Home Bibles 2 इतिहास 11:13 · मराठी बायबल
2 इतिहास 11:13 · मराठी बायबल

समस्त इस्राएलमधील याजक आणि लेवी रहबामशी सहमत होते. ते त्याला येऊन मिळाले.

Cross references

अनुवाद 12:19

या देशात राहाल तितके दिवस या सगळ्यात लेवींना न चुकता सामील करुन घ्या.

यहोशवा 22:19

“परमेश्वराच्या उपासनेला तुमची भूमी तुम्हाला चांगली वाटत नसेल तर आमच्या भागात या. आमच्या भागात परमेश्वराचे निवासस्थान आहे आमच्या वाट्याची थोडी जमीन घेऊन हवे तर राहू शकता. पण परमेश्वराच्या शिकवणुकी विरुद्ध वागू नका. आता आणखी वेदी बांधू नका परमेश्वर देवाच्या निवासमंडपात आमच्या येथे एक वेदी आहेच.

1 राजे 12:17

तरीही यहूदा नगरांमध्ये राहणाऱ्या इस्राएलींवर त्याची सत्ता होतीच.

1 राजे 15:17

बाशाने यहूदावर चढाया केल्या. आसाच्या प्रदेशातील लोकांचे येणेजाणे त्याला थांबवायचे होते. त्यामुळे रामा नगर त्याने चांगले मजबूत केले.

2 राजे 4:42

बाल-शालीश येथून एकदा एक माणूस आपल्या नव्या पिकाची भाकर परमेश्वराच्या माणसासाठी घेऊन आला. त्याने सातूच्या वीस भाकऱ्या आणि पोतेभरुन कोवळी कणसे आणली होती. तेव्हा अलीशा म्हणाला, “हे सर्व या लोकांना खायला दे.”

2 इतिहास 16:1

आसाच्या राज्याच्या छत्तिसाव्या वर्षी बाशाने यहूदावर स्वारी केली. बाशा हा इस्राएलचा राजा. रामा हे नगर निवडून त्याने त्याची मजबुती केली. यहूदाचा राजा आसा याच्याकडे कोणालाही येण्याजाण्याला प्रतिबंध व्हावा हा त्याचा त्यामागचा हेतू होता.

2 इतिहास 23:2

त्यांनी यहूदाभर फिरुन यहूदात विखुरलेल्या लेवींना आणि इस्राएलच्या कुलप्रमुखांना एकत्र आणले. मग ते सर्व यरुशलेम येथे गेले.

2 इतिहास 30:1

हिज्कीयाने इस्राएल आणि यहूदामधील सर्व लाकांना निरोप पाठवले: तसेच एफ्राइम आणि मनश्शेच्या लोकांना पत्रे लिहिली. इस्राएलचा परमेश्वर देव याच्याप्रीत्यर्थ वल्हांडणाचा सण साजरा करायला यरुशलेमतील परमेश्वराच्या मंदिरात यावे असे त्याने त्या निरोप पत्रांद्वारे कळवले.

यिर्मया 23:38

पण ‘परमेश्वराची घोषणा (भारी बोजा) काय आहे?’ असे म्हणून नका. जर तुम्ही असे शब्द वापराल, तर परमेश्वर तुम्हाला म्हणेल, ‘तुम्ही माझ्या संदेशाला ‘परमेश्वराची घोषणा (भारी बोजा) असे म्हणू नेय.’ हे शब्द वापरु नका असे मी बजावले.

Interlinear

Choose Theme