Home Bibles शास्ते 20:38 · मराठी बायबल
शास्ते 20:38 · मराठी बायबल

हे काम झाल्यावर मोठ्ठा धूर करायचा असे त्यांचे ठरले होते. धुराचा लोट पाहून काम फते झाल्याचे बाकी इस्राएलांना कळेल असा संकेत ठरला होता.

Cross references

उत्पत्ति 17:21

पण मी इसहाका बरोबर माझा करार करीन, साराला मुलगा होईल तो इसहाक असेल; तो मुलगा पुढल्या वर्षी याचवेळी जन्मेल.”

यहोशवा 8:20

आयचे लोक मागे वळून पाहतात तो त्यांना नगर जळताना दिसले. धूर आकाशात चढत होता. हे पाहून त्यांचे अवसान गळाले. इस्राएलांचा पाठलाग त्यांनी सोडून दिला. त्याबरोबर इस्राएल लोकांनी धावायचे थांबले. माघारे फिरून ते आयच्या लोकांबर तुटून पडले. आता आयच्या लोकांना पळता भुई थोडी झाली.

2 राजे 4:16

अलीशा तिला म्हणाला, “पुढील वसंत ऋतुत याच सुमारास तू आपल्या पोटच्या मुलाला कुशीत घेऊन बसलेली असशील.”ती म्हणाली, “नाही, माझे स्वामी, तुम्ही परमेश्वराचे माणूस आहात, माझ्याशी खोटे बोलू नका.”

Interlinear

Choose Theme