Home Bibles लेवीय 10:2 · मराठी बायबल
लेवीय 10:2 · मराठी बायबल

म्हणून परमेश्वरासमोरुन अग्नी निघाला व त्याने त्यांना भस्म केले; ते परमेश्वरासमोर मरण पावले.

Cross references

लेवीय 9:24

तेव्हा परमेश्वरासमोरुन अग्नी निघाला व त्याने वेदीवरील होमार्पण व चरबी भस्म केली; हे पाहून सर्व लोकांनी जयजयकार केला व दंडवत घातले.

लेवीय 10:5

तेव्हा मोशेने सांगितल्याप्रमाणे मिशाएल व एलसाफान यांनी त्यांना उचलून छावणीबाहेर नेले; त्यावेळी परमेश्वराची सेवा करताना घालावयाचे विणलेले विशेष अंगरखे नादाब व अबीहू ह्यांच्या अंगात अद्याप तसेच होते.

लेवीय 16:1

अहरोनाचे दोन मुलगे परमेश्वरासमोर धूप दाखविण्यासाठी गेले असताना मरण पावले. त्यानंतर परमेश्वर मोशेशी बोलला.

गणना 3:3

अहरोनाचे हे मुलगे याजक ह्यां नात्याने परमेश्वराची पवित्र सेवा करण्यासाठी निवडले होते व त्यांचा अभिषेक करण्यात आला होता;

गणना 3:4

परंतु नादाब व अबीहू परमेश्वराची सेवा करिताना सीनाय रानात मरण पावले. त्यांनी परमेश्वराकरिता यज्ञ अर्पण केला परंतु त्यासाठी त्यांनी परमेशवराला मान्य नसलेल्या प्रकारे अग्नीचा उपयोग केला. त्यांना मुलगे नव्हते म्हणून एलाजार व इथामर हे आपला बाप अहरोन हयात असताना याजक होऊन परमेश्वराची सेवा करीत असत.

गणना 14:37

इस्राएल लोकांमध्ये संकटे पसरविण्यास तेच लोक जबाबदार होते म्हणून परमेश्वराने त्या लोकांना मारण्यासाठी आजार निर्माण केला.

गणना 16:32

धरतीने जणू आपले तोंड उघडून त्यांना गिळून टाकले. कोरहची सगळी माणसे, त्याचे संपूर्ण घराणे आणि त्यांची सर्व चीजवस्तू त्यांच्याबरोबर जमिनीत गेली.

गणना 16:35

नंतर परमेश्वराकडून अग्नी आला. त्याने उद-धूप जाळणाऱ्या 250 लोकांचा नाश केला.

गणना 16:49

पण त्या आजारामुळे 14,700 लोक मेले. यात कोरहमुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा समावेश नाही.

गणना 26:61

पण नादाब व अबीहू मेले. ते मेले कारण त्यांनी परमेश्वराने परवानगी न दिलेल्या अग्नीने अर्पणे केली.

1 शमुवेल 6:19

पण हा कोश दृष्टीस पडला तेव्हा तेथे याजक नव्हते. तेव्हा बेथशेमेश मधली सत्तर माणसे परमेश्वराने मारली. परमेश्वराने अशी कठोर शिक्षा करावी याबद्दल बेथशेमेशच्या लोकांनी आक्रोश केला.

2 शमुवेल 6:7

पण परमेश्वराचा त्याच्यावर कोप होऊन उज्जाला मरण आले. पवित्र कोशाला स्पर्श करुन त्याने देवाविषयी अनादर दाखवला. तेव्हा करार कोशाशेजारीच उज्जा गतप्राण झाला.

1 राजे 13:28

तेव्हा तो निघाला आणि वाटेवरच्या मृतदेहापाशी आला. सिंह आणि गाढव अजूनही तिथेच होते. सिंहाने आपल्या भक्ष्याला तोंड लावले नव्हते की गाढवाला इजा केली नव्हती.

2 राजे 1:10

एलीयाने या सरदाराला उत्तर दिले, “मी खरेच देवाचा माणूस (संदेष्टा) असेन तर आकाशातून अग्नी प्रकट होऊन तुला आणि या पन्नास जणांना भस्मसात करु दे.”तेव्हा आकाशातून अग्नी खाली आला आणि त्यात सरदारासह ती पन्नास माणसे जळून खाक झाली.

2 राजे 1:12

एलीयाने त्या सर्वाना सांगितले “मी परमेश्वराचा माणूस असेन तर आकाशातून अग्नी उतरुन त्यात तुम्ही सर्व जळून जाल.”तेव्हा आकाशातून परमेश्वराचा अग्नी उत्पन्र झाला आणि त्यात ते सर्वजण जळून गेले.

1 इतिहास 13:10

परमेश्वराचा उज्जावर कोप झाला. उज्जाने कोशाला हात लावला म्हणून देवाने त्याला ठार केले. उज्जा तत्क्षणी देवासमोर मरण पावला.

1 इतिहास 15:13

गेल्या वेळी हा कोश कसा आणवा याबद्दल आपण परमेश्वराला विचारले नाही. तुम्हा लेवींनी तो आणला नाही. म्हणून परमेश्वराने आपल्याला ती शिक्षा दिली.”

1 इतिहास 24:2

पण नादाब आणि अबीहू हे दोघे आपल्या वडीलांच्या आधीच वारले. शिवाय त्यांना मुलेही झाली नव्हती. तेव्हा एलाजार आणि इथामार हेच याजक झाले.

यशया 30:33

पूर्वीपासून तोफेत तयार करून ठेवले आहे. ते राजासाठी तयार केले आहे. ते पुष्कळ खोल आणि रूंद केले आहे. त्यात लाकडाचा ढीग आणि विस्तव आहे. परमेश्वराचा श्वास (आत्मा) जळत्या गंधकाच्या प्रवाहाप्रमाणे येऊन ते जाळून टाकील.

प्रेषितांचीं कृत्यें 5:5

जेव्हा हनन्याने हे ऐकले तेव्हा तो खाली पडला आणि मरण पावला. काही तरुण लोकांनी त्याचे शरीर गुंडाळले व बाहेर नेऊन पुरले. ज्या प्रत्येक मनुष्याने हे ऐकले, तो अति भयभीत झाला.

प्रेषितांचीं कृत्यें 5:10

त्याच क्षणी सप्पीर त्याच्या पायाजवळ खाली पडली आणि मेली. तरुण माणसे आली, त्यांनी पाहिले की, ती मेलेली आहे. त्या माणसांनी तिला बाहेर नेले आणि तिच्या नवऱ्याजवळ पुरले.

1 करिंथकरांस 10:11

या गोष्टी त्यांच्याबाबतीत उदाहरणार्थ होत्या म्हणून घडल्या. व त्या गोष्टी लिहिल्या गेल्या यासाठी की आम्ही ज्यांच्यावर युगाचा शेवट आला आहे अशा आपणासाठी त्या इशारा अशा व्हाव्यात

Interlinear

Choose Theme