मग सत्य काय आहे हे तुम्हांला समजेल. आणि सत्य तुम्हांला मोकळे करील.”
Cross references
त्या वर्षी त्याने आपल्या मुलांबाळासह तुझ्यापासून निघून आपल्या वाडवडिलांच्या वतनात परत जावे;
मला मार्ग दाखव आणि मला तुझे सत्य शिकव तू माझा देव आहेस, माझा तारणारा आहेस मी रोज तुझ्यावर विश्वास टाकतो.
परमेश्वर खरोखरच चांगला आहे. तो पापी माणसांना जगण्यासाठी योग्यमार्ग दाखवतो.
म्हणजे मी मुक्त होईन का? कारण मी तुझे नियम पाळायचा आटोकाट प्रयत्न करतो.
तुम्ही माझ्या सल्ल्याकडे आणि शिकवणुकीकडे लक्ष दिले असते तर मला जे माहित आहे ते सर्व मी तुम्हाला सांगितले असते. मला जे सर्व माहित आहे ते तुम्हाला सांगितले असते. मी माझे सर्व ज्ञान तुम्हाला दिले असते.
मी मदत करणार नाही कारण तुम्हाला माझे ज्ञान नको होते. तुम्ही परमेश्वराची भीती बाळगायला आणि त्याला मान द्यायला नकार दिला.
मुला, मी ज्या गोष्टी सांगतो त्याचा स्वीकार कर. माझ्या आज्ञा लक्षात ठेव.
चांगले लोक पहाटेच्या प्रकाशासारखे असतात. सूर्य उगवतो आणि दिवस प्रकाशित आणि आनंदमय होतो.
मी माझ्या आत्म्यासकट तुझ्यावर प्रेम करते. मला सांग: तू तुझ्या मेंढ्यांना कुठे खायला दिलेस? तू त्यांना दुपारी कुठे विश्रांती घेऊ दिलीस? मी तुझ्याबरोबर यायला हवे. नाही तर मी तुझ्या मित्रांच्या मेंढ्यांची काळजी घेणारी, अशी भाडोत्री स्त्रीसारखी ठरेन
पुष्कळ लोक तेथे जातील. ते म्हणतील, “आपण परमेश्वराच्या डोंगरावर जाऊ या. आपण याकोबच्या देवाच्या मंदिरात जाऊ या. मग देव, त्याचा जगण्याचा मार्ग आपल्याला दाखवील. आणि आपण त्या मार्गाने जाऊ.”देवाच्या शिकवणुकीची सुरूवात, परमेश्वराच्या संदेशाचा आरंभ यरूशलेममधील सीयोनच्या डोंगरात होईल. व तो सर्व जगात पोहोचेल.
नंतर, जर तुम्ही चुकलात आणि चुकीच्या मार्गाने गेलात (डावीकडे वा उजवीकडे) तर तुमच्या मागून आवाज येईल, “हा मार्ग बरोबर आहे. तुम्ही ह्या मार्गाने जावे.”
त्या वेळेला तेथे रस्ता असेल. ह्या महामार्गाला “पवित्र मार्ग” असे नाव मिळेल. पापी लोकांना त्या रस्त्यावरून जाण्यास परवानगी नसेल. कोणीही मूर्ख त्या मार्गाकडे जाणार नाही. फक्त सज्जन माणसेच त्या मार्गावरून चालतील.
तुझी मुले देवाला अनुसरतील. आणि तो त्यांना शिक्षण देईल. मग तुझ्या मुलांना खरोखरच शांतता मिळेल.
परमेश्वराचा सेवक म्हणतो, “परमेश्वराने, माझ्या प्रभूने, त्याचा आत्मा माझ्यात घातला. गरीब लोकांना चांगली बातमी सांगण्यासाठी आणि दु:खी लोकांचे सांत्वन करण्यासाठी देवाने मला निवडले. बंदिवानांची आणि कैद्यांची मुक्तता झाली आहे हे सांगण्यासाठी देवाने मला पाठविले.
परमेश्वर पुढील गोष्टी सांगतो: “चौकात उभे राहा आणि पाहा. जुना रस्ता कोणता ते विचारा. चांगल्या रस्त्याची चौकशी करा व चांगल्या रस्त्यावरुन चाला. तुम्ही असे केल्यास तुमचा तुम्हाला विश्वास सापडेल. पण तुम्ही लोक म्हणाला आहात की, ‘आम्ही चांगल्या रस्त्यावरुन चालणार नाही.’
“भविष्यात, मी इस्राएलच्या लोकांबरोबर पुढीलप्रमाणे करार करीन.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. “मी माझी शिकवण त्यांच्या मनावर बिंबवीन आणि त्यांच्या हृदयावर कोरीन. मी त्यांचा देव असेन व ते माझे लोक असतील.
आपण परमेश्वराबद्दल जाणून घेऊ या परमेश्वराला समजून घ्यायचा कसून प्रयत्न करू या. पहाट येते हे जसे आपल्याला माहीत आहे, हेही आपल्याला माहीत आहे. जमिनीला पाणी पुरविणाव्या वसंतातील पावसाप्रमाणे परमेश्वर येईल.”
“पण माझ्या अनुयायांवर चांगुलपणा उगवत्या सूर्याप्रमाणे चमकेल. सूर्याच्या किरणांप्रमाणे, त्यातून बरे होण्याची शक्ती मिळेल. गोठ्यातूनसुटलेल्या वासरांप्रमाणे, तुम्ही मुक्त व आनंदी व्हाल.
माझे जू आपणांवर घ्या, माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या आत्म्यास विश्रांति मिळेल.
तेव्हा त्याने उत्तर दिले, “स्वर्गाच्या राज्याची रहस्ये तुम्ही समजू शकता, पण त्यांना ते समजणार नाही.
संदेष्टयांनी असे लिहिले आहे की, ‘देव सर्व लोकांना शिक्षण देईल.’लोक देवाचे ऐकतात आणि त्याच्याकडून शिक्षण घेतात, तेच लोक माझ्याकडे वळतात.
जो देवाच्या इच्छेप्रमाणे करतो त्याला माझी शिकवण देवाकडून आहे हे कळेल. त्याला हे कळेल की, माझी शिकवण माझी स्वत:ची नाही.
म्हणून जर पुत्र तुमजी सुटका करतो, तर तुम्ही खरोखरच मोकळे व्हाल.
येशूने उत्तर दिले, “मी मार्ग, सत्य आणि जीवन आहे. केवळ माझ्याद्वारेच पित्याजवळ जाता येते.
पण जेव्हा तो सत्याचा आत्मा येतो, तेव्हा तो तुम्हांला सर्व सत्यात मार्गदर्शन करील, तो त्याचे स्वत:चे असे काही बोलणार नाही, तो जे ऐकतो तेच तो बोलेल, आणि जे अजून यावयाचे आहे, त्याविषयी तो तुम्हांला सांगेल.
तू त्यांना सत्यात पवित्र कर, कारण तुझा शब्द हेच सत्य आहे.
पाप तुम्हांवर राज्य करणार नाही. कारण तुम्ही नियमशास्त्राधीन नाही तर देवाच्या कृपेच्या अधीन आहात.
परंतु आता तुम्हांला पापापासून मुक्त करुन देवाचे गुलाम केले आहे. देवाच्या सेवेसाठी तुमचे फळ तुम्हांला मिळाले आहे व त्याचा शेवटचा परिणाम म्हणजे अनंतकाळचे जीवन आहे.
कारण आत्म्याचा जो नियम ख्रिस्त येशूमध्ये जीवन देतो त्याने पापाचा नियम जो तुम्हांला मरणाकडे नेतो त्यापासून मुक्त केले आहे.
पुन्हा भीति वाटू नये म्हणून तुम्हांला गुलामगिरीचा आत्मा मिळाला नाही, तर तुम्हांला दतकपणाचा आत्मा मिळाला आहे. त्याच्यायोगे आम्ही “अब्बा, बापा” अशी हाक मारतो.
प्रभु आत्मा आहे आणि जेथे प्रभूचा आत्मा आहे तेथे मोकळेपणा आहे.
आम्ही स्वातंत्र्यात राहावे म्हणून ख्रिस्ताने आम्हांला मुक्त केले, म्हणून स्थिर राहा. आणि नियमशास्त्राच्या जुवाच्यागुलामगिरीचे ओझे पुन्हा लादून घेऊ नका.
परंतु स्वतंत्रतेमध्ये राहावे म्हणून तुम्हा बंधूना देवाने बोलावले आहे. फक्त तुमच्या देहाला जे आवडते ते करण्याची एकसबब म्हणून तुमच्या स्वातंत्र्याचा उपयोग करु नका. त्याऐवजी प्रीतिमध्ये एकमेकांची सेवा करा (दास व्हा).
जे त्याला विरोध करतात, त्यांना विनयाने शिक्षण द्यावे या आशेने की देवाने त्यांना पश्चात्ताप करण्यास सहाय्य करावे आणि त्यांना सत्याची ओळख व्हावी.
अशा स्त्रिया नेहमी शिकण्याचा प्रयत्न करतात. पण सत्याच्या पूर्ण ज्ञानापर्यंत त्या कधीही जाऊ शकत नाहीत.
पण देवाचे परिपूर्ण व लोकांना स्वतंत्र बनविणारे जे नियम आहेत, त्यांच्याकडे जो बारकाईने पाहतो, सतत अभ्यास करतो आणि वचन ऐकून ते विसरून न जाता त्यानुसार चालतो, तो मनुष्य जे काही करतो त्यामध्ये आशीर्वादित होईल.
अशा लोकांसारखे बोला व वागा की, ज्यांचा न्याय अशा नियमांमुळे होणार आहे की, ज्यामुळे स्वातंत्र्य मिळेल.
मुक्त लोकांसारखे जगा. पण तुमच्या मुक्तपणे जगण्याच्या नावाखाली वाईट गोष्टींना वाव देऊ नका. उलट देवाचे सेवक असल्याप्रमाणे जगा.