Home Bibles ☰ Books यहोशवा 22:19 · मराठी बायबल
यहोशवा 22:19 · मराठी बायबल

“परमेश्वराच्या उपासनेला तुमची भूमी तुम्हाला चांगली वाटत नसेल तर आमच्या भागात या. आमच्या भागात परमेश्वराचे निवासस्थान आहे आमच्या वाट्याची थोडी जमीन घेऊन हवे तर राहू शकता. पण परमेश्वराच्या शिकवणुकी विरुद्ध वागू नका. आता आणखी वेदी बांधू नका परमेश्वर देवाच्या निवासमंडपात आमच्या येथे एक वेदी आहेच.

Cross references

निर्गम 15:17

तू तुझ्या लोकांना तुझ्या वतनाच्या पर्वतावर घेऊन जाशील; हे परमेश्वरा, तू त्यांना तुझ्या सिहांसनासाठी तयार केलेल्या ठिकाणाजवळ राहू देशील, व तू हे परमेश्वरा तू तुझे मंदिर बांधशील.

लेवीय 17:8

“तु त्यांना सांग की इस्राएल घराण्यापैकी किंवा त्यांच्यामध्ये राहाणाऱ्या परकीय किंवा परदेशीय लोकांपैकी कोणी होमार्पण अथवा यज्ञ केला,

लेवीय 18:25

म्हणून त्यांचा देश भयंकर भ्रष्ट झाला आहे! आणि आता तो तेथील रहिवाशांना, ओकून बाहेर टाकीत आहे!

अनुवाद 12:5

तुमचा देव परमेश्वर तुमच्या सर्व वसाहतीतून एक विशिष्ट स्थान निवडून घेईल. आपल्या नावाची स्थापना तेथे करील. ते त्याचे खास निवासस्थान असेल. तेथे तुम्ही उपासनेसाठी जात जा.

यहोशवा 18:1

सर्व इस्राएल लोक शिला येथे एकत्र जमले. तेथे त्यांनी सभामंडप उभारला. आता देश इस्राएल लोकांच्या हाती आला होता. त्यांनी त्या भागातील शत्रूना नामोहरण केले होते.

2 इतिहास 11:13

समस्त इस्राएलमधील याजक आणि लेवी रहबामशी सहमत होते. ते त्याला येऊन मिळाले.

2 इतिहास 11:16

इस्राएलच्या सर्व वंशातील जे लोक इस्राएलचा देव परमेश्वर याच्याशी एकनिष्ठ होते ते ही, लेवींनी इस्राएल सोडल्यावर, परमेश्वराला यज्ञार्पणे करण्यासाठी यरुशलेमला आले.

आमोस 7:17

पण परमेश्वर म्हणतो, ‘तुझी बायको गावची वेश्या होईल. तुझी मुलेमुली तलवारीने मरतील. दुसरे लोक तुमची भूमी घेऊन तिची आपापसात वाटणी करतील. तू परदेशात मरशील इस्राएलच्या लोकांना निश्चितच त्यांच्या देशातून कैदी म्हणून नेले जाईल.”‘

प्रेषितांचीं कृत्यें 10:14

पण पेत्र म्हणाला, “मी तसे कधीच करणार नाही, प्रभु! जे अशुद्ध व अपवित्र आहे असे कोणतेही अन्न मी अद्याप खाल्लेले नाही.”

प्रेषितांचीं कृत्यें 11:8

पण मी म्हणालो, ‘प्रभु, मी असे कधीही करणार नाही. मी अपवित्र किंवा अशुद्ध असे कधीच खाल्ले नाही’.

Interlinear

Choose Theme