Home Bibles योहान 19:40 · मराठी बायबल
योहान 19:40 · मराठी बायबल

मग त्यांनी येशूचे शरीर घेतले आणि यहूदी लोकांच्या प्रेत पुरण्याच्या रीतीप्रमाणे सुगंधित द्रव्यासहित तागांनी ते गुंडाळले.

Cross references

मत्तय 26:12

या बाईने माझ्या शरीरावर हे अत्तर ओतले. मला पुरण्याचा वेळेची तयारी तिने केली.

लूक 24:12

पण पेत्र उठला आणि कबरेकडे पळाला. त्याने खाली वाकून पाहिले पण त्याला तागाच्या गुंडाळण्याच्या वस्त्राशिवाय काही आढळले नाही. जे घडले त्याविषयी तो स्वत:शीच आश्चर्य करीत दूर गेला.

योहान 11:44

मग जो मेला होता तो लाजर जिवंत होऊन बाहेर आला. त्याचे हात पाय वस्त्रांनी बांधले होते व तोंड रुमालाने झाकले होते. येशू लोकांना म्हणाला. “त्याला मोकळे करा आणि जाऊ द्या.”

योहान 20:5

आणि त्याने वाकून आत डोकावले. तेव्हा त्याने तागाची वस्त्रे पडलेली पाहिली, पण तो आत गेला नाही.

Interlinear

Choose Theme