Home Bibles लेवीय 27:16 · मराठी बायबल
लेवीय 27:16 · मराठी बायबल

“एखाद्याने आपल्या शेतीचा काही भाग परमेश्वराला वाहिला तर त्यात किती बियाणे पेरले जाते त्यावरुन त्याचे मोल ठरेल; एक होमरसुमारे सहा बुशेल जवासाठी पन्नास शेकेलरुपे अशी किमत असावी.

Cross references

यशया 5:10

तेव्हा दहा एकराच्या द्राक्षाच्या मळ्यातून अगदी थोडा द्राक्षरस मिळेल आणि खूप पोती बियाणे वापरले तरी अगदी थोडे पीक येईल.”

यहेज्केल 45:11

एफा (कोरडे पदार्थ मोजण्याचे माप) बाथ (द्रव पदार्थ मोजण्याचे माप) सारख्याच आकाराचे असू द्या. ही मापे होमरच्या परिमाणात असली पाहिजेत. म्हणजे एफ व बाथ 1/10 होमर इतक्या मापाची असावीत.

होशेय 3:2

म्हणून मी सहा औस चांदी व 9 बुशेल जव देऊन गोमरला विकत घेतले.

प्रेषितांचीं कृत्यें 4:34

त्यांना आवश्यकता भासे ते सर्व त्यांना मिळत असे. प्रत्येक जण ज्याची स्वत:ची शेत (जमीन) होती किंवा घर होती, त्यांनी ते पैशासाठी विकले व विकून आलेले पैसे त्यांनी प्रेषितांच्या हवाली केले.

प्रेषितांचीं कृत्यें 5:4

ती जमीन विकण्यापूर्वी तुझी होती. आणि विकल्यानंतर सुद्धा ते पैसे तुला जसे पाहिजे तसे खर्च करता आले असते. अशी वाईट गोष्ट करावी असा विचार तू का केलास? तू मनुष्यांशी नाही, तर देवाशी खोटे बोललास!”

Interlinear

Choose Theme