Home Bibles लेवीय 1:3 · मराठी बायबल
लेवीय 1:3 · मराठी बायबल

“जेव्हा एखाद्या माणसाला गुरांढोरांतले होमार्पण अर्पावयाचे असेल तेव्हा त्याने दोष नसलेला नर अर्पावा; तो त्याने दर्शनमंडपाच्या दारापाशी आणून अर्पावा म्हणजे परमेश्वर ते अर्पण मान्य करील.

Cross references

उत्पत्ति 8:20

त्यानंतर नोहाने परमेश्वराकरिता एक वेदी बांधली आणि देवाने अगोदर सांगितल्याप्रमाणे सर्व शुद्ध पक्षी व सर्व शुद्ध पशू यांतून काही अर्पणासाठी घेतले आणि त्याने देवासाठी देणगी म्हणून त्यांचे वेदीवर होमार्पण केले.

उत्पत्ति 22:2

देव म्हणाला, “तुझा एकुलता एक प्रिय पुत्र इसहाक याला घेऊन तू मोरिया देशात जा आणि तेथे, मी सांगेन त्या डोंगरावर माझ्यासाठी त्याचे होमार्पण कर.”

उत्पत्ति 22:8

अब्राहामाने उत्तर दिले, “माझ्या लाडक्या बाळा, होमार्पणासाठी लागणारे कोंकरु देव आपल्याला योग्यवेळी देईल.”तेव्हा अब्राहाम व त्याचा मुलगा संगती निघाले

उत्पत्ति 22:13

आणि मग अब्राहामाने वर दृष्टि करुन सभोंवार पाहिले तेव्हा त्याला एका झुडपात शिंगे अडकलेला एक एडका दिसला; मग त्याने जाऊन तो घेतला व परमेश्वराला होमार्पणासाठी त्याचा बळी दिला. अशा रीतीने अब्राहामाचा मुलगा इसहाक वांचला.

निर्गम 12:5

तो कोकरा, एक वर्षाचा नर असावा व तो पूर्णपणे निरोगी असावा तो कोकरा मेंढ्यातला किंवा बकऱ्यातला असावा.

निर्गम 24:5

मग मोशेने काही तरुणांना यज्ञार्पणे वाहाण्यासाठी पाठवले व त्यांनी परमेश्वराला बैलांची होमार्पणे व शांत्यार्पणे वाहिली.

निर्गम 29:4

“अहरोन व त्याचे पुत्र यांना दर्शन मंडपाच्या दारासमोर घेऊन यावे; त्यांना आंघोळ घालावी;

निर्गम 29:18

मग मेंढ्याच्या सर्व भागांचा वेदीवर होम करावा; हे परमेश्वराकरिता विशेष होमार्पण होय; हे परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य होय; त्यामुळे परमेश्वराला संतोष होईल.

निर्गम 29:42

“ह्या सर्व गोष्टीचे अर्पण दर्शनमंडपाच्या दारापाशी दररोज परमेश्वरासमोर करीत राहावे; ह्या अर्पणानंतर मी परमेश्वर त्या ठिकाणी भेट देईन व तुमच्याशी बोलेन.

निर्गम 32:6

लोक दुसऱ्या दिवशी पहाटेच उठले; त्यांनी जनावरांचा वध केला व होमार्पण व शांत्यर्पणे वाहिली. मग ते खाण्यापिण्यास बसले; नंतर उठून ते खेळायला लागले.

निर्गम 35:5

परमेश्वरासाठी पवित्र अर्पणेगोळा करा; काय द्यावे ह्याविषयी तुम्ही प्रत्येकाने आपल्या मनात परमेश्वराकडे आणावे; सोने, चांदी, पितळ;

निर्गम 35:21

नंतर ज्या लोकांना मनापासून इच्छा झाली त्या सर्वानी दर्शनमंडपाच्या कामासाठी, त्यातील सगळया सेवेसाठी आणि पवित्र वस्त्रासाठी परमेश्वराला अर्पणे आणली.

निर्गम 35:29

ज्या इस्राएल लोकांना मदत करण्याची मनापासून इच्छा झाली त्या सर्वानी आपल्या खुषीने परमेश्वरासाठी अर्पणे आणली; परमेश्वराने मोशेला व लोकांना आज्ञा केल्याप्रमाणे वस्तू बनविण्यास त्यांचा उपयोग झाला.

निर्गम 36:3

इस्राएल लोकांची जी जी अर्पणे आणली होती त्यांचा देवाचे पवित्रस्थान बांधण्यासाठी त्यांनी उपयोग केला. रोज सकाळी इस्राएल लोकांनी अर्पणे आणणे चालूच ठेवले.

निर्गम 38:1

मग बसालेलाने बाभळीच्या लाकडाची एक चौरस होमवेदी बनविली; ती साडेसात फूट लांब, साडेसात फूट रुंद व साडेचार फूट उंच अशी केली.

लेवीय 3:1

“कोणाला शांत्यर्पणाचा यज्ञ करावयाचा असेल तर त्याने गुरांढोरापैकी दोष नसलेला नर किंवा मादी यांचा करावा.

लेवीय 4:3

“जर अभिषेक झालेल्या याजकाने लोकावंर दोष येईल असे पाप केले तर आपल्या पापाबद्दल त्याने पापार्पण म्हणून कोणताही दोष नसलेला एक गोऱ्हा परमेश्वरासाठी अर्पावा.

लेवीय 4:23

त्याने केलेले पाप जेव्हा त्याला कळून येईल तेव्हा त्याने एक दोष नसलेला बकरा अर्पिण्यासाठी आणावा;

लेवीय 4:32

“त्याने आपल्या अर्पणासाठी पापबली म्हणून कोंकरु आणले तर ती दोष नसलेली मादी असावी.

लेवीय 5:15

“परमेश्वराची कोणतीही पवित्र वस्तूचुकून दूषित करुन कोणी पापी ठरला तर त्याने दोषार्पण म्हणून तू ठरवशील तितक्या किमतीचा दोष नसलेला मेंढा आणावा;

लेवीय 5:18

त्याने दोष नसलेला एक मेंढा दोषार्पणासाठी याजकापाशी आणावा; हे दोषार्पण होय. अंशा रीतीने याजकाने त्या माणसाकडून नकळत घडलेल्या पापाबद्दल प्रायश्चित करावे; आणि मग देव त्याला क्षमा करील.

लेवीय 6:2

“कोणी परमेश्वराविरुद्ध खालीलपैकी एखादी गोष्ट करुन पाप केले म्हणजे एखाद्याने गहाण ठेवलेली वस्तू किंवा ठेव म्हणून ठेवलेली वस्तू परत करण्यास खोटे बोलून नकार दिला. किंवा एखाद्याची चोरी केली किंवा कोणाला फसवीले.”

लेवीय 6:9

“अहरोन व त्याचे मुलगे ह्यांना आज्ञा कर की होमापर्णाचे असे नियम आहेत. होमबली अग्नीकुंडावर रात्रभर ठेवून तो सकाळपर्यत राहू द्यावा; आणि वेदीवरील अग्नी तिच्यावर जळतच ठेवावा.

लेवीय 7:16

“यज्ञबलीचे अर्पण स्वखुशीचे किंवा नवसाचे असेल तर ज्या दिवशी तो ते अर्पील त्या दिवशी त्याने ते खावे आणि जर त्यातून काही उरले तर ते त्याने दुसऱ्या दिवशी खावे.

लेवीय 8:18

मग त्याने होमापर्णाचा मेंढा आणला. अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी त्याच्या डोक्यावर आपले हात ठेवले.

लेवीय 9:2

मोशे अहरोनाला म्हणाला, “पापार्पणासाठी एक निर्दोष गोऱ्हा व होमार्पणासाठी निर्दोष मेंढा आण आणि त्यांना परमेश्वराला अर्पण कर;

लेवीय 14:10

“आठव्या दिवशी त्या माणसाने दोन निर्दोष कोकरे, एक वर्षाची निर्दोष मेंढी, अन्नार्पणासाठी तेलात मळलेला चोवीसवाट्या-तीन दशांश एफा-मैदा, व दोन तृतीय अंश पिंट-एक लोगभर तेल ही सामग्री याजकाकडे आणावी;

लेवीय 16:7

“मग त्याने ते दोन बकरे घेऊन दर्शनमंडपाच्या दारापाशी परमेश्वरासमोर उभे करावेत.

लेवीय 17:4

तर त्या माणसाने तो प्राणी परमेश्वराला अर्पण करण्यासाठी दर्शनमंडपापाशी आणावा; त्याने त्या प्राण्याचा वध करुन रक्त सांडले आहे म्हणून त्याने तो परमेश्वराच्या निवासमंडपापाशी आणावा; त्याने जर तसे केले नाही तर त्या माणसाला आपल्या लोकांतून बाहेर टाकावे.

लेवीय 17:9

तर त्याने तो परमेश्वराला अर्पण करण्यासाठी दर्शनमंडपाच्या दारापाशी आणावा; त्याने तसे न केल्यास आपल्या लोकांतून त्याला बाहेर टाकावे.

लेवीय 22:19

व तो गुरे, मेंढरे किंवा बकरे ह्यापैकी असेल तर तो त्यांच्यातील नर असावा, व त्याच्यात काहीही दोष नसावा! परंतु दोष असलेली कोणतीही अर्पणे तू स्वीकारु नये; त्या अर्पणामुळे मला संतोष होणार नाही!

लेवीय 23:12

“पेंढी ओवाळाल त्या दिवशी निर्दोष अशा एक वर्षाच्या मेंढ्याचे होमार्पण करावे;

लेवीय 23:18

“एक गोऱ्हा, दोन मेंढे व एक एक वर्षाची सात नर कोंकरे ही सर्व निर्दोष अशी घेऊन त्यांचा परमेश्वरासमोर अन्नार्पणासोबत परमेश्वरासाठी हव्य म्हणून होम करावा. त्या सुवासिक अर्पणामुळे परमेश्वराला संतोष होईल.

गणना 19:2

“परमेश्वराने इस्राएल लोकांना जी शिकवण दिली तिचे हे नियम आहेत. काहीही दोष नसलेली एक लाल गाय घ्या. त्या गायीला कसलीही इजा झालेली नसावी आणि त्या गायीने मानेवर कधीही जू घेतलेले नसावे.

गणना 23:3

नंतर बलाम बालाकाला म्हणाला, “या वेदीजवळ थांब. मी दुसरीकडे जातो. नंतर परमेश्वर माझ्याकडे येईल आणि मी काय बोलायचे ते मला सांगेल.” नंतर बलाम उंच जागी गेला.

गणना 23:10

याकोबची माणसे कोण मोजू शकेल? ते धुळीच्या कणांइतके असंख्य आहेत. त्यांचा चौथा हिस्सा देखील कोणी मोजू शकणार नाही. मला चांगल्या माणसाप्रमाणे मरु दे. त्यांच्या प्रमाणेच माझ्या आयुष्याचा शेवट सुखी होऊ दे.

गणना 23:19

देव माणूस नाही. तो खोटे बोलणार नाही. देव म्हणजे काही माणूस नाही. त्याचे निर्णय बदलणार नाहीत. जर परमेश्वराने सांगितले की तो एखादी गोष्ट करील. तर तो ती करीलच. जर परमेश्वराने वचन दिले तर तो ते वचन दिलेली गोष्ट करीलच.

गणना 23:23

याकोबाच्या माणसांचा पराभव करु शकेल अशी कोणतीही शक्ति नाही. इस्राएल लोकांना थोपवू शकेल अशी कोणतीही जादू नाही. लोक याकोबाबद्दल आणि इस्राएल लोकांबद्दल असे म्हणतील: ‘देवाने केलेल्या महान गोष्टी बघा.’

गणना 23:27

नंतर बालाक बलामला म्हणाला, “तेव्हा माझ्याबरोबर दुसऱ्या ठिकाणी ये. कदाचित देव आनंदी होईल आणि तुल्या त्या लोकांना शाप द्यायची परवानगी देईल.”

Interlinear

Choose Theme