Home Bibles इब्री लोकांस 7:13 · मराठी बायबल
इब्री लोकांस 7:13 · मराठी बायबल

कारण या सर्व गोष्टी ज्याच्याबद्दल सांगितल्या आहेत, तो लेवी वंशापेक्षा वेगळ्या वंशाचा आहे. व त्याच्या (लेवीच्या) वंशातील कोणीही वेदीजवळ अशा प्रकारची याचकीय सेवा केलेली नाही.

Cross references

गणना 16:40

परमेश्वराने मोशेला जशी आज्ञा केली होती तसेच त्याने केले. अहरोनच्या वंशातीलच कोणी तरी परमेश्वरासमोर उद-धूप जाळू शकतो, दुसऱ्या कोणी परमेश्वरासमोर उद-धूप जाळला तर तो कोरह आणि त्याच्या अनुयायांप्रमाणे मरेल. हे इस्राएल लोकांनी लक्षात ठेवायची ही एक खूण होती.

गणना 17:5

खरा याजक म्हणून मी एका माणसाची निवड करीन. मी कोणाची निवड केली ते तुला कळेल कारण त्याच्या काठीला पालवी फुटायला लागेल. याप्रमाणे मी लोक तुझ्या आणि माझ्याविरुद्ध तक्रारी करतात ते बंद पाडीन.”

2 इतिहास 26:16

पण सामर्थ्य वाढल्यावर तो गर्विष्ठ झाला आणि त्यामुळे त्याचा नाश ओढवला. परमेश्वरावर त्याची निष्ठा राहिली नाही. धूप जाळण्यासाठी असलेल्या वेदीवर धूप जाळण्यासाठी तो परमेश्वराच्या मंदिरात गेला.

इब्री लोकांस 7:11

लेवीय वंशजांच्या याजकीय पद्धतीने लोकांना नियमशास्त्र दिले गेले पण तशा प्रकारच्या याजकीय पद्धतीने लोक धार्मिकदृष्ट्या परिपूर्ण बनू शकले नसते. म्हणून आणखी एका याजकाच्या येण्याची आवश्यकता होती. तो अहरोनासारखा नसून मलकीसदेकासारखा हवा होता.

इब्री लोकांस 7:14

हे स्पष्ट आहे की, आमचा प्रभु यहूदा वंशातील होता आणि या वंशासंबंधी याजकपणाबद्दल मोशेने काहीही सांगितले नाही.

Interlinear

Choose Theme