Home Bibles विलापगीत 1:14 · मराठी बायबल
विलापगीत 1:14 · मराठी बायबल

“माझी पापे परमेश्वराने आपल्या स्वत:च्या हाताने जोखडाप्रमाणे जखडली आहेत. परमेश्वराचे जोखड माझ्या मानेवर आहे. परमेश्वराने मला दुर्बळ केले. ज्यांच्या समोर मी उभी राहू शकणार नाही, अशांच्या हाती परमश्वराने मला दिले आहे.

Cross references

अनुवाद 28:48

परमेश्वराने पाठविलेल्या शत्रूसमोर तुम्हाला नतमस्तक व्हावे लागेल. तुम्ही तहान भूकेने गांजलेले दीन, सर्व तऱ्हेने वंचित असे व्हाल. परमेश्वर तुमच्या मानेवर जोखंड ठेवील. ते तुम्हाला बाजूला करता येणार नाही. तुमच्या अंतापर्यंत ते तुम्हांला वागवावे लागेल.

नीतिसूत्रे 5:22

दुष्ट माणसाची पापे त्याला जाळ्यात पकडतील त्याची पापे दोरीप्रमाणे त्याला पकडतील.

यशया 14:25

मी माझ्या देशात अश्शूरच्या राजाचा नाश करीन. माझ्या डोंगरावर मी त्या राजाला पायाखाली तुडवीन. त्याने माझ्या माणसांना त्याचे गुलाम केले, त्यांच्या मानेवर जोखड घातले. यहुदाच्या मानेवरील जोखड दूर केले जाईल. त्याच्यावरी ओझे दूर सारले जाईल.

यशया 47:6

“मी माझ्या लोकांवर रागावलो होतो ते लोक माझे आहेत पण मी रागावलो असल्याने त्यांचे महत्व कमी केले. मी त्यांना तुझ्या ताब्यात दिले. तू त्यांना शिक्षा केलीस. पण तू त्यांना अजिबात दया दाखविली नाहीस. तू वृध्दांनासुध्दा खूप मेहनत करायला लावलीस.

यिर्मया 25:9

म्हणून मी लवकरच उत्तरेकडील कुळांना बोलावून घेईन.” हा परमेश्वराचा संदेश आहे. “मी लवकरच बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याला निरोप पाठवीन. तो माझा सेवक आहे. मी त्यांना यहूदा व यहूदातील लोक यांच्याविरुध्द उठवीन. तुमच्या देशाभोवतालच्या राष्ट्रांच्यासुद्धा विरोधात मी त्यांना आणीन. मी त्या सर्व देशांचा नाश करीन. मी त्या भूमीचे कायमचे ओसाड वाळवंट बनवीन. लोक ते देश व त्याचा वाईट प्रकारे झालेला नाश पाहतील व हळहळतील.

यिर्मया 27:8

“पण आता, काही राष्ट्रे वा राज्ये बाबेलच्या राजा नबुखद्नेस्सर ह्याचे दास्य करण्यास कदाचित् नकार देतील. ते त्याचे जोखड आपल्या मानेवर ठेवण्यास कदाचित् तयार होणार नाहीत. असे झाल्यास मी काय करीन माहीत आहे? मी त्या राष्ट्रांवर युद्ध, उपासमार व भयंकर रोगराई ह्या आपत्ती आणून त्यांना शिक्षा करीन.” हा परमेश्वराचा संदेश आहे. “त्या राष्ट्रांचा नाश होईपर्यंत मी हे करीन. नबुखद्नेस्सरच्या विरुद्ध लढणाऱ्या राष्ट्रांचा नाश मी त्याच्याच हातून करीन.

यिर्मया 27:12

“‘यहूदाचा राजा सिद्कीया ह्याला मी असाच संदेश दिला. मी म्हणालो, “सिद्कीया, तुला तुझी मान बाबेलच्या राजाच्या जोखडात अडकवलीच पाहिजे आणि त्याचा हुकूम मानला पाहिजे. तू, बाबेलचा राजा आणि त्याची प्रजा, ह्यांची सेवा केलीस, तरच तू जगशील.

यिर्मया 28:14

सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, ‘मी सर्व राष्ट्रांच्या मानेवर लोखंडाचे जोखड ठेवीन. बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याची त्यांनी सेवा करावी, म्हणून मी असे करीन. ते त्याचे गुलाम होतील. मी नबुखद्नेस्सरला वन्यपशूंवरही अंकुश ठेवायला लावीन.”‘

यिर्मया 32:5

बाबेलचा राजा सिद्कीयाला बाबेलला नेईल. मी त्याला शिक्षा करेपर्यत तो तेथेच राहील.’ हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. ‘तुम्ही जर बाबेलच्या सैन्याबरोबर युद्ध केलेत, तरी तुम्ही त्यात विजयी होणार नाही.”.)

यिर्मया 34:20

मी ह्या सर्व लोकांना त्यांच्या शत्रूंच्या अथवा त्यांना मारु इच्छिणाऱ्या कोणाही व्यक्तीच्या हवाली करीन. त्यांची प्रेते म्हणजे पक्षी व वन्य पशूंचे भक्ष्य होतील.

यिर्मया 37:17

मग सिद्कीया राजाने यिर्मयाला बोलाविणे पाठविले आणि त्याला राजावाड्यात आणले. सिद्कीया एकांतात यिर्मयाशी बोलला. त्याने यिर्मयाला विचारले, “परमेश्वराकडून काही संदेश आला आहे का?”यिर्मयाने उत्तर दिले, “हो! परमेश्वराकडून संदेश आला आहे. सिद्कीया, तुला बाबेलच्या राजाच्या स्वाधीन केले जाईल.”

यिर्मया 39:1

अशा रितीने यरुशलेमचा पाडाव झाला. यहूदाचा राजा सिद्कीया याच्या कारकिर्दीच्या नवव्या वर्षाच्या दहाव्या महिन्यात बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर आपले संपूर्ण सैन्य घेऊन यरुशलेमवर चालून आला. नगरीचा पाडाव करण्यासाठी त्याने नगरीला वेढा घातला.

यहेज्केल 11:9

देव असेही म्हणाला, “मी तुम्हा लोकांना या नगरीतून बाहेर काढीन, व परक्यांच्या हाती देईन. मी तुम्हाला शिक्षा करीन.

यहेज्केल 21:31

मी माझ्या राग तुझ्यावर ओतीन. माझा राग गरम वाऱ्याप्रमाणे तुला भाजून काढील. मी तुला क्रूर माणसांच्याताब्यात देईन. माणसांना ठार मारण्यात ते तरबेज आहेत.

यहेज्केल 23:28

परमेश्वराने, माझ्या देवाने, पुढील गोष्टी सांगितल्या. “तू ज्यांची घृणा करतेस, त्यांच्याच ताब्यात मी तुला देत आहे. तुला ज्यांची किळस वाटते, त्यांच्याच स्वाधीन मी तुला करीत आहे.

यहेज्केल 25:4

म्हणून मी तुम्हाला पूर्वेकडच्या लोकांच्या ताब्यात देईन. ते तुमची जमीन घेतील. तुमच्या देशात त्यांचे सैन्य तळ ठोकेल. ते तुमच्यामध्ये राहतील. ते तुमचे अन्न व दूध भक्षण करतील.

यहेज्केल 25:7

म्हणून मी तुम्हाला शिक्षा करीन. सैनिकांनी युद्धात लुटलेल्या अमूल्य वस्तूंप्रमाणे तुम्ही व्हाल. तुम्ही तुमचा वारस गमवाल. तुम्ही दूरदेशी मराल. मी तुमच्या देशाचा नाश करीन. मगच तुम्हाला मीच परमेश्वर आहे.! हे समजून येईल.”

होशेय 5:14

का? एफ्राईमच्या दृष्टीने मी सिंहाप्रमाणे होणार आहे. यहूदा राष्ट्राला मी तरुण सिंहासारखा होणार आहे. मी, हो मी, त्यांचे फाडून तुकडे तुकडे करीन. मी त्यांचे हरण करीन. आणि कोणीही त्यांना माझ्यापासून वाचवू शकणार नाही.

Interlinear

Choose Theme