ते म्हणाले, “परमेश्वरा. तूच आमचा इस्राएलांचा परमेश्वर आहेस. आमच्यावर हे भयंकर संकट का ओढवावे? आज आमच्यातला एक वंश का बरे नष्ट व्हावा?”
Cross references
“‘परमेश्वराने या देशाचे असे का केले? त्याचा एवढा कोप का झाला?’ असे इतर राष्ट्रातील लोक विचारतील.
यहोशवा म्हणाला, “हे प्रभू परमेश्वारा आम्हाला तू यार्देन पार करून आणलेस. अमोऱ्यांच्या हातून आमाचा नाश व्हायला का आम्हाला येथपर्यंत आणलेस? नदीच्या त्या तीरावरच आम्ही सुखासमाधानाने राहिलो असतो.
देवा, तू आम्हाला कायमचाच सोडून गेलास का? देवा, तू तुझ्या माणसांवर अजूनही रागावलेला आहेस का?.
देवा, तुझ्या “वेलीचे” रक्षण करणाऱ्या भिंती तू का पाडून टाकल्यास? आता जो कोणी तिथून जातो तो तिची द्राक्षे तोडतो.
माणसाचा स्वत:चा मूर्खपणा त्याच्या आयुष्याचा नाश करतो पण तो दोष मात्र परमेश्वराला देतो.
परमेश्वरा, तू आम्हाला तुझ्यापासून दूर का ढकलीत आहेस? तुला अनुसरणे तू आम्हाला कठीण का करीत आहेस? परमेश्वरा, आमच्याकडे परत ये. आम्ही तुझे सेवक आहोत. आमच्याकडे ये आणि आम्हाला मदत कर. आमची कुटुंबे तुझ्या मालकीची आहेत.
परमेश्वरा, जेव्हा मी तुझ्याशी वाद घालतो, तेव्हा तुझेच म्हणणे बरोबर ठरते. पण काही गोष्टी बरोबर वाटत नाहीत. त्याबद्दल मला तुला विचारावेसे वाटते. दुष्ट लोकच यशस्वी का होतात? तू ज्यांच्यावर विश्वास ठेवू शकत नाहीस, अशांना सुखाचे आयुष्य का मिळते?