तुमच्यातील प्रत्येकाने आपली आई व आपला बाप ह्यांचा मान राखलाच पाहिजे आणि माझे शब्बाथ पाळलेच पाहिजेत; मी तुमचा देव परमेश्वर आहे!”
Cross references
मग योसेफाने आपल्या मुलांना इस्राएलाच्या मांडीवरुन काढून घेतले; ते मुलगे इस्राएला समोर उभे राहिले व त्यांनी त्याला लवून नमन केले.
पाहा तुम्ही विसावा घ्यावा यासाठी परमेश्वराने शब्बाथ दिवस बनविला आहे; म्हणून शुक्रवारी परमेश्वर तुम्हाला दोन दिवस पुरेल एवढे अन्न देतो, तेव्हा शब्बाथ दिवशी तुम्ही आहात तेथे बसून विसावा घ्यावा.”
“शब्बाथ दिवस हा पवित्र दिवस म्हणून पाळण्याची आठवण ठेव;
“तू आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख म्हणजे त्यामुळे परमेश्वर तुझा देव जो देश तुला देत आहे त्या देशात तुला दीर्घायुष्य लाभेल.
“जो माणूस आपल्या आईबापास मारहाण करील त्याला अवश्य ठार मारावे.
“जो कोणी आपल्या बापाला किंवा आईला शिव्याशाप देईल त्या माणसाला अवश्य जिवे मारावे.
“इस्राएल लोकांना हे सांग की विश्रांतीच्या पवित्र दिवसासंबंधी मी सांगितलेले नियम तुम्ही अवश्य पाळावेत, ते या करता की त्यावरून ते पिढ्यान्पिढ्या तुमच्या माझ्यामध्ये खून म्हणून राहतील आणि त्यामुळे मी जो परमेश्वर त्या मी तुम्हाला माझे पवित्र लोक केले आहे हे तुम्हाला कळेल;
कारण मी परमेश्वर, तुमचा देव आहे! मी पवित्र आहे! म्हणून तुम्ही ही आपणांस पवित्र असे ठेवावे! म्हणून जमिनीवर रांगणाऱ्या कोणत्याही जातीच्या प्राण्यामुळे तुम्ही आपणास विटाळवू नका!
मग पाचव्या वर्षी तुम्ही त्यांची फळे खावी. असे केल्याने त्यांना तुमच्यासाठी अधिकात अधिक फळे येतील. मी तुमचा देव परमेश्वर आहे!
“तुम्ही माझे शब्बाथ, काम न करिता विसाव्याचे दिवस म्हणून पाळावे. तुम्ही माझ्या पवित्रस्थानाविषयी आदर बाळगावा. मी परमेश्वर आहे!
सल्लामसलत विचारण्यासाठी पंचाक्षऱ्याकडे किंवा चेटक्याकडे जाऊ नका; त्यांच्या मागे लागू नका; ते तुम्हाला अशुद्ध करतील. मी तुमचा देव परमेश्वर आहे!
तुमच्याबरोबर राहणाऱ्या परदेशीय माणसाला स्वदेशीय माणसासारखेच माना; आणि त्याच्यावर स्वत: सारखीच प्रीती करा; कारण तुम्हीही एके काळी मिसरदेशात परदेशीय होता. मी तुमचा देव परमेश्वर आहे!
“तुम्ही माझ्या पवित्र विसाव्याच्या दिवसांची पवित्र शब्बाथांची-आठवण ठेवून ते पाळावे आणि माझ्या पवित्र स्थांनाविषयी आदर बाळगावा. मी परमेश्वर आहे!
“एखाद्याचा मुलगा हट्ठी अजिबात न ऐकणारा, आईबापांना न जुमानणारा निघतो. शिक्षा केली तरी काही फरक पडत नाही.
“नंतर लेवींनी लोकांना सांगावे ‘आपल्या आईवडीलांचा अनादर दाखवणारी कृत्ये करतो तो शापित असो.’ “तेव्हा सर्व लोकांनी ‘आमेन’ म्हणावे.
शब्बाथ या तुझ्या विश्रांतीच्या खास दिवसाचा त्यांना परिचय करून दिलास. तुझा सेवक मोशे याच्या हस्ते तू त्यांना आज्ञा, नियम आणि धर्मशास्त्र दिलेस.
मुला,तू तुझ्या वडिलांची शिकवण पाळली पाहिजेस. आणि तू तुझ्या आईची शिकवणही पाळायला हवीस.
माझ्या मुला, तुझ्या वडिलांची आज्ञा लक्षात ठेव. आणि तुझ्या आईची शिकवण विसरु नकोस.
तुझे वडील तुला ज्या गोष्टी सांगतात त्या ऐक. तुझ्या वडिलांशिवाय तू कधीही जन्माला आला नसतास. तुझी आई म्हातारी झाली तरी तिचा आदर कर.
काही लोक त्यांच्या वडिलांविरुध्द बोलतात आणि ते त्यांच्या आईबद्दल आदर दाखवीत नाहीत.
जो माणूस त्याच्या वडिलांची चेष्टा करतो वा त्याचा आईचे ऐकत नाही त्याला शिक्षा होईल. त्याचे डोळे गिधाडाने वा एखाद्या रानटी पक्ष्याने खाण्याइतके वाईट त्याच्या बाबतीत घडेल.
ह्या नपुसकांनी असे म्हणू नये कारण परमेश्वर म्हणतो, “ह्यातील काही शब्बाथचा नियम पाळतात. मला पाहिजे त्याच गोष्टी निवडून करतात. खरोखरच ते माझ्या कराराप्रमाणेवागतात म्हणून मी माझ्या मंदिरात त्यांच्या स्मरणार्थ एक शिला ठेवीन. माझ्या नगरात त्यांच्या नावांचे स्मरण केले जाईल. मी त्यांना संततीपेक्षा काही चांगल्या गोष्टी देईन. मी त्यांना चिरंतन राहणारे नाव ठेवीन. मी त्यांना माझ्या माणसांतून तोडून अलग करणार नाही.”
तुम्ही देवाच्या शब्बाथच्या नियमाविरूध्द वागून पाप करण्याचे थांबवाल आणि विशेष दिवशी स्वत:च्या खुषीकरिता काही करण्याचे टाळाल तेव्हा हे घडून येईल. तुम्ही शब्बाथला आनंदाचा दिवस मानावे. परमेश्वराच्या विशेष दिवसाचा तुम्ही मान राखावा. रोज तुम्ही जे करता आणि जे बोलता ते करण्याचे वा बोलण्याचे टाळून तुम्ही त्या दिवसाचा मान राखावा.
मी त्यांना विश्रांतीच्या खास दिवसाबद्दलही सांगितले. त्या सुट्ट्या म्हणजे त्यांच्या व माझ्यामधील विशेष संकेत होते, खूण होती. मीच परमेश्वर आहे व ह्या माणसाना, मी, माझी विशेष (पवित्र) माणसे करीत आहे हेच त्या खुणेवरुन दिसे.
यरुशलेमचे लोक आई - वडिलांचा मान ठेवीत नाहीत. राहणाऱ्या परदेशींयांना ते त्रास देतात. ते विधवांना व अनाथांना फसवितात.
सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणाला, “मुले वडिलांना मान देतात. सेवक मालकांना मान देतात. मी तुमचा पिता आहे, मग तुम्ही माझा आदर का करीत नाही? मी तुमचा प्रभू आहे, मग मला तुम्ही मान का देत नाही? याजकांनो, तुम्ही माझ्या नावाचा मान राखत नाही.”उलट तुम्ही म्हणता “आम्ही तुझ्या नावाचा मान राखत नाही, असे तुला वाटावे असे आम्ही काय केले आहे?”
कारण देवाने सांगितले आहे की, तुझ्या आईवडिलांचा मान राखआणि जो कोणी आपल्या आईवडिलांबद्दल वाईट बोलतो, त्याला जिवे मारावे.
मुलांनो, प्रभूशी प्रामणिक राहून आपल्या आईवडिलांच्या आज्ञा पाळा. कारण ते योग्य आहे.
याशिवाय आम्हा सर्वांना जगिक पिता असताना त्यांनी आम्हाला शिस्त लावली आणि त्याबद्दल आम्ही त्यांचा आदर राखला. तर मग आम्ही आमच्या आध्यात्मिक पित्याच्या किती तरी अधिक प्रमाणात अधीन होऊन जगले पाहिजे बरे?