Home Bibles स्तोत्रसंहिता 119:45 · मराठी बायबल
स्तोत्रसंहिता 119:45 · मराठी बायबल

म्हणजे मी मुक्त होईन का? कारण मी तुझे नियम पाळायचा आटोकाट प्रयत्न करतो.

Cross references

स्तोत्रसंहिता 119:19

मी या देशात परका आहे. परमेश्वरा, तुझी शिकवण माझ्या पासून लपवू नकोस.

स्तोत्रसंहिता 119:32

मी तुझ्या आज्ञांचे आनंदाने पालन करीन. परमेश्वरा, तुझ्या आज्ञा मला आनंदित करतात.

स्तोत्रसंहिता 119:71

ख सोसले ते चांगले झाले. त्यामुळेच मला तुझे नियम समजले.

स्तोत्रसंहिता 119:94

परमेश्वरा, मी तुझा आहे म्हणून माझा उध्दार कर. का? कारण तुझ्या आज्ञा पाळण्याची मी शिकस्त करतो.

स्तोत्रसंहिता 119:133

परमेश्वरा, कबूल केल्याप्रमाणे मला मार्गदर्शन कर. माझे काहीही वाईट होऊ देऊ नकोस.

स्तोत्रसंहिता 119:148

तुझ्या वचनाचा अभ्यास करण्यासाठी रात्रभर मी जागा राहिलो.

स्तोत्रसंहिता 119:162

परमेश्वरा, तुझा शब्द मला आनंदी करतो, नुकताच एखादा खजिना सापडलेल्या माणसासारखा मी आनंदित होतो.

नीतिसूत्रे 2:4

ज्ञानाचा चांदीसारखा शोध घे. गुप्तधनाप्रमाणे त्याचा शोध घे.

नीतिसूत्रे 4:12

तू जर याच मार्गाने गेलास तर तू सापळ्यात अडकणार नाहीस. तू पळू शकशील पण अडखळणार नाहीस. तू ज्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करशील त्यात सुरक्षित राहाशील.

नीतिसूत्रे 18:1

काही लोकांना इतरांभोवती राहायला आवडत नाही. त्यांना जे पाहिजे तेच ते करतात. आणि त्यांना जर कुणी उपदेश केला तर ते अस्वस्थ होतात.

उपदेशक 1:13

मी अभ्यास करायचा निश्चय केला आणि माझ्या शहाणपणाचा उपयोग या जीवनात ज्या गोष्टी केल्या जातात त्या शिकून घेण्यासाठी करायचे ठरवले. मला कळले की देवाने आपल्याला करायला दिलेली ही फार कठीण गोष्ट आहे.

लूक 4:18

“प्रभूचा आत्मा मजवर आहे, कारण त्याने मला अभिषेक केला आहे, यासाठी की, गरिबांना सुवार्ता सांगण्यासाठी बंदीवान म्हणून नेलेल्यांस स्वातंत्र्याची घोषणा करण्यासाठी, आंधळ्यांना दृष्टि मिळावी व त्यांनी बघावे यासाठी, जुलूूम होणाऱ्यांची सुटका करण्यासाठी

योहान 5:39

तुम्ही शास्त्राचा काळजीपूर्वक अभ्यास करता. त्या शास्त्राच्या द्वारे आपल्याला अनंतकाळचे जीवन मिळते, असे तुम्हांला वाटते, तेच शास्त्र माझ्याविषयी सांगते!

योहान 8:30

येशू या गोष्टी बोलत असता अनेकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.

इफिसकरांस 5:17

म्हणून मूर्खासारखे वाग नका, तर उलट देवाची इच्छा काय आहे ते जाणून घ्या.

याकोब 1:25

पण देवाचे परिपूर्ण व लोकांना स्वतंत्र बनविणारे जे नियम आहेत, त्यांच्याकडे जो बारकाईने पाहतो, सतत अभ्यास करतो आणि वचन ऐकून ते विसरून न जाता त्यानुसार चालतो, तो मनुष्य जे काही करतो त्यामध्ये आशीर्वादित होईल.

याकोब 2:12

अशा लोकांसारखे बोला व वागा की, ज्यांचा न्याय अशा नियमांमुळे होणार आहे की, ज्यामुळे स्वातंत्र्य मिळेल.

2 पेत्र 2:19

हे जे खोटे शिक्षक आहेत ते लोकांनामोकळीक देण्याचे वचन देतात परंतु ते स्वत:च नाशवंत जीवनाचे दास आहेत. कारण एखाद्या मनुष्यावर ज्या गोष्टीचा पगडाबसलेला असतो त्याचा तो गुलाम बनतो.

Interlinear

Choose Theme