योहान 6:21 · मराठी बायबल
येशू असे बोलल्यावर त्यांनी आनंदोने येशूला नावेत घेतले. आणि त्यांना जायचे होते त्या ठिकाणी नाव लगेच येऊन काठाला लागली.
Cross references
स्तोत्रसंहिता 24:7
वेशींनो, आपले मस्तक उंच करा. जुन्या दरवाजांनो, उघडा म्हणजे तो गौरवशाली राजा आत येईल.
गीतरत्न 3:4
मी पहारेकऱ्यांना सोडून निघाले होते. इतक्यात मला माझे प्रेम असलेला पुरुष सापडला. मी त्याला धरले. मी त्याला जाऊ दिले नाही. मी त्याला माझ्या आईच्या घरी नेले. तिच्या खोलीत जिने मला जन्म दिला, तेथे नेले.
मत्तय 14:32
मग ते नावेत बसल्यावर वारा थाबला.
मार्क 6:51
नंतर तो त्यांच्याकडे नावेत गेला तेव्हा वारा शांत झाला. ते अतिशय आश्चर्यचकित झाले.
प्रकटीकरण 3:20
मी येथे आहे! मी दाराजवळ उभा राहतो व दार ठोठावतो. जर कोणी माझा आवाज ऐकतो आणि दार उघडतो,तर मी आत येईन आणि त्याच्याबरोबर जेवीन व तोही माझ्याबोरबर जेवेल.