“भूमीच्या सर्व उत्पन्नाचा एकदशांश भाग म्हणजे शेतातील सर्व उपज आणि झाडे वेली ह्यांची फळे ह्यांचा एकदशांश भाग परमेश्वराकरिता आहे.
Cross references
त्या परात्पर देवाने तुझ्या शत्रूंचा पराभव करण्यास तुला मदत केली त्या परात्पर देवाचा आम्ही धन्यवाद करतो.”तेव्हा अब्रामाने लढाईच्या काळात त्याच्याजवळून जे जे घेतले होते त्याचा दहावा भाग मलकीसदेकाला दिला.
मी हा धोंडा या ठिकाणी स्मारकस्तंभ म्हणून उभा करुन ठेवतो, त्यावरुन परमेवराकरिता हे पवित्र ठिकाण आहे असे दिसेल आणि देवाने मला दिलेल्या सर्वाचा दशांश म्हणजे दहावा भाग मी देवाला अर्पण करीन.”
मग हंगामाच्या वेळी तुमच्या उत्पन्नातील पांचवा हिस्सा फारोला दिलाच पाहिजे; बाकीचे चार हिस्से तुम्ही तुमच्याकारिता घ्यावेत. त्यातून पुढच्या वर्षाकरिता तुम्ही बियाणे ठेवावे व बाकीच्या धान्याचा तुमच्या घरातील लहानथोरांस खाण्यासाठी उपयोग करावा.”
त्यावेळी मग योसेफाने देशासाठी एक कायदा केला, तो आजपर्यंत चालू आहे; त्या कायद्याप्रमाणे जमिनीच्या उत्पन्नचा पाचवा भाग फारोचा आहे. फारो मिसरमधील सर्व जमिनीचा मालक आहे; फक्त याजकांची जमीन फारोच्या मालकीची नाही.
“इस्राएलाचे लोक त्यांच्या जवळच्या सर्व गोष्टीतला दहावा हिस्सा देतील. म्हणून तो दहाव्वा भाग मी लेवीच्या सर्व वंशजांना देतो. ते दर्शन मंडपात जे काम करतील त्याचा हा मोबदला आहे.
परंतु इस्राएल लोकांजलऴ जे आहे त्याच्या दहावा भाग ते मला देतील. आणि तो दहावा भाग मी लेवी लोकांना देईन. म्हणून मी लेवी लोकांबद्दल असे बोललो: त्या लोकांना मी इस्राएल लोकांना जी जमीन देणार आहे ती मिळणार नाही.”
तुमचा देव परमेश्वर तुमच्या सर्व वसाहतीतून एक विशिष्ट स्थान निवडून घेईल. आपल्या नावाची स्थापना तेथे करील. ते त्याचे खास निवासस्थान असेल. तेथे तुम्ही उपासनेसाठी जात जा.
“दरवर्षी तुमच्या शेतात पिकवलेल्या धान्याचा एक दशांश हिस्सा काढून ठेवा.
ही आज्ञा सर्व प्रजेच्या कानी गेली. त्याबरोबर इस्राएल लोकांनी आपले धान्याचे पीक, द्राक्ष, तेल, मध आणि इतर बागायती उत्पन्न या सगळ्याचा एकदशांश भाग आणून दिला.
यहूदातील नगरवासी इस्राएली व यहूदी लोकांनीही आपली गुरे आणि शेळ्यामेंढ्या यांचा दहावा हिस्सा जमा केला. परमेश्वर देवाप्रीत्यर्थ आखून दिलेल्या जागेत धान्याच्याही राशी त्यांनी आणून ओतल्या. त्यांनी या सर्व वस्तूंचे ढीग रचले.
याजकांनी परमेश्वरासाठी अर्पण केलेल्या वस्तू धान्याचा अथवा पशूंचा दहावा हिस्सा, इतर काही वाहिलेल्या गोष्टी आत आणल्या आणि मंदिरातील कोठारात जमा केल्या. कोनन्या लेवी हा या भांडारावरचा प्रमुख अधिकारी होता. शिमी त्याच्या हाताखाली होता. शिमी कोनन्याचा भाऊ होता.
“तसेच परमेश्वराच्या मंदिरातील कोठारांसाठी याजकांकडे पुढील गोष्टी आणू: पिठाचा पहिला उंडा. धान्यार्पणाचा पहिला भाग, आमच्या सर्व वृक्षांच्या फळांचा पहिला बहार, नवीन काढलेला द्राक्षारस आणि तेल यांचा पहिला भाग, या गोष्टी. तसेच लेवींना आमच्या पिकातला एक दशांश भाग देऊ. कारण ते सर्व नगरांतून आमच्या उत्पन्नाचा दहावा भाग घेतात.
लेवी या धान्याचा स्वीकार करतील तेव्हा अहरोनाच्या वंशातील एखादा याजक त्यांच्याबरोबर असावा. मग लेवींनी ते धान्या देवाच्या, मंदिरात आणावे व मंदिराच्या कोठारांमध्ये जमा करावे.
त्यादिवशी कोठारांवरील लोकांच्या नेमणुका केल्या आपल्या झाडांची पहिली फळे वहिली आणि धान्यातला एकदशांश वाटा लोक घेऊन आले. कोठारप्रमुखांनी या वस्तू कोठारात ठेवल्या. सेवेत असलेले याजक व लेवी यांच्याबद्दल यहुद्यांना अतिशय समाधान होते. म्हणून त्यांनी कोठारात ठेवायला पुष्कळशा गोष्टी आणून दिल्या.
त्यानंतर यहुदातील सर्व लोकांनी पिकाचा एकदशांश वाटा, नवीन द्राक्षारस आणि तेल मंदिरात आणले. या सगळया गोष्टी कोठारात ठेवण्यात आल्या.
“देवाकडे चोरी करण्याचे सोडून द्या. देवाकडे चोरी करु नये. पण तुम्ही माझ्या वस्तू चोरल्या.”“तुम्ही मला विचारता, ‘आम्ही तुझे काय चोरले?’“तुम्ही मला तुमच्या वस्तूंचा एक दशांश भाग द्यायला हवा. खास भेटी द्यायला हव्यात. पण तुम्ही हे मला देत नाही.
परूश्यांनो, नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुम्ही दु:खी व्हाल. तुम्ही ढोंगी आहात! तुमचे जे काही आहे त्याचा दशांश तुम्ही देवाला देता- पुदिना, शेप, जिरे यांचा देखील दंशाश देता. पण नियमशास्त्राच्या महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे- न्यायाने वागणे, दया दाखविणे व प्रामाणिकपणे वागणे हे तुम्ही पाळत नाही. या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत व तसेच इतरही केल्या पाहिजेत.
परुश्यांनो तुम्हाला धिश्चार असो कारण तुम्ही पश्चात्ताप करता व पुदिन्याचा व प्रत्येक वनस्पतीचा दशांश देता. परंतु तुम्ही न्याय आणि देवाविषयीचे प्रेम याकडे दुर्लक्ष करता. तुम्ही या गोष्टी प्रथम काराव्यात व मुख्य गोष्टींकडे दुर्लक्ष करु नये.
उलट मी आठवड्यातून दोनदा उपास करतो, व माझ्या सर्व उत्पन्राचा दहावा भाग देतो.’
आणि लेवीचे वंशज जे याजक झाले त्यांनी मोशेच्या नियमशास्त्रातील आज्ञेप्रमाणे लोकांकडून (आपल्या सहोदरांकडून), जरी ते अब्राहामाचे वंशज होते तरी, दशांश गोळा करावा.