ह्या अर्पणातून अहरोनाच्या संतानातील प्रत्येक पुरुष हे खाऊ शकतो परमेश्वराच्या अर्पणातून हा त्यांचा वाटा पिढ्यान्पिढ्या सतत चालू राहावा; ह्या अर्पणास स्पर्श झाल्याने ते पवित्र होतील.
Cross references
सातही दिवस वेदी शुद्ध व पवित्र करावी; ती ह्या दिवसात जास्तीत जास्त पवित्र होईल, इतकी पवित्र की तिला कशाचाही स्पर्श झाला तर तेही पवित्र होईल.
तुम्ही चरबी व रक्त मुळीच खाऊ नये; तुम्ही जेथे कोठे राहाल तेथे तुमच्यासाठी हा नियम पिढ्यान्पिढ्या कायमचा चालू राहील.”
“जर अभिषेक झालेल्या याजकाने लोकावंर दोष येईल असे पाप केले तर आपल्या पापाबद्दल त्याने पापार्पण म्हणून कोणताही दोष नसलेला एक गोऱ्हा परमेश्वरासाठी अर्पावा.
त्याने त्या बकऱ्याच्या डोक्यावर आपला हात ठेवावा आणि परमेश्वरासमोर जेथे यज्ञपशूचा वध करतात तेथे त्याचा वध करावा. हे पापार्पण होय.
त्याने त्या कोंकराच्या डोक्यावर आपला हात ठेवावा व जेथे होमबलीचा वध करतात तेथे पापार्पणाकरिता त्याला वधावे.
मग याजकाने आपला सणाचा झगा व चोळणा अंगात घालून होमार्पणमुळे वेदीवर राहिलेली राख उचलावी व ती वेदी जवळ ठेवावी.
ज्या माणसाला किंवा वस्तूला त्या मांसाचा स्पर्श होईल तो माणूस किंवा ती वस्तू पवित्र होईल;“त्याचे रक्त जर कोणाच्या वस्त्रावर उडाले तर ते वस्त्र तू पवित्र स्थानीं धुवावे.
“याजकाच्या घराण्यातील प्रत्येक पुरुषाला पापार्पणाचे मांस खाण्याचा हक्क आहे; ते परम पवित्र आहे;
अहरोन याजकाच्या वंशापैकी कोणास असे व्यंग असेल तर त्याने परमेश्वराला अर्पण किंवा अन्न अर्पावयास वेदीजवळ जाऊं नये;
तुझ्या वंशजापैकी कोणी जर त्या पवित्र वस्तूना हात लावील, तर तो अपवित्र ठरेल; त्याला मजसमोरुन दूर करावे! इस्राएल लोकांनी त्या वस्तू मला अर्पण केल्या आहेत. मी परमेश्वर आहे.
त्या गोष्टी फकत पवित्र जागेतच खा. तुझ्या कुटुंबातला प्रत्येक पुरुष ते खाऊ शकतो. पण ती अर्पणे पवित्र आहेत हे तू लक्षात ठेव.
“समजा एखादा माणूस वस्त्रांमधून मांस नेतो. ते मांस परमेश्वराला अर्पण करण्यासाठी आहे म्हणून ते पवित्र आहे. पण ज्या वस्त्रांत ते गुंडाळले आहे, त्या वस्त्राचा स्पर्श भाकरी, किंवा शिजविलेले अन्न, मद्य, तेल किंवा इतर अन्नाला झाला, तर ह्या स्पर्श झालेल्या सर्व वस्तू पवित्र होतील का?”याजक उत्तरले, “नाही”
त्यावेळी, सर्व गोष्टी देवाच्या मालकीच्या असतील अगदी घोड्यांच्या सरंजामावरसुध्दा परमेश्वरासाठी पवित्र अशी चिठ्ठी असेल. परमेश्वराच्या मंदिरात वापरली जाणारी भांडी, वेदीवर वापरल्या जाणाऱ्या कटोऱ्यांइतकीच महत्वाची असतील.
कारण असे लिहिले आहे: “पवित्र व्हा, कारण मी पवित्र आहे.”
पण तुम्ही निवडलेले लोक आहात. तुम्ही राज्याचे याजक आहात, तुम्ही पवित्र राष्ट्र आहात, तुम्ही देवाचे असलेले लोक आहात, यासाठी की, ज्या देवाने तुम्हाला अंधारातून काढून त्याच्या अदभुत प्रकाशात आणले त्याची सामर्थ्यशाली कृत्ये तुम्ही प्रकट करावी.