“तुम्ही आपणासाठी मूर्ती करु नका; तसेच कोरीव मूर्ती किंवा स्मारक स्तंभ आठवणींचा बुरुज-उभारु नका अथवा पूजा करण्यासाठी आपल्या देशात, कोरीव पाषाण स्थापन करु नका; कारण मी परमेश्वर तुमचा देव आहे!
Cross references
“तू आपल्यासाठी कोरीव मूर्ती करु नकोस; वर आकाशातील, खाली पृथ्वीवरील व पृथ्वीखालच्या जलातील कशाचीही प्रतिमा करु नकोस;
माझ्या स्पर्धेत तुम्ही सोन्या चांदीच्या मूर्ती करु नये असे खोटे देव तुम्ही करता कामा नये.”
“परंतु या सर्व लोकांच्या दैवतांची पूजा करु नका; त्यांना नमन करु नका; त्याच्या चालीरीतीप्रमाणे तुम्ही कधीही वागू नये; त्यांच्या मूर्तीचा तुम्ही नाश करावा, आणि त्यांच्या मूर्तीच्या स्मारकांचे दगड व स्तंभ तोडून फोडून टाकावे.
“तुम्ही आपल्यासाठी ओतीव मुर्ती करु नका.
अहरोनाच्या मुलांपैकी जो कोणी शांत्यर्पणाचे रक्त व चरबी अर्पील त्याचा त्या मांडीवर हक्क असावा.
“तुम्ही मूर्तीपूजा करु नका, आपल्यासाठी ओतीव देव करु नका. मी तुमचा देव परमेश्वर आहे!
तिथे जे लोक तुम्हाला आढळतील त्यांच्यापासून तुम्ही तो प्रदेश घ्याल. तेव्हा तुम्ही त्यांच्या कोरीव पुतळयांचा आणि मूर्तीचा नाश करा. त्यांच्या उंचावरच्या पुजेच्या ठिकाणांचा नाश करा.
तेव्हा जपून असा. कोणत्याही सजीवाची प्रतिमा किंवा खोटी दैवते उभारण्याचे पाप करुन स्वत:ला बिघडवू नका. स्त्री किंवा पुरुषासारखी दिसणारी मूर्ती करु नका.
“तुम्ही कोणतीही मूर्ती करु नका. आकाश, पृथ्वी किंवा पाणी यातील कोणाचीही प्रतिमा किंवा मूर्ती करु नका.
“जेव्हा तुमचा देव परमेश्वर यासाठी तुम्ही वेदी उभाराल तेव्हा तिच्याशेजारी अशेरा देवीच्या सन्मानार्थ लाकडी स्तंभ उभारु नका.
“मूर्ती घडवून तिची गुप्तपणे स्थापना करणारा शापित असो. या मूर्ती म्हणजे कोणा कारागिराने लाकूड, दगड किंवा धातू यांच्यापासून घडवलेल्या असतात. परमेश्वराला अशा गोष्टींचा तिटकारा आहे! “तेव्हा सर्व लोकांनी ‘आमेन’ म्हणावे.
दान लोकांनी या मूर्तीची दान शहरात स्थापना केली. गेर्षेामचा मुलगा योनाथन याला याजक म्हणून नेमले. गेर्षेम हा मोशेचा मुलगा. इस्राएल लोकांचा पाडाव होऊन त्यांनी बाबिलोनला बंदी म्हणून नेईपर्यंत योनाथन व त्याची मुले दान वंशजांचे याजक म्हणून पौरोहित्य करत होती.
इतर लोकांचे ते अनुकरण करु लागले. त्या लोकांना परमेश्वराने इस्राएलीखातर तेथून हुसकावू लावले होते. शिवाय देवाऐवजी इस्राएल लोकांनी राजाची सत्ता पत्करली.
प्रत्येक टेकडीवर आणि हिरव्यागार झाडाखाली त्यांनी स्मृतिस्तंभ आणि अशेराचे खांब उभारले.
परमेश्वर देवाच्या आज्ञा पाळणे इस्राएल लोकांनी अजिबातच थांबवले. त्यांनी वासरांच्या दोन सुवर्णमूर्ती केल्या, अशेराचे खांब उभारले, आकाशातील सर्व ताऱ्यांची आणि बालदेवतेची त्यांनी पूजा केली.
लोक त्यांच्या मूर्तीची पूजा करतात. ते त्यांच्या “देवाला” नावजतात. परंतु त्या लोकांना लाज वाटेल. त्यांचे “देव” परमेश्वरापुढे झुकतील आणि त्याची प्रार्थना करतील.
त्या देशांचे “देव” सोन्या चांदीचे नुसते पुतळे आहेत. कुणीतरी केलेले ते नुसते पुतळे आहेत.
त्या वेळी लोक आपल्याजवळील सोन्याचांदीच्या मूर्ती फेकून देतील. (लोकांनी ह्या मूर्ती पूजेसाठी घडविल्या होत्या.) वटवागुळे व चिचुंद्र्या राहतात अशा बिळांत लोक त्या मूर्ती टाकून देतील.
काही लोक मूर्ती करतात. (म्हणजेच खोटे देव करतात.) पण त्यांचा काही उपयोग नाही. लोक त्या मूर्तीवर प्रेम करतात पण त्यांना काही किंमत नाही. हे लोक त्या मूर्तीचे साक्षीदार आहेत पण ते काही पाहू शकत नाहीत. ते काही जाणत नाहीत. आपल्या कृत्यांबद्दल लज्जित व्हावे एवढेही ज्ञान त्यांना नाही.
म्हणूनच गोष्टी घडायच्या कितीतरी आधी मी तुम्हाला त्या गोष्टीबद्दल सांगितले, असे सांगण्याचे कारण हेच की आम्ही आमच्या सामर्थ्यावर हे सर्व केले असे तुम्ही म्हणू नये. ‘आमच्या मूर्तीनी हे सर्व घडवून आणले’ असे तुम्ही म्हणू नये म्हणून मी हे केले.”
त्या लोकांच्या चालीरीती अर्थशून्य आहेत. त्यांच्या मूर्ती म्हणजे दुसरे काही नसून जंगलातील लाकडे आहेत कामगार लाकूड पटाशीने छिनून त्या मूर्ती बनवितो.
आपण देवाची मुले आहोत. म्हणून इतर लोक ज्या प्रकारे समजतात त्या प्रकारचा देव आहे असे आपण मुळीच समजू नये. तो सोने, चांदी, किंवा दगडासारखा नाही.
तुम्ही व्यभिचार करु नये असे म्हणता ते तुम्ही व्यभिचार का करतां? तुम्ही मूर्तिचा तिरस्कार करता पण देवळात चोरी करता?
तर मी काय म्हणतो? माइया म्हणण्याचा अर्थ असा आहे का की मूर्तिला वाहिलेले अन्र काहीतरी आहे किंवा ती मूर्ति काहीतरी आहे?
आणि त्याला पहिल्या श्वापदासमोर चिन्हे करण्याचा अधिकार दिला होताम्हणून ते म्हणजे जे श्र्वापद जखमी होऊनही वाचले, त्याची मूर्ति बनवून त्याची भक्ति करावी अशी पृथ्वीवर राहणाऱ्यालोकांना आज्ञा करतो.
परंतु “कुत्रे” चेटकी, जादूटोणा करणारे, व्यभिचारी, मूर्तिपूजा करणारे, आणि निरनिराळ्या रीतीने लबाडीकरणारे व लबाड बोलणारे बाहेर राहतील.