“इस्राएल लोकांना ही आज्ञा दे: तुम्ही कनान देशात येत आहात. तुम्ही त्या देशाचा पराभव करा. तुम्ही सर्व कनान देश घ्या.
Cross references
अब्राम कनान देशातून प्रवास करीत शखेम गावला आला आणि मोरेच्या मोठ्या वृक्षांपर्यंत गेला. याकाळी त्या देशात कनानी लोक राहात होते.
तू पाहातोस हा सगळा प्रदेश मी तुला आणि तुझ्यानंतर तुझ्या संततीला कायमचा देईन.
मग चार पिढ्यानंतर तुझे लोक या देशात माघारे येतील. त्यावेळी ते येथे राहाणाऱ्या अमोरी लोकांचा पराभव करतील, अमोरी लोकांना शिक्षा करण्यासाठी मी तुझ्या लोकांचा उपयोग करीन. (हे काही काळानंतर घडेल कारण अमोरी लोकांचा दुष्टपणा अद्याप शिगेला पोहोंचला नाहीं.)”
ज्या प्रदेशामधून तू जात आहेस तो म्हणजे कनान देश मी तुला व तुझ्या वंशजाला कायमचा देईन आणि मी तुमचा देव होईन.”
“मी तुम्हाला तांबडा समुद्र ते थेट युप्रेटीस नदी एवढा सारा प्रदेश देईन; तुमची पश्चिमेकडील सीमा पलिष्ट्यांच्या समुद्रापर्यंत म्हणजे भूमध्यसमुद्रापर्यंत व पूर्वेकडील सीमा अरबी वाळवंटापर्यंत, अशा तुमच्या प्रदेशाच्या सीमा असतील. मी तुम्हाला तेथे राहाणाऱ्या लोकांचा पराभव करावयास लावीन व तुम्ही त्या सर्वाना तेथून घालवून द्याल.
“इस्राएल लोकांशी बोल, त्यांना या गोष्टी सांग: तुम्ही यार्देन नदी पार कराल. तुम्ही कनान देशात जाल.
आता तुम्ही इथून अमोऱ्यांच्या डोंगराळ प्रदेशात जा. आसपासच्या सर्व प्रदेशात प्रवास करा. यार्देनेच्या खोऱ्यात, अराबांच्या पहाडी प्रदेशात, पश्चिमेकडील उतारावर, नेगेवमध्ये समुद्रकिनारी जा. कनान आणि लबानोन मार्गे फरात या महानदीपर्यंत जा.
परमेश्वराने मोशेला फार पूर्वीच सांगून ठेवल्याप्रमाणे यहोशवाने सर्व इस्राएल देश ताब्यात घेतला. परमेश्वराने कबूल केल्या प्रमाणे हा प्रदेश इस्राएल लोकांना दिला. यहोशवाने इस्राएलाच्या वंशांप्रमाणे त्यांची हिश्श्यांमध्ये वाटणी केली. अखेर युध्द संपले आणि शांतता नांदू लागली.
यहोशवा आता वृध्द झाला होता तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, “तुझे आता वय झाले आहे पण अजून बराच प्रदेश काबीज करायचा राहिला आहे.
अशाप्रकारे इस्राएल लोकांना दिलेला शब्द परमेश्वराने खरा केला. कबूल केल्याप्रमाणे सर्व जमीन त्याने लोकांना दिली. लोकांनी ती ताब्यात घेतली व ते तेथे राहू लागले.
माझा वाटा आणि प्याला परमेश्वराकडूनच येतो. परमेश्वरा, तू माझा सांभाळ करतोस तुच मला माझा वाटा देतोस.
देवाने त्याच्या माणसांना त्याच्या पवित्र देशात त्याने त्याच्या सामर्थ्याने घेतलेल्या डोंगरावर नेले.
देव म्हणाला, “मी तुला कनानची जमीन देईन. ती जमीन तुझ्या मालकीची होईल.”
“मी, परमेश्वर, स्वत:शी म्हणालो, ‘माझ्या स्वत:च्या मुलांप्रमाणे तुम्हाला वागवावे असे मला वाटते. इतर कोणत्याही राष्ट्रापेक्षा, तुम्हाला, सुंदर व आल्हाददायक भूमी द्यावी अशी माझी इच्छा आहे. ‘मला वाटले की तुम्ही मला ‘पिता.’ म्हणाल व नेहमीच मला अनुसरल.
परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो “इस्राएलच्या बारा वंशासाठी जमिनीची विभागणी पुढीलप्रमाणे होईल. योसेफाला दोन भाग मिळतील.
तुम्ही जागेची सारखी वाटणी कराल. मी तुमच्या पूर्वजांना ही जमीन देण्याचे कबूल केले होते. म्हणून मी ती तुम्हाला देत आहे.
देवाने एका माणसाला (आदाम) निर्माण करुन सुरुवात केली. त्याच्यापासून त्याने वेगवेगळे लोक निर्माण केले. देवाने त्यांना सगळीकडे राहण्यास मुभा दिली. देवाने त्यांना काळ व सीमा ठरवून दिल्या.
यासाठी की, त्यांचे डोळे उघडावे व याविषयीचे सत्य काय आहे हे तू लोकांना दाखवून द्यावेस व त्यामुळे त्यांना त्यांच्या पापांची क्षमा मिळेल आणि माइयामध्ये विश्वासामुळे पवित्र झालेल्या लोकांमध्ये जागा मिळेल.”‘
जोपर्यंत देव, आम्ही जे त्याचे आहोत त्यांना पूर्ण आणि शेवटचे स्वातंत्र्य देईपर्यंत पवित्र आत्मा हा आमच्या वतनाच्या हिश्शाचा विसार आहे. आणि यामुळे त्याच्या गौरवाची स्तुति होईल.
मी असे सांगतो की, तुमच्या अंत:करणाचे डोळे प्रकाशित होवोत यासाठी की तुम्हाला तुमच्या पाचारणाची आशा व संतांमध्ये त्याच्या वतनाच्या वैभवाची श्रीमंती किती आहे हे कळावे.
आमच्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या पित्याची, देवाची स्तुति असो! त्याच्या महान दयेमुळे त्याने आमचा नवा जन्म होऊ दिला, आणि येशूला मेलेल्यातून उठविण्याने जिवंत व नवीन आशा दिली.