Home Bibles लेवीय 23:5 · मराठी बायबल
लेवीय 23:5 · मराठी बायबल

पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी संध्याकाळापासून परमेश्वराचा वल्हांडण सण आहे.

Cross references

निर्गम 12:2

“हा तुमच्या वर्षाचा पहिला महिना असे.

निर्गम 12:11

ते खाण्या अगोदर तुम्ही प्रवासास जाण्याच्या तयारीने अंगावर कपडे घालावेत, पायात जोडे घालावेत आणि हातात काठी घ्यावी आणि मग घाईघाईने ते मांस खावे; कारण हा परमेश्वराचा वल्हांडण सण आहे.

निर्गम 12:18

तेव्हा पहिल्या महिन्यातील (निसान महिन्यातील) चौदाव्या दिवसाच्या संध्याकाळपासून ते त्या महिन्याच्या एकविसाव्या दिवसाच्या संध्याकाळपर्यत तुम्ही बेखमीर भाकरी खाव्या.

निर्गम 13:3

मोशे लोकांना म्हणाला, “आजच्या दिवसाची आठवण ठेवा. तुम्ही मिसर देशात गुलाम म्हणून होता; परंतु ह्या दिवशी परमेश्वराने आपल्या महान सामर्थ्याने तुम्हांस गुलामगिरीतून सोडवून बाहेर आणले म्हणून तुम्ही खमीर घातलेली भाकर खाऊ नये.

निर्गम 23:15

पहिली सुट्टी बेखमीर भाकरीच्या सणाची होय. मी आधी आज्ञा दिल्याप्रमाणे तुम्ही हा सण पाळावा; त्यात सात दिवस खमीर न घातलेली भाकर तुम्ही खावी; हा सण तुम्ही अबीब महिन्यात पाळावा, कारण याच महिन्यात तुम्ही मिसरमधून बाहेर निघून आला; या सणाच्या वेळी प्रत्येक माणसाने माझ्यासाठी अर्पण आणावे.

गणना 9:2

“इस्राएल लोकांना ठरलेल्या वेळी वल्हांडण सण पाळण्यास सांग.

गणना 28:16

“परमेश्वराचा वल्हांडण महिन्याच्या 14 व्या दिवशी असेल.

अनुवाद 16:1

“अबीब महिन्यात लक्षात ठेवून तुमचा देव परमेश्वराप्रित्यर्थ वल्हांडण हा सण साजरा करा. कारण याच महिन्यात तुमचा देव परमेश्वर याने तुम्हाला रात्रीच्या वेळी मिसरमधून बाहेर काढले.

यहोशवा 5:10

यरीहोच्या पठारावर गिलगाल येथे मुक्काम असताना इस्राएल लोकांनी वल्हांडणाचा सण साजरा केला. ती त्या महिन्याची चतुर्दशीची संध्याकाळ होती.

2 इतिहास 35:18

शमुवेल संदेष्ट्यांच्या काळापासून हा सण एवढ्या मोठ्या प्रमाणात साजरा झाला नव्हता. इस्राएलच्या कुठल्याच राजाच्या कारकीर्दींत हे झाले नव्हते. राजा योशीया, याजक, लेवी, यहूदा आणि इस्राएलमधून आलेले लोक आणि यरुशलेमची प्रजा यांनी वल्हांडणाचा उत्सव थाटामाटाने केला.

मत्तय 26:17

बेखमीर भाकारीच्या सणाच्या पहिल्या दिवशी येशूचे शिष्य त्याच्याकडे आले. ते म्हणाले, “वल्हांडण सणाच्या जेवणाची सर्व तयारी आम्ही करणार आहोत. वल्हांडण सणाचे जेवण कोठे करावे अशी तुमची इच्छा आहे?”

मार्क 14:12

बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी जेव्हा वल्हांडण सणाचा कोकरा मारीत असत तेव्हा येशूचे शिष्य त्याला म्हणाले, “आम्ही जातो आणि वल्हांडण सणाच्या भोजनाची तयारी करतो. आम्ही कोठे जाऊन तयारी करावी अशी आपली इच्छा आहे?”

लूक 22:7

बेखमीर भाकरीचा सण, ज्या दिवशी वल्हांडणाचे कोकरु मारावयाचे तो दिवस आला.

1 करिंथकरांस 5:7

जुने खमीर काढून टाका. यासाठी की, तुम्ही नवीन पीठाचा गोळा व्हावे आणि ख्रिस्ती लोकांसारखे तुम्ही असे आहात: बेखमीर, कारण ख्रिस्त, आपला वल्हांडणाचा कोकरा आम्हांला शुद्ध करण्यासाठी त्याचे अर्पण झाले.

Interlinear

Choose Theme