलो .मी दृष्टान्त पाहात होतो. त्या दृष्टान्ताने मी सुध्दा घाबरलो. माझा धीर खचला. मृत माणसाच्या चेहऱ्याप्रमाणे माझा चेहरा पांढराफटक पडला, मी असहाय झालो.

दानीएल 10:17

“महाराज, मी दानीएल तुमचा सेवक.मी तुमच्याशी कसा बोलू शकेन? माझा धीर खचला आहे व वास घेणेही मला कठीण आहे.”

प्रकटीकरण 1:17

जेव्हा मी त्याला पाहिले, तेव्हा मी मेलेल्या माणसा सारखा त्याच्या पायजवळ पडलो त्याने त्याचा उजवा हात माइयावरठेवला आणि म्हणाला, “घाबरु नको! मी पहिला आणि शेवटला आहे. मी जिवंत आहे,

Interlinear

Choose Theme