Home Bibles योएल 1:13 · मराठी बायबल
योएल 1:13 · मराठी बायबल

याजकांनो, शोकप्रदर्शक कपडे चढवून मोठ्याने रडा. वेदीच्या सेवकांनो, मोठ्याने शोक करा. माझ्या परमेश्वराच्या सेवकानो, शोकप्रदर्शक कपडे घालूनच तुम्ही झोपाल. का? कारण परमेश्वराच्या मंदिरात यापुढे अन्नार्पणे व पेयार्पणे होणार नाहीत.

Cross references

लेवीय 2:8

“अशाप्रकारचे अन्नार्पण तू परमेश्वरासमोर आणावे; ते याजकाकडे द्यावे व त्याने ते वेदीवर अर्पावे.

गणना 28:4

एक कोकरू सकाळच्या वेळी आणि दुसरे संधिप्रकाशाच्या वेळी अर्पण करावे.

गणना 28:7

“लोकांनी धान्यार्पणाबरोबरच दिली जाणारी पेयाअर्पणेसुद्धा द्यावीत. त्यांनी एक पाव द्राक्षाचा रस प्रत्येक मेंढी बरोबर द्यावा. हे पेय वेदीवर एका पवित्र जागेवर ओतावे. ती परमेश्वराला द्यावयाची भेट आहे.

गणना 28:14

तसेच प्रत्येक बैलाबरोबर 2 हिन द्राक्षारस, 1 1/2 हिन द्राक्षारस प्रत्येक मेंढ्याबरोबर आणि 1 हिन प्रत्येक कोकराबरोबर अर्पण करा. ही होमार्पणे प्रत्येक वर्षाच्या प्रत्येक महिन्याला अर्पण केली पाहिजेत.

गणना 29:6

अमावास्याचे होमार्पण आणि धान्यार्पण ही नेहमीच्या अर्पणांव्यरिरिक्त असतील. आणि ही रोजच्या धान्यार्पणे व पेयार्पणे यांच्या व्यतिरीक्त असतील. हे सर्व नियमाप्रमाणे केले पाहिजे. ही सर्व अग्नीबरोबर करावयाची अर्पणे आहेत. त्यांचा सुवास परमेश्वराला आनंदित करील.

2 शमुवेल 12:16

दावीदाने बाळासाठी देवाची प्रार्थना केली. दावीदाने अन्नपाण्याचा त्याग केला. घरात जाऊन रात्रभर जमिनीवर पडून राहिला.

1 राजे 21:27

एलीयाचे बोलून झाल्यावर अहाबला फार दु:ख झाले. दु:खाने त्याने अंगावरचे कपडे फाडले. मग विशेष शोकवस्त्रे परिधान केली. त्याने अन्नत्याग केला. त्याच कपड्यात तो झोपला. तो अतिशय दु:खी आणि खिन्न झाला होता.

यशया 22:12

म्हणून माझा प्रभू, सर्वशक्तिमान परमेश्वर तुमच्या मृत मित्रांसाठी शोक करण्यास व रडण्यास सांगेल. लोक मुंडन करून शोकप्रदर्शक वस्त्रे घालतील.

यशया 61:6

तुम्हाला ‘परमेश्वराचे याजक’, आमच्या देवाचे सेवक’ असे म्हटले जाईल. जगातील सर्व राष्ट्रांची संपत्ती तुम्हाला मिळेल आणि ती मिळाल्याबद्दल तुम्हाला अभिमान वाटेल.

यिर्मया 4:8

म्हणून शोकवस्त्रे घाला आणि मोठ्याने आक्रोश करा. का? कारण परमेश्वर आमच्यावर रागावला आहे.”

यिर्मया 9:10

मी, यिर्मया, डोंगरासाठी आकांत करीन. मी वैराण शेतांसाठी शोकगीत गाईन. का? कारण सजीव सृष्टी नाहीशी केली गेली आहे. तेथून आता कोणीही प्रवास करीत नाही. गुरांचे हंबरणे ऐकू येत नाही. पक्षी दूर उडून गेले आहेत. प्राणी निघून गेले आहेत.

यहेज्केल 7:18

ते शोकप्रदर्शक कपडे घालतील आणि अतिशय भयभीत होतील. प्रत्येक चेहरा लज्जित झालेला तुम्हाला दिसेल. दु:ख प्रकट करण्यासाठी ते आपली डोकी भादरतील.

यहेज्केल 27:31

ते तुझ्यासाठी डोक्यावरचे सर्व केस कापतील. शोकप्रदर्शक कपडे घालतील. मृतासाठी करतात तसे ते तुझ्यासाठी शोक करतील.

योएल 1:8

एखाद्या तरुण वाग्दत्त वधूचा भावी पती मारला गेल्यावर ती जशी रडते, तसे रडा!

योएल 2:12

परमेश्वराचा संदेश पुढीलप्रमाणे आहे: “मनापासून माझ्याकडे परत या. तुम्ही दुष्कृत्ये केलीत. रडा, शोक करा आणि उपवास करा.

योएल 2:14

कदाचित परमेश्वराचे मन: परिवर्तन होईलही, कोणी सांगावे! आणि कदीचित तो त्याच्या मागे तुमच्यासाठी आशीर्वादही ठेवून जाईल. मग तुम्ही परमेश्वराला. तुमच्या परमेश्वराला, अन्नार्पणे व पेयार्पणे देऊ शकाल.

योएल 2:17

याजकांना, परमेश्वराच्या सेवकांना द्वारमंडप व वेदी यांच्यामध्ये रडू द्या. ह्या सर्व लोकांनी म्हणावे, “परमेश्वरा, तुझ्या माणसांवर दया कर. तुझ्या माणसांची अप्रतिष्ठा होऊ देऊ नकोस. तुझी माणसे दुसऱ्या लोकांनी आम्हाला हसू नये वक्ष “कोठे आहे तुमचा परमेश्वर?” असे विचारू नये.

योना 3:5

निनवेच्या लोकांनी परमेवराच्या संदेशावर विश्वास ठेवला. त्यांनी काही काळ उपवास करण्याचे ठरविले आणि आपल्या पापांचा विचार करण्याचा निश्चय केला. त्यांनी खेद प्रदर्शित करणारे खास कपडे घातले. नगरीतल्या सर्व लोकांनी असे केले. मग तो राव असो की रंक.

1 करिंथकरांस 4:1

एखाद्या व्यक्तीने आम्हाविषयी अशा प्रकारे समजावे: ख्रिस्ताचे सेवक व देवाच्या रहस्याचे कारभारी.

1 करिंथकरांस 9:13

तुम्हाला माहीत नाही काय मंदिरात जे काम करतात ते त्यांचे अन्र मंदिरातून घेतात, आणि जे नियमितपणे वेदीची सेवा करतात, ते वेदीवर जे अर्पण केले जाते त्यात सहभागी होतात.

2 करिंथकरांस 3:6

त्याने आम्हांला नव्या कराराचे सेवक म्हणून समर्थ बनविले आहे- पत्राने नव्हे तर आत्म्याने, कारण पत्र मारुन टाकते, पण आत्मा जीवन देतो.

2 करिंथकरांस 6:4

उलट सर्व प्रकारच्या परिस्थितीत आम्ही देवाचे सेवक होतो हे आम्ही दाखवून दिले. मग आम्हांला त्रास सोसावा लागो, नाहीतर अडचणी येवोत, छळ होवो नाहीतर वेदना होवोत. छळात, आणि दु:खात

2 करिंथकरांस 11:23

मी पुष्कळ कठीण काम केले आहे. सारखा तुरुंगात जात होतो, पराकाष्ठेचे फटके खाल्ले, पुन्हा आणि पुन्हा मरणाला सामोरे गेलो.

इब्री लोकांस 7:13

कारण या सर्व गोष्टी ज्याच्याबद्दल सांगितल्या आहेत, तो लेवी वंशापेक्षा वेगळ्या वंशाचा आहे. व त्याच्या (लेवीच्या) वंशातील कोणीही वेदीजवळ अशा प्रकारची याचकीय सेवा केलेली नाही.

Interlinear

Choose Theme