“देव पृथ्वीवरुन पाणी घेऊन त्याचे धुके आणि पाऊस यात रुपांतर करतो.
Cross references
त्यापूर्वी पृथ्वीवर वनस्पती नव्हती, शेतात काही उगवले नव्हते. कारण परमेश्वराने अद्याप पृथ्वीवर पाऊस पाडला नव्हता आणि जमिनीची मशागत करण्यास कोणी मनुष्य नव्हता.
देव ज्या आश्र्चर्यकारक गोष्टी करतो त्या माणसाला समजत नाहीत. त्याच्या अद्भुत गोष्टींची सीमा नाही.
देव पृथ्वीवर पाऊस आणतो. शेतांना पाणी देतो.
पावसाला कोठे पाठवायचे ते त्यानेच ठरवले आणि वादळाने कुठे जायचे तेही त्यानेच ठरवले.
मेघांच्या गडगडाटामुळे वादळाची सूचना मिळते. जनावरांना सुध्दा वादळाची चाहूल लागते.
जोरदार पावसासाठी आकाशात पाट कोणी खोदले? गरजणाऱ्या वादळासाठी कुणी मार्ग मोकळा केला?
“ईयोब, तुला मेघावर ओरडून त्यांना तुझ्यावर वर्षाव करायला भाग पाडता येईल का?
तू जमिनीची काळजी घेतोस तू तिच्यावर सिंचन करतोस आणि तिला धान्य उगवायला सांगतोस. देवा तू झरे पाण्याने भरतोस आणि पिकांना वाढू देतोस.
देव ढगांनी आकाश भरुन टाकतो. देव पृथ्वीसाठी पाऊस निर्माण करतो. देव डोंगरावर गवत उगवतो.
देवाने अग्न्नी आणि गारा, बर्फ आणि धूर आणि सर्व वादळे निर्माण केली.
परमेश्वराने समुद्र निर्माण करण्यासाठी त्याचे ज्ञान वापरले. आणि पावसाचे ढग तयार करण्यासाठी ज्ञान वापरले.
मी माझा द्राक्षमळा उजाड करीन. कोणीही वेलीची काळजी घेणार नाही. कोणीही त्या मळ्यात काम करणार नाही. त्यात तण व काटेकुटे माजतील. तेथे पाऊस न पाडण्याची मी ढगांना आज्ञा करीन.”
परदेशातील मूर्तींत पाऊस पाडण्याचे सामर्थ्य नाही. पावसाच्या सरी पाडण्याची ताकद आकाशात नाही. तूच एक आमचे आशास्थान आहेस. या सर्व गोष्टी करणारा तूच एकमेव आहेस.”
वसंत ऋतूत पावसासाठी परमेश्वराची प्रार्थना करा. देव वीज पाठवील आणि पाऊस पडेल. देव प्रत्येकाच्या शेतातील पीक वाढवील.