मी माझ्या देशात अश्शूरच्या राजाचा नाश करीन. माझ्या डोंगरावर मी त्या राजाला पायाखाली तुडवीन. त्याने माझ्या माणसांना त्याचे गुलाम केले, त्यांच्या मानेवर जोखड घातले. यहुदाच्या मानेवरील जोखड दूर केले जाईल. त्याच्यावरी ओझे दूर सारले जाईल.
Cross references
तेव्हा अश्शूरच्या राजाच्या छावणीवर परमेश्वराने आपला दूत पाठवला. या दूताने अश्शूरांचे सगळे सैन्य, त्यातील सरदार आणि अधिकारी यांना मारुन टाकले. एवढे झाल्यावर अश्शूरचा राजा माघार घेऊन आपल्या देशात परत गेला. त्याच्या प्रजेला त्याची शरम वाटली. राजा त्याच्या दैवताच्या देवळात गेला. तिथे त्याच्या पोटच्या मुलांनी तलवारीने त्याला ठार केले.
असे का? कारण तू त्यांचा मोठा भार उतरवशील. त्यांच्या पाठीवरील जोखड काढून घेशील, तुझ्या लोकांना शिक्षा करण्यासाठी शत्रू वापरीत असलेली छडी तू काढून घेशील. तू मिद्यानचा पराभव केलास त्या वेळेप्रमाणेच ही स्थिती असेल.
सीयोनचा डोंगर व यरूशलेम यांच्याबाबतीत योजलेल्या गोष्टी माझा परमेश्वर पार पाडील. नंतर तो अश्शूरला शिक्षा करील. अश्शूरचा राजा फार गर्विष्ठ आहे. त्याच्या अहंकारामुळे त्याने अनेक दुष्कृत्ये केली आहेत. म्हणून परमेश्वर त्याला शिक्षा करील.
अश्शूर स्वत:ला श्रेष्ठ समजतो पण सर्वशक्तिमान परमेश्वर एक भयानक रोग अश्शूरमध्ये पसरवील. ज्याप्रमाणे रोगी माणसाचे वजन घटते, त्याप्रमाणे अश्शूरचे वैभव व सामर्थ्य घटेल. नंतर अश्शूरचे वैभव नष्ट होईल. तो रोग सर्वभक्षक आगीप्रमाणे असेल.
माझा प्रभू, सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो, “माझ्या सीयोनवासीयांनो, अश्शूरला घाबरू नका. मिसरने पूर्वी तुम्हाला जसे हरविले होते तसेच अश्शूर तुम्हाला हरवील. जणू काही अश्शूर तुम्हाला काठीने मारील.
पण थोड्या काळात माझा राग शांत होईल. अश्शूरने तुम्हाला दिलेली शिक्षा मला पुरेशी वाटेल.”
ह्या दिवशी सैन्य नोब येथे मुक्काम करील आणि यरूशलेममधील टेकडी सीयोन हिच्याविरूध्द लढण्याची तयारी करील.
परमेश्वर दुष्ट राजांचा राजदंड मोडतो. परमेश्वर त्यांची सत्ता काढून घेतो.
समुद्राच्या गर्जनेप्रमाणे येणारा पुष्कळ लोकांचा आक्रोश ऐक. ते मोठ्याने रडत आहेत. लाटा एकमेकीवर आदळून उठणाऱ्या आवाजाप्रमाणे हा आक्रोश आहे.
परमेश्वर आपला प्रचंड आवाज लोकांना ऐकायला भाग पाडील. परमेश्वराचा शक्तिशाली हात रागाने खाली पृथ्वीवर येताना पाहण्यास परमेश्वर लोकांना भाग पाडेल. सर्व जाळून टाकणाऱ्या अग्नीप्रमाणे हा हात असेल. मुसळधार पाऊस व गारपीट करणाऱ्या वादळाप्रमाणे देवाचे सामर्थ्य असेल.
इस्राएलच्या ईशान्येकडील एकेकाळी शक्तिशाली असलेले हे (अश्शूर) राष्ट्र तलवारीच्या बळावर पराभूत होईल. पण ही तलवार मानवाची नसेल. अश्शूरचा नाश होईल. पण हा नाश मानवाच्या तलवारीने होणार नाही. देवाच्या तलवारीमुळे अश्शूर पळून जाईल. पण त्यातील तरूणांना पकडून गुलाम केले जाईल.
मग परमेश्वराच्या दूताने जाऊन अश्शूरच्या तळावरील 185,000 माणसांना ठार मारले. सकाळी उठून लोक पाहतात तो त्यांच्या सभोवती प्रेते पडलेली.
“अश्शूर व त्याचे सैन्य मृत्युलोकात आहे. खोल विवरात अतिशय खोलात त्यांची थडगी आहेत. ते सर्व अश्शूरी सैनिक लढाईत मारले गेले. अश्शुरच्या थडग्याभोवती अश्शूरचे सैन्य आहे. ते जिवंत असताना त्यांनी लोकांना घाबरविले. पण आता ते सर्व शांत झाले आहेत - ते सर्व युद्धात मारले गेले.
तू इस्राएलच्या पर्वतांत मारला जाशील. लढाईत तू, तुझे सैन्य आणि तुझ्याबरोबरची राष्ट्रे यांना ठार मारले जाईल. मी तुला मांसभक्षक पक्ष्यांचे व हिंस्र प्राण्याचे भक्ष्य करीन.
मग शांती नांदेल. हो! अश्शूरचे सैन्य आपल्या देशात येईल. आपल्या भव्य वाड्यांचा ते नाश करतील. पण इस्राएलचा राज्यकर्ता सात मेंढपाळ आणि आठ नेते निवडील.
आता मी तुमची अश्शूरच्या सत्तेपासून मुक्तता करीन मी तुमच्या मानेवरचे जोखड काढून घेईन तुम्हाला बांधणाव्या साखळ्या मी तोडून टाकीन.
पूर्वी जसे देवाने आपल्या लोकांना मिसरच्या बाहेर आणले तसेच तो आता आणील. तेव्हा देवाने समुद्राच्या लाटांवर प्रहार करुन समुद्र दुभंगाविला होता आणि लोक तो संकटाचा समुद्र पार करुन आले होते. आता परमेश्वर नद्यांचे पाणी आटवील. तो अश्शूरचे गर्वहरण करील आणि मिसरची सत्ता नष्ट करील.