Home Bibles यहोशवा 11:16 · मराठी बायबल
यहोशवा 11:16 · मराठी बायबल

अशाप्रकारे यहोशवाने त्या संपूर्ण प्रदेशातील सर्व लोकांचा पराभव केला. डोंगराळ प्रदेश, नेगेव, गोशेनचा सर्व प्रांत, पश्चिमेकडील डोंगरपायथा, यार्देनचे खोरे. इस्राएलचा व त्याच्या आसपासचा डोंगराळ प्रदेश यावर त्याने ताबा मिळवला.

Cross references

उत्पत्ति 15:18

म्हणून त्या दिवशी परमेश्वराने अब्रामाला वचन दिले व त्याच्याशी करार केला. परमेश्वर म्हणाला, “मिसर देशाच्या नदी पासून फरात म्हणजे युफ्रेटीस या महानदीपर्यंतचा प्रदेश मी तुझ्या वंशजांना देतो;

गणना 34:2

“इस्राएल लोकांना ही आज्ञा दे: तुम्ही कनान देशात येत आहात. तुम्ही त्या देशाचा पराभव करा. तुम्ही सर्व कनान देश घ्या.

अनुवाद 1:7

आता तुम्ही इथून अमोऱ्यांच्या डोंगराळ प्रदेशात जा. आसपासच्या सर्व प्रदेशात प्रवास करा. यार्देनेच्या खोऱ्यात, अराबांच्या पहाडी प्रदेशात, पश्चिमेकडील उतारावर, नेगेवमध्ये समुद्रकिनारी जा. कनान आणि लबानोन मार्गे फरात या महानदीपर्यंत जा.

अनुवाद 34:2

नफताली, एफ्राईम व मनश्शेचा सर्व प्रदेश दाखवला. पश्चिमेकडल्या भूमध्य समुद्रापर्यंतचा यहूदाचा सर्व प्रदेश दाखवला.

यहोशवा 9:1

यार्देन नदीच्या पश्चिमेकडील हित्ती, अमोरी, कनानी, हिव्वी तसेच यबूसी लोकांच्या राजांनी या आयवरील चढाई विषयी ऐकले. या लोकांची राज्ये डोंगराळ भागात तसेच मैदानी प्रदेशात थेट लबानोनपर्यंत भूमध्य समुद्राच्या किनाऱ्या किनाऱ्याने पसरली होती.

यहोशवा 10:41

कादेश बर्ण्यापासून गज्जापर्यंत सर्व नगरे यहोशवारने काबीज केली. मिसरमधील गोशेन प्रांतापासून गिबोन पर्यंतच्या कक्षेतील सर्व नगरे जिंकून घेतली.

यहोशवा 11:2

तसेच उत्तरेत डोंगराळ प्रदेशात व वाळवंटी भागात राज्य करीत असलेले राजे यांना याबीनने त्याप्रमाणे कळवले. किन्नेरोथ, नेगेव येथील व पश्चिमेकडील डोंगर उत्तरणीच्या भागातील राजांनाही निरोप पाठवले. पश्चिमेकडील नाफोत दोर येथील राजाला तसेच

यहोशवा 11:21

हब्रोन, दबीर, अनाब व यहुदा या डोंगराळ प्रदेशातील भागात अनाकी लोक राहात असत. यहोशवाने त्यांच्याशी लढाई करुन तेथील लोकांचा व नगरांचा संपूर्ण संहार केला.

यहोशवा 12:8

डोंगराळ भाग, पश्चिमेकडील पर्वतपायथा, यार्देनचे खोरे पूर्वेकडील डोंगर वाळवंट आणि नेगेव एवढा भाग यात येतो. हित्ती, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी लोकांचे वास्तव्य या प्रदेशात होते. इस्राएल लोकांनी पराभूत केलेल्या राजांची यादी अशी:

यहेज्केल 17:23

“मी स्वत:, ती फांदी, इस्राएलच्या उंच पर्वतावर लावीन. मग त्या फांदीचा वृक्ष होईल. त्याला फांद्या फुटून फळे येतील. तो एक सुंदर गंधसरुचा वृक्ष असेल. त्याच्या फांद्यांवर खूप पक्षी बसतील. त्याच्या सावलीला खूप पक्षी राहतील.

यहेज्केल 36:1

“मानवपुत्रा, माझ्यावतीने इस्राएलमधील पर्वताशी बोल. त्यांना परमेश्वराचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकायला सांग.

यहेज्केल 36:8

“पण इस्राएलच्या पर्वतांनो, माझ्या लोकांकरिता इस्राएल लोकांसाठी तुम्ही झाडे वाढवाल आणि ती फळांनी बहरतील. माझे लोक लवकरच परत येतील.

Interlinear

Choose Theme