Home Bibles ईयोब 5:10 · मराठी बायबल
ईयोब 5:10 · मराठी बायबल

देव पृथ्वीवर पाऊस आणतो. शेतांना पाणी देतो.

Cross references

ईयोब 28:26

पावसाला कोठे पाठवायचे ते त्यानेच ठरवले आणि वादळाने कुठे जायचे तेही त्यानेच ठरवले.

ईयोब 36:27

“देव पृथ्वीवरुन पाणी घेऊन त्याचे धुके आणि पाऊस यात रुपांतर करतो.

ईयोब 36:28

अशा रीतीने ढग पाऊस पाडतात आणि तो खूप लोकांवर पडतो.

ईयोब 37:6

देव ‘हिमाला पृथ्वीवर पडण्याची आज्ञा करतो.’ देव ‘पावसाला पृथ्वीवर जोरात पड असे सांगतो.’

ईयोब 38:26

वैराण वाळवंटात देखील कोण पाऊस पाडतो?

स्तोत्रसंहिता 65:9

तू जमिनीची काळजी घेतोस तू तिच्यावर सिंचन करतोस आणि तिला धान्य उगवायला सांगतोस. देवा तू झरे पाण्याने भरतोस आणि पिकांना वाढू देतोस.

स्तोत्रसंहिता 65:11

तू नवीन वर्षाची सुरुवात चांगल्या हंगामाने करतोस तू भरपूर पिकांनी गाड्या भरतोस.

स्तोत्रसंहिता 147:8

देव ढगांनी आकाश भरुन टाकतो. देव पृथ्वीसाठी पाऊस निर्माण करतो. देव डोंगरावर गवत उगवतो.

यिर्मया 5:24

यहूदातील लोक आपल्या मनाशी असे कधीही म्हणत नाहीत ‘आपण आपल्या परमेश्वर देवाला घाबरु या आणि त्याचा मान राखू या. योग्य वेळेला तो आपल्याला आगोटीचा व वळवाचा पाऊस देतो. योग्य वेळी आपल्याला कापणी करता येईल, ह्याची तो खात्री करुन घेतो.’

यिर्मया 10:13

ढगांचा गडगडाट आणि आकाशातून पडणारा मुसळधार पाऊस ही देवाचीच करणी आहे. पृथ्वीच्या प्रत्येक भागावरील आकाशात तो मेघ पाठवितो. पावसाबरोबर वीज पाठवितो. आपल्या भांडारातून वारा आणतो.

यिर्मया 14:22

परदेशातील मूर्तींत पाऊस पाडण्याचे सामर्थ्य नाही. पावसाच्या सरी पाडण्याची ताकद आकाशात नाही. तूच एक आमचे आशास्थान आहेस. या सर्व गोष्टी करणारा तूच एकमेव आहेस.”

आमोस 4:7

“कापणीच्या हंगामाच्या तीन महिने आधीच मी पाऊस थांबविला. म्हणून पीक वाढलेच नाही मग मी एका गावात पाऊस पडू दिला पण दुसऱ्या भागातील जमीन अतिशय कोरडी झाली.

प्रेषितांचीं कृत्यें 14:17

परंतु देवाने अशा गोष्टी केल्या की त्या द्वारे तो खरा आहे हे सिद्ध व्हावे. तो तुमच्यासाठी चांगल्या गोष्टी करतो, तो तुम्हांला आकाशातून पाऊस देतो.योग्य वेळी तो तुम्हांला चांगले पीक देतो. तो तुम्हांला भरपूर अन्न देतो व तो तुमची अंत:करणे आनंदाने भरतो”

Interlinear

Choose Theme