Home Bibles लेवीय 11:1 · मराठी बायबल
लेवीय 11:1 · मराठी बायबल

परमेश्वर मोशे व अहरोन ह्यांना म्हणाला:

Cross references

उत्पत्ति 7:2

अर्पणासाठी वरील प्रत्येक जातीच्या शुद्ध प्राण्यापैकी नरमाद्यांच्या सात जोड्या, इतर अशुद्ध प्राण्यापैकी नरमादी अशी एकच जोड़ी,

उत्पत्ति 8:20

त्यानंतर नोहाने परमेश्वराकरिता एक वेदी बांधली आणि देवाने अगोदर सांगितल्याप्रमाणे सर्व शुद्ध पक्षी व सर्व शुद्ध पशू यांतून काही अर्पणासाठी घेतले आणि त्याने देवासाठी देणगी म्हणून त्यांचे वेदीवर होमार्पण केले.

उत्पत्ति 9:3

ह्या आधी मी तुम्हाला, खाण्याकरिता हिरव्या वनस्पती दिल्या; आता सर्व प्राणीही तुमचे अन्न होतील. मी पृध्वीवरील सर्व काही तुमच्या हाती देतो. ते सर्व तुमचे आहे.

लेवीय 15:1

परमेश्वर मोशे व अहरोन ह्यांना आणखी म्हणाला,

लेवीय 20:25

म्हणून तुम्ही शुद्ध व अशुद्ध पशू व शुद्ध व अशुद्ध पक्षी ह्यांच्यातील भेद पाळावा, आणि जे पशू, पक्षी व जमिनीवर रांगणारे प्राणी मी अशुद्ध ठरविले आहेत ते तुम्ही खाऊ नये.

अनुवाद 14:4

गाय-बैल, शेळ्या, मेंढ्या, सांबर, हरीण, भेकर, चितळ, रोही, गवा, रानमेंढा हे खाऊ शकता.

प्रेषितांचीं कृत्यें 10:14

पण पेत्र म्हणाला, “मी तसे कधीच करणार नाही, प्रभु! जे अशुद्ध व अपवित्र आहे असे कोणतेही अन्न मी अद्याप खाल्लेले नाही.”

इब्री लोकांस 13:9

निरनिराळ्या तऱ्हेच्या विचित्र शिकवणुकींमुळे बहकून जाऊ नका. अन्राच्या विधीने नव्हे, तर देवाच्या कृपेने आपली ह्रदये बळकट केलेली फार बरी. कारण अन्राच्या विधींचे पालन करण्याने कोणाचेही हित झालेले नाही.

Interlinear

Choose Theme