“त्याच निसान महिन्याच्या पंधराव्या दिवशी बेखमीर भाकरीच्या सणाचा दिवस येतो. तेव्हा तुम्ही सात दिवस बेखमीर-खमीर न घातलेली भाकर खावी.
Cross references
तसेच सणाच्या दिवासांत तुम्ही सात दिवस खमीर न घातलेली भाकर खावी; ह्या सणाच्या पहिल्या दिवशी तुम्ही प्रत्येकाने आपल्या घरातील सर्व खमीर काढून टाकावे व पूर्ण सात दिवस तुम्ही खमीर न घातलेली भाकर खावी. तुम्हातील जर कोणी खमीर घातलेली भाकर खाईल तर त्याला तुम्ही इस्राएल लोकांमधून बाहेर टाकावे.
“या सात दिवसात तुम्ही बेखमीर भाकर खावी. सातव्या दिवशी मोठी मेजवानी करून तुम्ही हा सण पाळावा;
पहिली सुट्टी बेखमीर भाकरीच्या सणाची होय. मी आधी आज्ञा दिल्याप्रमाणे तुम्ही हा सण पाळावा; त्यात सात दिवस खमीर न घातलेली भाकर तुम्ही खावी; हा सण तुम्ही अबीब महिन्यात पाळावा, कारण याच महिन्यात तुम्ही मिसरमधून बाहेर निघून आला; या सणाच्या वेळी प्रत्येक माणसाने माझ्यासाठी अर्पण आणावे.
“बेखमीर भाकरीचा सण पाळ, मी पूर्वी दिलेल्या आज्ञेप्रमाणे नेमलेल्या वेळी अबीब महिन्यातील सात दिवस पर्यत तुम्ही बेखमीर भाकर खावी कारण ह्याच महिन्यात मिसर देशातून तुम्ही बाहेर आलात.
बेखमीर भाकरीचा सण महिन्याच्या 15 व्या दिवशी सुरु होतो. हा सण सात दिवस असेल. खमीराशिवाय (यीस्ट) केलेली भाकरीच फक्त तुम्ही खाऊ शकता.
सहा दिवस खमीर विरहीत भाकर खा. सातव्या दिवशी कोणतेही कामकाज करु नये. या दिवशी सर्वांनी एकत्र येऊन तुमचा देव परमेश्वर ह्याप्रित्यर्थ पवित्र मेळा भरवावा.
हेरोदाने पाहिले की, यहूदी लोकांना हे आवडले आहे.म्हणून त्याने पेत्रालासुद्धा अटक करण्याचे ठरविले. (हे वल्हांडण सणाच्या काळात घडले.)