Home Bibles नीतिसूत्रे 30:11 · मराठी बायबल
नीतिसूत्रे 30:11 · मराठी बायबल

काही लोक त्यांच्या वडिलांविरुध्द बोलतात आणि ते त्यांच्या आईबद्दल आदर दाखवीत नाहीत.

Cross references

निर्गम 21:17

“जो कोणी आपल्या बापाला किंवा आईला शिव्याशाप देईल त्या माणसाला अवश्य जिवे मारावे.

लेवीय 20:9

“जो माणूस आपल्या बापाला किंवा आपल्या आईला शिव्याशाप देईल त्याला अवश्य जिवे मारावे;त्याने आपल्या बापाला व आपल्या आईला शिव्याशाप दिला आहे म्हणून त्याच्या रक्तपाताची जबाबदारी त्याच्याच माथी राहील.

अनुवाद 21:20

त्यांनी सांगावे की, हा उद्दाम आहे. आमचे ऐकत नाही. तसेच तो खादाड व मद्यपी आहे.

अनुवाद 27:16

“नंतर लेवींनी लोकांना सांगावे ‘आपल्या आईवडीलांचा अनादर दाखवणारी कृत्ये करतो तो शापित असो.’ “तेव्हा सर्व लोकांनी ‘आमेन’ म्हणावे.

नीतिसूत्रे 20:20

जर एखादा माणूस त्याच्या आईविरुध्द किंवा वडिलांविरुध्द बोलला तर तो अंधार होणारा प्रकाश आहे.

नीतिसूत्रे 23:22

तुझे वडील तुला ज्या गोष्टी सांगतात त्या ऐक. तुझ्या वडिलांशिवाय तू कधीही जन्माला आला नसतास. तुझी आई म्हातारी झाली तरी तिचा आदर कर.

नीतिसूत्रे 30:12

काही लोकांना आपण चांगले आहोत असे वाटत असते पण ते खरोखरच वाईट असतात.

नीतिसूत्रे 30:17

जो माणूस त्याच्या वडिलांची चेष्टा करतो वा त्याचा आईचे ऐकत नाही त्याला शिक्षा होईल. त्याचे डोळे गिधाडाने वा एखाद्या रानटी पक्ष्याने खाण्याइतके वाईट त्याच्या बाबतीत घडेल.

मत्तय 3:7

योहान जेथे लोकांना बाप्तिस्मा देत होता तेथे अनेक परूशीआणि सदूकीआले. जेव्हा योहानाने त्यांना पाहिले तेव्हा तो त्यांना म्हणाला, “अहो, सापाच्या पिल्लांनो, देवाचा जो राग ओढवणार आहे त्याच्यापासून दूर पळण्याचे तुम्हांला कोणी सुचविले?

मत्तय 15:4

कारण देवाने सांगितले आहे की, तुझ्या आईवडिलांचा मान राखआणि जो कोणी आपल्या आईवडिलांबद्दल वाईट बोलतो, त्याला जिवे मारावे.

मार्क 7:10

मोशे म्हणाला, “तू आपल्या आईवडिलांचा सन्मान कर.”जो मनुष्य आपल्या वडिलांबद्दल किंवा आईबद्दल वाईट बोलतो, त्याला ठार मारलेच पाहिजे.

1 तीमथ्याला 5:4

पण जर एखाद्या विधवेला मुले किंवा नातवंडे असतील तर त्यांनी प्रथम आपल्या घरच्यांची काळजी घेऊन आपला धर्म प्रत्यक्षात आणावा आणि अशा प्रकारे आपल्या आईवडिलांची किंवा आजीआजोबांची परतफेड करावी. कारण हे देवाला मान्य आहे.

1 तीमथ्याला 5:8

पण जर कोणी त्याच्या स्वत:च्या नातेवाईकासाठी आणि विशेषत: त्याच्या कुटुंबातील जवळच्यांसाठी तरतूद करीत नाही, तर त्याने विश्वास नाकारलेला आहे. व तो अविश्वासू माणसांपेक्षा वाईट आहे.

1 पेत्र 2:9

पण तुम्ही निवडलेले लोक आहात. तुम्ही राज्याचे याजक आहात, तुम्ही पवित्र राष्ट्र आहात, तुम्ही देवाचे असलेले लोक आहात, यासाठी की, ज्या देवाने तुम्हाला अंधारातून काढून त्याच्या अदभुत प्रकाशात आणले त्याची सामर्थ्यशाली कृत्ये तुम्ही प्रकट करावी.

Interlinear

Choose Theme