तेव्हा यहोशवाला हिव्वी म्हणाले, “आम्ही तुमचे दास आहोत”पण यहोशवाने विचारले, “तुम्ही कोण? कोठून आलात?”
Cross references
तेव्हा नोहा म्हणाला,“कनान शापित होवो, तो आपल्या भावाच्या गुलामातील सर्वात खालचा गुलाम होवो.”
त्यांनी तुमच्या बोलण्याला मान्यता देऊन नगराचे दरवाजे उघडले तर तेथील सर्व प्रजा तुमची गुलाम होईल व तुमची सेवाचाकरी करील.
तेव्हा आमच्या प्रदेशातील रहिवासी आणि आमचे पुढारी म्हणाले, “प्रवासासाठी पुरेशी शिदोरी घ्या आणि इस्राएल लोकांची भेट घ्या त्यांना म्हणावे, “आम्ही तुमचे दास असून आमच्याबरोबर शांततेचा करार करा.”
“तेव्हा आता तुम्हाला अडचणींना तोड द्यावे लागेल. तुम्हा सर्वांना आमचे दास व्हावे लागेल. तुम्हाला देवाच्या घरासाठी लाकूडतोडे व पाणक्ये म्हणून काम करावे लागेल.”
आता आम्ही तुमचे दास आहोत. आमच्याबाबतीत तुम्हाला योग्य वाटेल ते करा.”
यहोशवाने त्यांना इस्राएल लोकांचे दास केले. लाकडे फोडणे आणि पाणी भरणे ही कामे ते इस्राएल लोकांसाठी आणि परमेश्वराच्या वेदीसाठी करत राहिले. परमेश्वर जे ठिकाण वेदीसाठी निवडील तेथे तेथे त्यांनी हे केले. आजतागायत ते तसेच दास आहेत.
ते पाहून गिबोनच्या लोकांनी गिलगालच्या छावणीत यहोशवाला निरोप पाठवला, “आम्हा दासांना एकटे पडू देऊ नका आमच्या मदतीला या. विनाविलंब आमचे रक्षण करा. डोंगराळ प्रदेशातील सर्व अमोरी राजांनी एकत्र येऊन आमच्यावर हल्ला केला आहे.”
इस्राएल लोकांखेरीज त्या प्रदेशात अमोरी, हित्ती, परिज्जी, हिव्वी, यबूसी हेही लोक होते.
ग, अहाबच्या घराची देखभाल करणारा अधिकारी, नगराधिकारी, वडीलधारी मंडळी आणि त्या मुलांचे पालक यांनी येहूला खालील प्रमाणे संदेश पाठवला, “आम्ही तुझे सेवक आहोत. तू म्हणशील ते आम्ही करु. आम्ही कोणालाच राजा करत नाही. तुला योग्य वाटेल ते कर.”